गुरुवार, 31 जुलाई 2008

मायावती पंतप्रधानपदाच्‍या उमेदवार नाही-माकपा

नवी दिल्ली, ३१ जुलै- बसपा अध्यक्षा मायावती पंतप्रधान पदाच्‍या उमेदवार नाहीत, अशी घोषणा भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाने केली आहे. मायावतींना पंतप्रधान म्‍हणून प्रोजेक्‍ट केले जाण्‍याच्‍या तिस-या आघाडीच्‍या प्रयत्‍नांपासून आपला संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत भाकपने आपण कुणाही व्‍यक्‍तीला असे प्रोजेक्‍ट करू इच्छित नसल्‍याचे म्‍हटले आहे.
पक्षाचे महासचिव प्रकाश करात म्‍हणाले, की मला खात्री आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी आपल्‍या बळकटावस्‍थेत उभी राहू शकेल.
कॉंग्रेस किंवा भाजप या पक्षांव्‍यतिरिक्‍त राजकारण उभारता येईल अशा तिस-या आघाडीच्‍या निर्मितीचा प्रयत्‍न डावे पक्ष करीत आहेत.
तिसरी आघाडी केवळ निवडणुकांपूरती मर्यादीत नसावी तर या आघाडीचा खास कार्यक्रमही असावा असे आपल्‍या पक्षाचे म्‍हणणे असल्‍याचेही करात यांनी सांगितले.

भाजपचे संघटनात्मक फेरबदलांचे संकेत

नवी दिल्ली, ३१ जुलै- आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षात संघटनात्मकस्‍तरावर व्यापक फेरबदलांचे संकेत पक्षाच्‍या सुत्रांनी दिले आहेत. त्‍यादृष्‍टीने पक्षाने तयारी सुरू केली असून लोकसभा निवडणुकीच्‍या उमेदवारांची यादी जाहीर करण्‍याचे काम तुर्तास स्‍थगित ठेवले आहे.
सर्वच राज्‍यात पक्षाचे प्रमुख बदलले जाण्‍याचे संकेत पक्षाच्‍या सुत्रांनी दिले आहेत। या प्रक्रियेत पक्ष आपले पूर्वीचे निर्णय बदलण्‍याची शक्‍यता आहे. पक्षाच्‍या एका वरिष्ठ नेत्‍याने सांगितले, की आगामी निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्‍याच्‍या उदेदशाने पक्षाने तयारी सुरू केली असून सर्व राज्यांतील आपल्‍या प्रमुखांना व राज्यसभेतील वरिष्ठ नेत्‍यांना निवडणूक लढविण्‍याची संधी देण्‍याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत सर्व राज्‍यातील प्रमुख नेत्‍यांना दोन्‍ही जबाबदा-या सांभळाव्‍या लागण्‍याची शक्‍यता आहे.
पक्षाचे माजी अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी यापूर्वीग्‍च आपण निवडणुका लढविणार नसल्‍याचे जाहीर केले असून त्‍यांच्‍याकडे निवडणुकांची प्रमुख पदाची जबाबदारी असणार आहे.

'जिगर'ने वाटले झोपडपट्टीमध्ये सीएफएल

पुणे, ३१ जुलै- लोडशेडिंगमुळे पुणेकर हैराण झाले असताना झोपडपट्टीवासीयांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कॉमनवेल्थ युथ स्पधेर्अंतर्गत 'पर्यावरण मित्र' ही मोहीम राबवण्यात येणार असून त्याद्वारे सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्पधेर्चा मस्कॉट 'जिगर'च्या हस्ते सीएफएलचे दिवे आणि रोपांचे वाटप केले जाणार आहे.
कवेर्नगरमधील मावळे आळी झोपडपट्टीपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। 'जिगर'च्या हस्ते या भागातील घरे आणि दुकानांमध्ये सीएफएल दिवे लावण्यात आले. यावेळी स्पधेर्चे सल्लागार आदित्यन कुमार, 'प्रयास'चे शंतनू दीक्षित, 'डब्ल्यूएनएस'च्या बबिता प्रकाश, 'पर्यावरण मित्र'चे समन्वयक शंकर कलमानी, नरेंद चव्हाण आणि भगवान कडू उपस्थित होते. ब्रिटीश गॅस आणि डब्ल्यूएनएस यांच्या सहकार्याने ही मोहीम शहरात राबवण्यात येणार असून पुणे विद्यापीठ आणि सारथी यांनीही मदत केली आहे.
या मोहिमेसाठी अकराशे स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक झोपडपट्टीतून २५ कार्यकत्यांची निवड केली जाईल. शहरात सुमारे ५०० झोपडपट्ट्या असून प्रत्येक ठिकाणी सुमारे २०० दिवे मोफत वाटले जाणार असल्याचे कलमानी यांनी सांगितले.

"पोटा' कायद्याचे अडवानींकडून पुन्हा समर्थन

अहमदाबाद, ३१ जुलाई- केंद्र सरकारने दहशतवादाविषयीच्या आपल्या भूमिकेत बदल करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत भाजपचे व रिष्ठ नेता लालकृष्ण अडवानी यांनी रविवारी येथे केले. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांनी आज बॉम्बस्फोट ठिकाणांना भेट दिली तसेच रूग्णालयात जावून स्फोटातील जखमींची विचारपूस केली.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतानाना त्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी "पोटा' कायदा लागू करण्यावर जोर दिला.
त्याचबरोबर दहशतवाद निपटून काढण्यासंबंधीच्या गुजरात सरकारच्या कायद्यास तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली. हे विधेयक चार वर्षापूर्वी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले आहे, मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे अडवाणींनी स्पष्ट केले.

राणेंचा 'प्रहार' ऑक्टोबरमध्ये येणार

मुंबई, ३१ जुलाई- हा 'प्रहार' सूडाचा नसेल, प्रबोधनाचा असेल. सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असून आपल्यातील मंत्री व पत्रकार एकमेकांना निश्चितच छेद देणार नाहीत, अशी ग्वाही महसूलमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी मुंबईत दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर (नऊ ऑक्टोबर) राणे संपादकाच्या भूमिकेत शिरत असून त्यांच्या 'प्रहार' या दैनिकाची घोषणा मुंबईत झाली.
आपल्याला लहानपणापासून वाचनाचा छंद होता, असे सांगून राणे म्हणाले की, आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत, त्याचे श्रेय या वाचनाला व वृत्तपत्रांनाच जाते. आपण जरी सरकारचा भाग असलो तरी, वस्तुस्थिती कायम मान्य करतो. दैनिकातही आपण वस्तुनिष्ठ भूमिकाच मांडू, असेही त्यांनी सांगितले. या दैनिकात केवळ राजकारण नसेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावरही ते भर देईल, असे राणे म्हणाले. आपण या वृत्तपत्रात अग्रलेखही लिहिणार असल्याचे सूतोवाच करताना राणे यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्ानंना मनमोकळी उत्तरे दिली. राणे या दैनिकाचे मुख्य संपादक; तर आल्हाद गोडबोले संपादक असणार आहेत.

मंगलवार, 29 जुलाई 2008

अहमदाबाद स्फोटांचे धागेदोरे मुंबईत

मुंबई, २९ जुलै- अहमदाबादमध्ये झालेल्या मालिकाबद्ध बॉम्बस्फोट प्रकरणाचा संबंध नवी मुंबई पाठोपाठ आता मुंबईशी जोडला जात आहे. दक्षिण मुंबईतील इक्बाल गेस्ट हाऊसमध्ये स्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरुन तीन तरुणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी पकडलेले तिघेहीजण काश्मिरी असून त्यांची चौकशी सुरू आहे.
बंगळुरू पाठोपाठ अहमदाबादमध्ये स्फोट झाल्यानंतर देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे। अनेक ठिकाणी हॉटेल , गेस्ट हाऊस , धर्मशाळांमध्ये छापे टाकून संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली. मुंबईतही अशीच कारवाई सुरू असताना पोलिसांना इक्बाल गेस्ट हाऊसमध्ये राहणा-या काश्मिरी तरुणांचा संशय आला. पोलिसांनी विचारलेल्या काही प्रश्नांना त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. या तरुणांची चौकशी सुरू आहे.
याआधी अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या काही मिनिटे आधीच ‘ हिंमत असेल तर बॉम्बस्फोट रोखून दाखवा ,’ अशी धमकी देणारा ई-मेल नवी मुंबईच्या सानपाडा भागातील एका घरातून पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या घरावर छापा टाकून एका अमेरिकन व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता स्फोटांचे धागेदोरे मुंबईत आढळून आले आहेत.

सोमवार, 28 जुलाई 2008

पाच लाख भरा, मग जनहित याचिका ऐकू

मुंबई २८ जुलै-झोपडपट्टीवासियांसंदर्भात एका सामाजिक संघटनेने केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेताना, पाच लाख रुपये अनामत रक्कम भरल्यावरच प्रकरण ऐकू, अशी अट या संघटनेला हायकोर्टाने घातल्याने उठसूट याचिका करणाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे!
या प्रकरणी, न्या. जननारायण पटेल व न्या. के. यू. चांदिवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 'ऑल इंडिया स्लम रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च फाऊंडेशन' या संघटनेने ही जनहित याचिका केली असून त्यांच्या वतीने अड इंदू प्रकाश व सी. के. त्रिपाठी यांनी तर सरकारतफेर् सहाय्यक सरकारी वकील मिलिंद मोरे यांनी बाजू मांडली.
अनामत रक्कम भरा अथवा रक्कम न भरल्यास याचिका फेटाळण्यात येईल, असे कोर्टाने स्पष्ट केले. संघटनेचा याचिकेतील विषयाशी काही संबंध नसेल आणि त्यात जनहिताचा मुद्दा नसेल तर अशा याचिका जनहित याचिका म्हणून दखल करून घेऊ नये, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असल्याचे हायकोर्टाने निदर्शनाला आणले. पण, 'याचिका न वाचताच अनामत रक्कमेचा आदेश दिला आहे', असे सांगण्याचा अर्जदाराच्या वकिलांनी प्रयत्न केला. तेव्हा, तुम्ही केलेल्या युक्तिवादावर आधारित हा आदेश असून वकिलांनी अशी विधाने करू नयेत, अशी समज कोर्टाने दिली.

मुजाहिदीनला देशात घडवायचेत दंगे?

नवी दिल्ली, २८ बेंगलूरू, आणि अहमदाबाद दंग्यांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला देशात सांप्रदायिक दंगे पसरवायचे आहेत अशी माहिती या संघटनेने पाठवलेल्या मेल वरून उघड झाली आहे.
संघटनेने एका वाहिनीला एक मेल पाठवला असून यात गुजरातमधील अल्पसंख्याक समुदायाला भडकवणारी वक्तव्य करण्यात आली आहेत.
गुर्जरांनी राजस्थानात ज्या प्रकारे आपल्या अधिकारासाठी आंदोलन केले त्याच पद्धतीने देशातील आणि गुजरातमधील अल्पसंख्याक समुदायाने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन या मेलमध्ये करण्यात आले आहे.

रविवार, 27 जुलाई 2008

स्फोटांनंतर आता राजकारणाला सुरुवात

नवी दिल्ली, २७ जुलै- केंद्रातील कॉग्रेस सरकारने दहशतवाद्यांविरोधात मवाळ भूमिका घेतल्यानेच देशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद वाढल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केल्यानंतर कॉग्रेसनेही आता त्याला जोरदार उत्तर देत भाजपने जरा संयम दाखवावा अशी प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणावरून दोन्ही पक्षात आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर पोटा कायदा रद्द करून सर्वात मोठी चूक केली. यानंतरच दहशतवाद्यांना पाठबळ मिळाल्याचा आरोप भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला आहे. सरकार दहशतवाद्यांप्रकरणी मवाळ भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.
यानंतर कॉग्रेस गटातूनही यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून प्रवक्ते विरप्पा मोईली यांनी भाजपने जरा संयमाची भूमिका घ्यावी आणि अशी वक्तव्ये टाळावीत असे मत व्यक्त केले आहे.

चॅटर्जीच्या भूमिकेतून दृढनिश्चय झळकतो: ठाकरे

पुणे, २७ जुलै- लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींना अनपेक्षितपणे सेनाप्रमुख बाळासाहेबांकडून समर्थन लाभले असून माकपच्या भूमिकेविरूद्ध त्यांनी दृढनिश्चय व कणखरपणा दाखवण्याच्या कृतीचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
सोमनाथ चॅटर्जी यांच्यासोबत आपले वैचारिक मतभेद असले आहेत, मात्र त्यांच्या अंतर्मनाचे ऐकून निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ते आदरार्थी ठरल्याचे 'सामना' मधील अग्रेलेखात बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहे.
माकपचा लोकसभाध्यक्षपद सोडून सपुआ सरकारला खेचण्यासाठी सरकारविरूद्ध मतदान करण्याचा आदेश त्यांनी फेटाळून लावला. त्यांनी तत्त्वांशी फारकत घेतली नाही. मनमोहन सरकार खेचण्यातील अपयश व मायावतींना पंतप्रधानपदाच्या गादीवर बसवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर सोमनाथदांना पक्षातून निलंबित करून त्यांनी राग काढल्याचे अग्रेलेखात स्पष्ट केले आहे.
चॅटर्जी हे ज्योती बसू व बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पंक्तीतील नेते आहेत. धर्मनिरपेक्ष विचारसरणीसाठी त्यांनी पक्षाचा आदेश फेटाळून राजकीय विरगती पत्करली, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुलींमध्ये वाढतेय इंजिनीअरिंगचे क्रेझ

नवी दिल्ली, २७ जुलै-गलेलठ्ठ पगार आणि नवनवीन संधी मिळत असल्याने इंजिनीअरिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
गेल्या सहावर्षात इंजिनीअरिंग क्षेत्रात मुलींच्या संख्येत पाचटक्यांहून अधिक वाढ झाली आहे. एसौचेमने या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले यात ही माहिती उघड झाली आहे. यात संस्थेने २० इंजिनीअरिंग संस्थांमधून सर्वेक्षण केले, यात त्यांना ४० मुली इंजिनीअरिंग करत असल्याचे दिसून आले.
केवळ चांगला पगार आणि आकर्षणामुळेच आपण हे क्षेत्र निवडल्याची माहिती ७१ टक्के मुलींनी दिली.

मुंबई आणि इंदूरमध्ये हाय अलर्ट

मुंबई, २७ जुलै- जयपूर पाठोपाठ बेंगलूरू आणि अहमदाबादेत झालेल्या साखळी स्फोटांनंतर आता देशातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याअंतर्गत राज्य शासनाला निर्देश देण्यात आले असून, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी दोनही राज्यात विशेष पोलिस दल नियुक्त करण्यात आले असून राज्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी बाजार, आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. वर्दळीच्या ठिकाणी संशयित आढळल्यास त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांनी अहमदाबादमध्ये स्फोट करण्यापूर्वी मेल करत दिलेल्या धमकीत मुंबई आणि इंदूरला आगामी काळात आपले लक्ष करण्याची धमकी दिली आहे.

अहमदाबाद स्फोटांप्रकरणी गुजरात सरकारकडून विशेष समितीची स्थापना

अहमदाबाद, २७ जुलै - येथे शनिवारी झालेल्या १७ भीषण बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच राज्य सुरक्षा संस्थेत सुसंवाद साधण्यासाठी गुजरात सरकारने रविवारी गृहखात्याच्या अधिपत्याखाली एका विशेष समितीची नियुक्‍ती करण्याची घोषणा केली.
गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी माहीती देताना सांगितले कि, बॉम्बस्फोट मालिकेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक विशेष समितीची नियुक्‍ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत चार अन्य सदस्य असून त्यामध्ये राज्य पोलिस संचालक प्रमुख, राज्य आय. बी. प्रमुख, कायदा संचालक तसेच डायरेक्‍टोरेट ऑफ फोरेंसिक सायन्सचे संचालक यांचा समावेश आहे.
ही समिती केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच अन्य राज्यांच्या सुरक्षा संस्थांशी सुसंवाद साधून राज्य पोलिसांच्या मदतीने बॉम्बस्फोट मालिकेच्या तपासात मदत करेल.
याशिवाय केंद्रीय सुरक्षा समिती तसेच अन्य राज्यांच्या सुरक्षा समित्यांकडून याआधीच्या बॉम्बस्फोटांच्या तपासाच्या माहीतीचा अभ्यास करून अहमदाबाद येथील बॉम्बस्फोटाची दिशा ठरवेल.

अहमदाबादेतील मृतांची संख्या ४५ वर

अहमदाबाद, २७ जुलै- गुजरातसह संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या अहमदाबादेतील बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या ४५ वर पोचली आहे.
शनिवारी संध्याकाळी साडे सहापासून सुमारे ९० मिनिटांच्या कालावधीत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १७ स्फोट झाले होते. त्यामध्ये शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपाचार सुरू आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी हटकेश्‍वर परिसरातील निवासी वसाहतीमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळला। पोलिसांच्या बॉम्ब नाशक पथकाने तो निकामी केल्याने आणखी अनर्थ टळला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघामध्येही एक जिवंत बॉम्ब सापडल्याचे वृत्त आहे.
स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. स्फोटांमध्ये अमोनियम नाईट्रेटचा वापर केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

झारखंडमध्ये बॉम्बस्फोट, ५ जखमी

गोड्डा, २७ जुलै-झारखंडमध्ये गोड्डा शहरात एका बस स्टँडजवळ रविवारी पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात पाचजण जखमी झाले . जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे .
हा स्फोट कमी क्षमतेचा असल्याचे पोलिस अधिक्षक जितेंद्र सिंग यांनी सांगितले . स्फोटप्रकरणी तपास सुरू असल्याचे ते म्हणाले .

शनिवार, 26 जुलाई 2008

अहमदाबादमध्ये बाँबस्फोट मालिका, गुजरात हादरलं

अहमदाबाद, २६ जुलै-व्यावसायिकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदाबादमध्ये आज १७ बाँबस्फोट झाल्याचं समजतं. त्या सर्व स्फोटांना प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. कमी तीव्रतेचे हे स्फोट असून त्यात १५ जण मृत्युमुखी पडले असून ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
संध्याकाळी सातच्या सुमारास मणिनगरमध्ये पहिला स्फोट झाला आणि त्यापाठोपाठ सरदार पटेल डायमंड मार्केट, सरनपूर ब्रिज आणि इशानपूर, बापूनगर आणि रायपूर इथे आठ-दहा मिनिटांत एकापाठोपाठ एक स्फोट झाले. ही सर्व ठिकाणी नेहमीच गजबजलेली असतात.
एक बाँब सायकलवर ठेवला होता आणि दुसरा बाँब टिफिनमध्ये लपवण्यात आला होता, असं प्राथमिक वृत्त आहे. एक स्फोट बसमध्ये झाल्याचं समजतं. स्फोटाचं वृत्त कळताच, पोलिस आणि प्रशासन लगेचच घटनास्थळी पोहोचलं असून जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये हाय alart जाहीर करण्यात आला असून दिल्ली, मुंबई आणि संवेदनशील शहरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे, या स्फोटानंतर काँग्रेस विरुद्ध भाजप असं राजकारण रंगू लागलं आहे. चूक कुणाची?, केंद्राची की राज्याची यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
कर्नाटकपाठोपाठ गुजरात लक्ष्य झाल्यानं भाजपशासित राज्यच टार्गेट का ?, असाही प्रश्न चर्चिला जात आहे. १५ ऑगस्टदरम्यान कमी तीव्रतेचे स्फोट करून देशवासियांमध्ये घबराट पसरवण्याचा हा दहशतवादी यंत्रणेचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

मुंबईतील रेल्वे जमिनींचा पैसा महाराष्ट्रालाच

मुंबई, २६ जुलै-रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडून महाराष्ट्रासाठी तब्बल ३६०० कोटी मिळवण्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख शुक्रवारी यशस्वी झाले.
मुंबईतील रेल्वेच्या जमिनींचा एफएसआय दोनऐवजी चार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने पूवीर्च घेतला होता. या निर्णयामुळे एफएसआयच्या विक्रीतून अंदाजे ३६०० कोटी रुपये मिळतील. त्यातील दोन तृतीयांश रक्कम मुंबईच्या विकासासाठी तर उर्वरित देशातील योजनांसाठी देण्याचे रेल्वेने तत्वत: मान्य केले होते. परंतु, महाराष्ट्रात एफएसआयमध्ये वाढ केल्यास सुमारे तीन लाख रुपये चौ. मीटर दराने सरकारतफेर् प्रीमियम आकारला जातो. रेल्वेला तो आकारण्यात आला नसल्याने एफएसआयमधून उभी राहणारी सर्व रक्कम जवळपास ३६०० कोटी राज्याच्या विकासासाठी वापरण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. लालूंनीही त्याला अनुमती दिली.

अंदमानच्या समुद्रात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली, जुलै - अंदमानच्या समुद्रात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ५.२ मॅग्निट्यूडच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
अंदमानच्या समुद्रात पूर्वेकडे ११.७ डिग्री रेखांश आणि ९१.८ अक्षांश अंतरावर हा भूकंप जाणवला. तथापि या मुळे कुठल्याही प्रकारच्या वित्त अथवा जीवित हानी झालेली नसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

"समाजात अशांतता पसरवण्यासाठीच बॉम्बस्फोट'

नवी दिल्ली, २६ जुलै - समाजातील दोन गटांमध्ये कटूता निर्माण करण्याच्या हेतूनेच स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. नागरिकांनी या परिस्थितीत शांत राहावे, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्फोट घडवून आणणाऱ्यांचा कसून तपास करण्यात येत आहे. स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर, संपूर्ण देशातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

विमान दुर्घटना टळली, शरद पवार बचावले

मुंबई, २६ जुलै-केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि त्यांच्यासह अनेक प्रवाशांना दिल्लीहून मुंबईला घेऊन येणा-या जेट एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात शुक्रवारी सायंकाळी थोडक्यात होता होता टळला आणि शरद पवारांसह सर्वजण सुदैवाने बचावले. विमानाचा एक दरवाजा लॉक झाला नसल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने या विमानाचे दिल्ली विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.
दिल्लीहून मुंबईला येणा-या जेटच्या बोईंग ७३७ विमानाने (९ डब्ल्यू ३६२) काल सायंकाळी सव्वा पाच वाजता दिल्ली विमानतळावरुन हवेत उड्डाण केले। विमान ६५०० फूट हवेत असतानाच, विमानाचा मागचा दरवाजा व्यवस्थित लॉक झालेला नसल्याची बाब केबीन क्रूच्या लक्षात आली. त्याने ती बाब वैमानिकाच्या लक्षात आणली. वैमानिकाने दिल्ली विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षाने त्यांना काही इंधन हवेत जाळण्याचे निर्देश दिले. तेव्हा विमानाने हवेतच गोल गोल फे-या मारल्या आणि तासाभराच्या उड्डाणानंतर पुन्हा विमानाचे दिल्ली विमानतळावर इर्मजन्सी लँडींग करण्यात आले. या विमानात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह अनेक प्रवासी होते. हे विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात वाचले आणि सर्व प्रवाशांचा जीव वाचला.
विमानाच्या इर्मजन्सी लँडिंगच्या वेळी काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या। या सर्वांवर दिल्ली विमानतळावरच किरकोळ उपचार करण्यात आले. त्यानंतर दुस-या विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीहून मुंबईला रवाना करण्यात आले.
दरम्यान, केबीन क्रूच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याने, तडकाफडकी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. विमानाचे सर्व दरवाजे व्यवस्थित लॉक झाले नसतील, तर वैमानिकांच्या कॉकपीटमध्ये लाल दिवा पेटतो. परंतु हे बटनच स्वीच ऑफ होते. त्यामुळे विमानाने हवेत उड्डाण घेईपर्यंत ही गंभीर बाब वैमानिक वा केबिन क्रूच्या निदर्शनास आली नाही. विमान ६५०० फूट हवेत उडाल्यानंतरच हा हलगर्जीपणा लक्षात आला. तेव्हा तत्काळ इर्मजन्सी लँडिंगचा निर्णय घेण्यात आला.

बाबा गुरमितसिंगविरुद्ध बलात्काराचा खटला भरण्याचे आदेश

नवी दिल्ली, २६ जुलै - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम गुरमितसिंग यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने शनिवारी दिले.
बाबा गुरमितसिंग यांनी "डेरा' समुदायाला मानणाऱ्या महिलांचा शारिरीक छळ केल्याने त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. "डेरा' समुदायातील एका शिष्येवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या प्रकरणी "सीबीआय' तपास करीत आहे.

शुक्रवार, 25 जुलाई 2008

अनुसूचित जातींतील अधिक विद्यार्थ्यांसाठी आता शिष्यवृत्ती

मुंबई, २५ जुलै- - राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना परदेशात स्कॉलरशिप देण्याची राज्य सरकारची योजना असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.
सुभाष चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना हंडोरे यांनी सांगितले की, आतापर्यंत ७२ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी परदेशात पाठविण्यात आले आहे, पण नजीकच्या काळात यामध्ये निश्‍चितच वाढ होईल। त्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारने १९ कोटीची तरतूद केली आहे व गेल्या चार वर्षांत दहा कोटी खर्च करण्यात आले आहेत.
सन २००३ ते २००६ या काळात सरकारने दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठविले आहे, त्यांनतरच्या दोन वर्षांत २५ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे. पण या योजनेचा लाभ अधिक विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी मागणी वाढत आहे.असेही हंडोरे यांनी एका उपप्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

औरंगाबादेत मुसळधार पाऊस

औरंगाबाद, २५ जुलै - औरंगाबादेत बुधवारी रात्री या हंगामातील पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर गुरूवारी दिवसभर पाऊसाने दडी मारली आणि शुक्रवारी रात्री साडे आठ पासून शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
शहरातील रेल्वे स्टेशन, पद्‌मपुरा, क्रांतीचौक, ज्योतीनगर, शहानुरमियॉं दर्गा, सिडको, हडकोसह शहरातील मुख्य बाजारपेठेत पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

कंडोम कंपन्यांना न्यायालयाने फटकारले

कंडोमची विक्री करण्यासाठी उत्पादनाच्या पाकिटांवर अश्लिल छायाचित्र लावणे चुकिचे असल्याचे स्पष्ट करत विक्रीसाठी अश्लिल जाहीराती करणार्‍या कंडोम कंपन्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
एका जनहीत याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश ए के गांगुली आणि न्या. पी ज्योतिमनी यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय सुनावताना कंपन्यांवर ताशेरे ओढले. अशा स्वरुपाच्या जाहीराती आणि पाकिटांवरील छायाचित्रांमुळे चुकिचा संदेश जात असल्याचे याचिकाकर्ते सी रवीकुमार यांचे म्हणणे होते.

भारतीय फलंदाजांची तंबूकडे पळापळ

भारतीय गोलंदाजांना धू धू धुतल्यानंतर श्रीलंकेने 600 धावांचे लक्ष्य भारतीयांना दिले होते. पण त्याचा पाठलाग करताना ज्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंवर कर्णधार कुंबळेने विश्वास व्यक्त केला होता, त्यांनीच तंबूत परतून कुंबळेचा विश्वास श्रीलंकेच्या समुद्रात बुडवला. भारताची भक्कम फलंदाजी १४६ धावांवर ६ बाद अशी केव्हाही मान टाकेल अशा स्थितीत आहे.
आयपीएल लीगमध्ये झटपट धावा काढण्याची सवय लागलेले भारतीय फलंदाज आज सारे तंत्र विसरुन केवळ धावांच्या मागे लागल्याचे चित्र दिसत होते. यात पहिला बळी गेला तो, सेहवागचा. सेहवाग 25 धावांचे योगदान देत तो पव्हेलियनमध्ये परतला. त्याला कुलशेखराने तंबूत धाडले.
यानंतर सचिन आणि गंभीर यांच्याकडून भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा होत्या परंतु, तेही स्वस्तात तंबूत परतले. यापूर्वी भारताची भिंत अर्थात राहूल द्रविड कोसळला. नंतर गांगुली दादाही आल्या पावली परत गेला.
कार्तिकलाही मुरलीने परत पाठवल्यावर कर्णधार कुंबळे आणि लक्ष्मण आता मैदानावर टिकून आहेत. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची ६ बाद १४७ अशी अवस्था होती. आता भारतावर फॉलोऑचे संकट आहे.

दवाखाना सुरू करताना पोलिसांकडे नोंदणी आवश्‍यक करणार

मुंबई, २५ जुलै - बोगस डॉक्‍टरांना आळा घालण्याच्या उद्देशाने वैद्यकीय पदवीधराने नवीन दवाखाना सुरू करताना स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये नोंदणी केली पाहिजे, असा नियम करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी शुक्रवारी विधान परिषदेत ही घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उषा दराडे आणि इतर तीन सदस्यांच्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना राज्यमंत्र्यांनी बोगस डॉक्‍टरांचे प्रमाण मुंबईत अधिक असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यात २८ बोगस डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
पोलिस ठाण्यात डॉक्‍टरांना अशी नोंदणी करावयास लावणे अवमानकारक असल्याचे मत शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. त्यावर पेईंग गेस्ट, पोटभाडेकरू ठेवतानाही घरमालकाने पोलिसांना कळवावे अशी तरतूद आहे, याकडे राज्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

नवी मुंबईत आता पावणेसहा तास भारनियमन

नवी मुंबई, २५ जुलै - एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावाजलेल्या नवी मुंबईतील वीज भारनियमनाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून, चार तासांचे भारनियमन आता पावणेसहा तासांपर्यंत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

समाजवादी पक्षाचे ६ खासदार निलंबित

लखनऊ, २५ जुलै- केंद्रातील संपुआ सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी संसदेत हजर राहून सरकारच्या बाजुने मतदान करण्यासाठी समाजवादी पक्षाने खासदारांसाठी जारी केलेला व्हिप धुडकावून अनुपस्थित राहीलेल्या सपा खासदारांवर आज शुक्रवारी पक्षाने कठोर कारवाईचा बडगा उगारत त्यांना निलंबित केले.

वसंत डावखरेंना जीवे मारण्याची धमकी, चौकशीचे आदेश

मुंबई, २५ जुलै- विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आज विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर विधान परिषदेत दिली. या घटनेची दोन दिवसात चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राज्य सरकारला दिले आहेत.
या प्रकरणी, शुक्रवारी विधान परिषदेत फुंडकर यांनी डावखरेंना गुन्हेगारी टोळ्यांकडून मिळणा-या जीवे मारण्याच्या धमक्यासंदर्भात पत्र वाचून दाखविले. पत्रात डावखरे यांच्या नावाची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
डावखरे यांना जीवे मारण्याची धमकी गॅंगस्टर किरण पुजारीने दिली आहे, असे हिरामण शहा यांनी पत्राद्वारे कळवले आहे. पुजारी सध्या मटकाकिंग सुरेश भगतच्या खुनप्रकरणात गजाआड आहे. भांडुपचे आमदार संजय पाटील यांचेही अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख या पत्रात आहे, फुंडकर यांनी सभागृहात सांगितले.

बंगलूरुमध्ये साखळी स्फोट, तिन ठार

बंगलूरू, २५ जुलै - बंगलूरुमध्ये आज पाच साखळी स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. हे स्फोट कमी तिव्रतेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी, यात आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. यानंतर देशातील महत्वांच्या शहरांमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले असुन, बॉम्बशोधक पथकांनी बंगलूरु मधील अनेक महत्वांच्या जागी शोध मोहिम सूरु केली आहे.
बंगलूरुचे पोलिस आयुक्त सिकंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला स्फोट नयंद इल्ली भागात झाला। ही मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांना लक्ष्य करुनच हे हल्ले करण्यात आले. यानंतर माडीवाला, आरुगोडी, राजा राम मोहन जंक्शन, आणि कोडा मंगला भागात एका पोठोपाठ स्फोट झाल्याने बंगलूरसह कर्नाटक हादरले.
या स्फोटात अंबु, आणि मुनी हे दोन नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शहरभर सतर्कतेचे आदेश देत जागोजाग शोध मोहिम सुरु केली आहे.

गुरुवार, 24 जुलाई 2008

सट्टा बाजारात पंतप्रधान मनमोहन जिंकले

संपुआ सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी होईल किंवा नाही हे आकडयांच्‍या युध्‍दात आजतरी सांगणे कठीण आहे. असे असले तरीही सट्टा बाजारात मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी ठरले आहेत. सरकार पाडण्‍या आणि जोडण्‍यासाठी दोन्‍ही बाजूने प्रयत्‍न केले जात आहेत.
क्रिकेटमध्‍ये सट्टा लावून लाखों रुपयांची कमाई करणा-या सटो-यांनी यावेळी राजकीय खेळात पेसा लावला आहे. एका बुकीकडून नाव जाहीर न करण्‍याच्‍या अटीवर दिलेल्‍या माहितीनुसार मनमोहन सरकारच्‍या बाजूने १५ अब्‍ज रुपयांचा सट्टालावण्‍यात आला आहे.

पंतप्रधान-सोमनाथदांचे गुफ्तगू

नवी दिल्ली, २४ जुलै-सोमनाथदांना डाव्यांनी डच्चू दिल्यावर गुरुवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत काय गुफ्तगू झाले हे कळले नसले तरी या भेटीमागे राजकीय समीकरणे असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेली ४० वर्षे संसदेत कम्युनिस्ट गडाचा आधारस्तंभ असणा-या सोमनाथ चटर्जी यांनी फक्त एकदा पक्षादेश पाळला नाही , म्हणून त्यांना दरवाजा दाखवण्यात आला. माकपच्या या निर्णयाविरुद्ध देशभर नाराजीचे वातावरण तयार झाले असून सोमनाथदांना सहानुभुती मिळत आहे. कदाचित याच वातावरणाचा परिणाम म्हणून पंतप्रधान सोमनाथदांना भेटायला गेले असतील , असे म्हटले जात आहे.
खरं तर येत्या शुक्रवारी आपला ८०वा वाढदिवस साजरा करणा-या चटर्जी यांना पक्षाने दिलेला झटका अनपेक्षित नव्हता. पण तरीही या निर्णयावर चटर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढील महिन्यात कॉमनवेल्थ संसदीय बैठकीसाठी आपण क्वालालांपूरला जाणार आहोत , असे त्यांनी बुधवारीच स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे पुढील काही दिवसात सोमनाथदांचे काय होणार याकडे सा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आता इन्कम टॅक्स भरा बॅंक खात्यातून

नवी दिल्ली, २४ जुलै- करदाते आता स्वतःसह कोणाच्याही बॅंक अकाऊंटच्या माध्यमातून तसेच डेबिट व क्रेडिट कार्डच्या सहाय्याने प्राप्तीकर भरू शकतात. प्रत्यक्ष कराच्या मध्यवर्ती मंडळाने (सीबीडिटी) ही माहिती दिली.
देशातील व काही परदेशातील करदात्यांना इंटरनेटद्वारे कर भरण्यात अडचण येत होती. त्याचा विचार करून मंडळाने हा निर्णय घेतला. काही कंपन्या, व्यवसाय व व्यावसायिकांना यंदाच्या एप्रिलपासून इंटरनेटद्वारे कर भरण्याची सक्ती करण्यात आली होती.
करदाता व्यक्ती इतर व्यक्तीच्या खात्यातूनही कर भरू शकतो. मात्र, चलन भरताना त्याला स्वतःचा पॅन नंबर लिहावा लागेल, असेही सीबीडिटीने स्पष्ट केले आहे.

पोलिस शिपाई अपघातात ठार

मुंबई, २४ जुलै-तब्येत बरी नसल्याने मरोळ कॅम्प येथील सहकाऱ्याबरोबर परतताना झालेल्या अपघातात संजय पाटील हा पोलिस शिपाई मंगळवारी सकाळी मृत्युमुखी पडला. त्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी कार उलटून झालेल्या अपघाताची पाहणी करताना पोलिस सबइन्स्पेकर मागून येणाऱ्या बाइकस्वाराच्या धडकेत जखमी झाले.
त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वाशी चेकनाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर बुधवारी रात्री सुमो आदळली. त्यात सात जखमी झाले. तेथे तपासाला आलेल्या पीएसआय सुनील घास यांना मागून बाइकस्वाराने धडक दिली.

बुधवार, 23 जुलाई 2008

यापुढे नंबरप्लेटवर 'नेम' नाही

नाशिक, २३ जुलै-वाहनांच्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी आणि नियमांची पायमल्ली रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेबरोबरच आता आरटीओ कार्यालयानेदेखील वाहनांच्या नंबरप्लेट्सवर लक्ष केंदीत केले आहे. त्यामुळे यापुढे 'प्रेस', 'पोलिस' अशा प्रकारची नावे अथवा लोगो टाकण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
टारगट तरुणांचे 'कोयला'सारखे ग्रुप्स, पक्षाचे ध्वज, 'प्रेस' अशी अनेक नावे आणि लोगो यांनी 'नंबर'प्लेट्स व्यापलेल्या असतात। कित्येकदा नंबरप्लेट्सचा मूळ उद्देशच दूर राहिलेला दिसतो. विशेष म्हणजे या माध्यमातून आपण पोलिस असल्याचे सिद्ध करण्याचा आणि सर्वांना दाखवून देण्याचा मोह पोलिसही आवरू शकलेले नाहीत. ही सर्व धडपड ओळख पटवून देण्यासाठी. कुटुंबातील ज्येष्ठांपासून ते पोराबाळांपर्यंतच्या विविध नावांनीही नंबरची जागा बळकावल्याचे दिसते
वाहनधारकांच्या या हौसेमुळे वाहनचोर, गुन्हेगार, भुरटे चोर यांचे फावले आहे। वाहनावर नंबर टाकला नाही, अथवा केवळ दुबिर्णीतून पाहता येईल एवढ्याच आकारात नंबर टाकला तर ते चोरांच्या पथ्यावरच पडते. एखाद्याला धडक देऊन अथवा मुलींची छेड काढून पळून जाणाऱ्यांच्या वाहनांचे नंबर न दिसल्याने ही मंडळी पोलिसांच्या जाळ्यातून सहज सुटतात.
हे प्रकार थांबावेत यासाठी शहर वाहतूक शाखेने गेल्या महिन्यापासून नंबरप्लेट्सवर नंबरशिवाय इतर कुठलेही नाव अथवा लोगो असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे। मात्र, तरीही अनेक तरुण 'शूरवीरां'नी आपला प्रताप सुरूच ठेवला आहे. नियमभंगाची गंभीर दखल घेत, थेट आरटीओ कार्यालयाने अशा वाहनधारकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. 'कोणत्याही वाहनाच्या मालकाला नंबरप्लेटवर नंबरव्यतिरिक्त अक्षरे, अंक, शब्द, चित्र किंवा स्टिकर्स लावता येणार नाहीत. तसे करण्यास मोटार वाहन नियम १९८९ अन्वये बंदी आहे.
नंबरशिवाय इतर कोणतीही अक्षरे किंवा लोगो लावण्यासाठी वाहतूक आयुक्तांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल', असा आदेश आरटीओ अधिकाऱ्यांनी काढला आहे. आरटीओ आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त मोहीमेतून नंबरप्लेट्सवरचे 'प्रेम' दूर व्हायला वेळ लागणार नाही.

पुणे पोलिसांना ५० हजारांचे बक्षीस

पुणे, २३ जुलै-पुण्यात बनावट केडिट कार्ड तयार करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश करून, त्या आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी केल्याबद्दल पुणे पोलिसांच्या तपास पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत जाहीर केले.
पुण्यातील ली-मेरिडियन हॉटेलमध्ये जेवणाचे बिल केडिट कार्डद्वारे दिले असता, त्याच हॉटेलचा एका कर्मचारी केडिट कार्डधारकाच्या कार्डमधील डेटा लॅपटॉपमध्ये घेऊन त्याद्वारे बनावट केडिट कार्ड तयार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणातील आरोपी वसीम समी पटेल याच हॉटेलचा कॅशियर असून, त्याच्याकडून दोन लॅपटॉप, एक स्कीमर, रिलायन्स कंपनीचा एक कनेक्टर, एक कार्ड रीडर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी लक्षवेधीवरील उत्तरात दिली.
यासंदर्भात आठ आरोपींना अटक झाली असून अन्य फरारींचा शोध सुरू आहे. सायबर क्राइमचा तपास जलद गतीेने व्हावा, यासाठी पुण्यातील ७०९ आणि मुंबईतील १३०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्षभरात पाच हजार पोलिसांना सायबर क्राइम तपासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच सर्व पोलिस आयुक्तांच्या कार्यकक्षेत सायबर सेलमध्ये सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.

'गद्दार' हरिभाऊ राठोड भाजपातून निलंबित

मुंबई, २३ जुलै-गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू आणि यवतमाळचे विद्यमान खासदार हरिभाऊ राठोड यांना भाजप नेतृत्वाने त्यांच्या ‘ गद्दारी ’ ची सजा दिलीय. लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमके गैरहजर राहणारे खा. राठोड यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलेय. दरम्यान, आपणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपसह अनेक पक्षांकडून ऑफर असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केलेय.
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या वेळी दिवसभर हरिभाऊ राठोड लोकसभेत हजर होते। परंतु मतदानाच्या निर्णायक वेळेआधीच ते सभागृहातून बाहेर निघून गेले, ते पुन्हा लोकसभेत आलेच नाहीत. मतदानाच्या वेळी गैरहजर राहून त्यांनी एकप्रकारे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला मदतच केल्याचा ठपका त्यांच्यावर आला आहे. या गैरहजेरीची पुरेपूर ‘ किंमत ’ त्यांनी वसूल केल्याची चर्चा दिल्लीत आहे.
विशेष म्हणजे राठोड यांच्या या गद्दारीमुळे गोपीनाथ मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत। राठोड हे बंजारा समाजाचे असून, मुंडे यांच्या गोटातील आहेत. मुंडे उपमुख्यमंत्री असताना ते त्यांचे स्वीय सहाय्यक होते. मुंडेंच्याच शिफारशीवरुन त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली व यवतमाळमधून ते खासदार म्हणून निवडूनही आले. परंतु लोकसभा मतदारसंघ फेररचनेत त्यांचा यवतमाळ मतदारसंघ वाशिममध्ये विलीन झाला आहे. तेथून शिवसेनेच्या भावना गवळी खासदार असल्याने युतीच्या जागावाटपात तो मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. परिणामी राठोड यांना काहीही आसरा न उरल्याने त्यांनी जाता जाता स्वतःचा राजकीय आणि आर्थिक फायदा करुन घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बसपकडून आगामी लोकसभा निवडणूक वाशिममधून लढवण्याची त्यांची इच्छा असल्याचे समजते. त्यापैकी राष्ट्रवादीचा पर्याय ते निवडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, हरिभाऊ राठोड यांनी मात्र आपल्यावरील गद्दारीच्या आरोपांचा इन्कार केला आहे। माझी प्रकृती अचानक बिघडल्याने मतदानाच्या वेळी हजर राहू शकलो नाही. मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. आयसीयूमध्ये मोबाईल फोन वगैरे काढून घेतल्याने मला पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधता आला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपण सभागृहात हजर असता तर कुणाला पाठिंबा दिला असता, अशी विचारणा केली असता, नक्की सांगता येणार नाही. परंतु मनमोहन सिंग यांचे सरकार पडता कामा नये, अशी आपली मनापासून इच्छा होती, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. कालपासून मला अनेक पक्षाच्या नेत्यांनी फोन केलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपचे नेतेही संपर्कात असून, त्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली आहे, असा खुलासाही राठोड यांनी यावेळी केला.
मतदानाच्या वेळी गैरहजर राहणारे हरिभाऊ राठोड आणि तुकाराम रेंगे पाटील यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व मुंडे विरोधक नितीन गडकरी यांनी केली आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या दोघांनाही लक्ष्मीदर्शन केले. त्यांचे फोन रेकॉर्डस् चेक करावेत, अशी मागणी करतानाच बेइमान, विश्वासघातकी राठोड यांना पक्षात ठेवणार नाही, अशी तिखट प्रतिक्रियाही गडकरी यांनी व्यक्त केली.

सोमनाथ दादांची हकालपट्टी

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी टाकलेला दबाव लाथाडल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांपैकी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) सोमनाथ चटर्जी यांच्याविरूद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। माकपच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोमनाथ चटर्जी यांनी माकपकडून कोणतीही नोटीस मिळाल्याचा मंगळवारी इन्कार केला होता. तसेच माकप नोटीस पाठवू शकत नाही कारण आपण पॉलीट ब्युरोचे सदस्य नाही. त्यामुळे राजीनामा द्यायचा कि नाही ते ठरविण्याचा अधिकार केवळ आपल्यालाच असल्याचे म्हटले होते.

माझे आंदोलन मराठी बाण्‍यासाठी- राज ठाकरे

नवी दिल्ली, २३ जुलै-माझे आंदोलन मराठी बाण्‍यासाठी तो जपणा-या महाराष्‍ट्रासाठी आहे. शिक्षण संस्‍था चालकांविरोधात माझे कार्यकर्ते आंदोलन करीत नाही तर स्‍थानिक विदयार्थ्‍यांना डावलून चुकीच्‍या मार्गाने परप्रांतीय विदयार्थ्‍यांना प्रवेश देणा-या प्रवृत्‍तींसोबत आहे, आणि ते सुरूच राहणार असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केले.
पुणे येथे मनसेच्‍या आंदोलनाची भूमिका स्‍पष्‍ट करण्‍यासाठी त्‍यांनी पत्रकार परिषदेत मनसेची भूमीका स्‍पष्‍ट केली. राज्‍यातील खाजगी शिक्षण संस्‍था त्‍या स्‍थापने संदर्भातील उदेशही विसरल्‍या आहेत. राज्‍यात नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवून मराठी मुलांना प्रवेशासाठी प्राधान्‍य दिले गेले पाहिजे. शिवाय संस्‍था चालकांनी प्रवेश देणार असलेल्‍या विदयार्थ्‍यांच्‍या नावांची यादीही जाहीर करावी. असे फर्मान काढीत त्‍यांनी राज्‍यातील शिक्षण पध्‍दतीवरही कडाडून टीका करताना पुरकेंमुळे विदयार्थ्‍यांचे भवितव्‍य बघिडल्‍याचा आरोप केला आहे.
मनसेने केलेल्‍या आंदोलनात कार्यकर्त्‍यांना जाणून-बूजून टार्गेट केले जात असल्‍याचा आरोप करून त्‍यांनी आपल्‍या कार्यकर्त्‍यांवर जाणून-बाजून अनेक केसेसही करण्‍यात आल्‍या असल्‍याचा आरोप केला आहे. मात्र राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांना वेगळा न्‍याय देउन त्‍यांचे संरक्षण केले जात असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.

भाजपचे 8 खासदार निलंबित

नवी दिल्‍ली, २३ जुलै-संसदेत विश्‍वासमत ठरावाच्‍या वेळी पक्षातून फुटून पक्षविरोधी मतदान व अनुपस्थित राहिल्‍याबददल भाजपने आपल्‍या 8 खासदारांना निलंबित केले आहे. या खासदारांमध्‍ये दमोह मतदार संघाचे खा.चंद्रभान, बृजभूषण शरण, मनोरमा माधवराज, सोमाभाई पटेल, सांगलियाना, बाबूभाई कटारा, मंजूनाथ आणि हरिभाऊ राठोड यांचा समावेश आहे.
संपुआ सरकारने लोकशाही मूल्‍यांचा -हास केल्‍याचा आरोप करीत भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्‍याचाही निर्णय जाहीर केला आहे. भाजपच्‍या सुत्रांनी सांगितले, की पक्षशिस्‍त न पाळणा-याविरुध्‍द पक्षाने नेहमीच कारवाई केली आहे. ज्‍या खासदारांनी पक्षादेश न पाळून पक्ष विरोधी मतदान केले आहे. अशा खासदारांना निलंबित करण्‍याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
पक्षाचया एका ज्‍येष्‍ठ नेत्‍याने आपल्‍या खासदारांनी पक्षादेशाविरुध्‍द मतदान कसे केले याचे आश्‍चर्य वाटत असल्‍याचे सांगितले. दलित महिला पंतप्रधान बनलेले भाजपला नको होते त्‍यामुळे त्‍यांनी कॉंग्रेससोबत मिळून सरकार वाचविले असा बसपा नेत्‍या मायावतींनी केलेला आरोप चुकीचा असल्‍याचे पक्ष नेत्‍यांनी सांगितले आहे.

मंगलवार, 22 जुलाई 2008

लोकशाहीच्या मंदिराला काळीमा

नवी दिल्‍ली, २२ जुलै-संसदेच्या इतिहासात धक्कादायक अशी घटना आज घडली.सरकारकडून मतदान करण्यासाठी आपल्‍याला २५ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपचे मुरैना (मध्य प्रदेश) येथील खासदार अशोक अर्गल यांनी केला आणि आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी नोटांची बंडलेच लोकसभेत आणली.
अर्गल यांच्या कृतीने लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू झाला। भाजपसह विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. या गोंधळातच सभापती सोमनाथ चटर्जी यांनी संसदेचे कामकाज स्थगित केले. दरम्यान, डाव्या पक्षाचे नेते ए. बी. बर्धन यांनी खासदारांना विकत घेण्यासाठी २५ कोटी रूपयांचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अर्गल यांनी थेट पैशांचे पुडकेच लोकसभेत आणून या आरोपांची पुष्टी केली. आपल्याला ४ फिरोजशहा रोड येथे पैसे देण्यात आल्याचे अर्गल यांचे म्हणणे आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पी। व्ही. नरसिंहराव यांच्या काळात खरेदी करण्यात आले होते, तसेच हे प्रकरण असून त्याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी केली. खासदारांचा घोडेबाजार होतो आहे, हे आम्ही म्हणत होतोच, त्याला आता पुष्टी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.मध्य प्रदेशातील आणखी एका खासदारासह भाजपच्या एकूण तीन खासदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून त्यात एका टिव्ही चॅनेलच्या बातमीदाराची मदत घेण्यात आल्याचेही अडवानी यांनी सांगितले.
दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा अडवानी यांनी रचलेला कट आहे, असे सांगितले. सकाळी खासदार पप्पू यादव याने आपल्याला खरेदी करण्यासाठी पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप केल्यानंतर अडवानी संसदेतून गायब झाले होते. या काळात त्यांनी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित खासदाराची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

रालोआपेक्षा संपुआ सरकार विकासाचे - चिदंबरम

संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार हे विकासाचे सरकार असून सरकारने साडेचार वर्षांत देशात मोठया प्रमाणावर विकासाच्‍या योजना राबविल्‍या आहेत. शेतक-यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी सरकारने भरीव काम केले आहे. त्‍यामुळे हे सरकार यापूर्वीच्‍या राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सरकारपेक्षा कैकपटीने चांगले असल्‍याचा दावा अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी विश्‍वासमत ठरावात सरकाची बाजू मांडताना केला.
शेतक-यांची आत्‍महत्‍या हे सरकारचे अपयश असल्‍याचे मला मान्‍य आहे. मात्र गेल्‍या वर्षी शेतक-यांना सरकारने ६६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्‍या चार वर्षांपासून राष्‍ट्रीय विकासाचा दर ८.९ टक्‍के राखण्‍यात सरकारला सातत्‍याने यश आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
विश्‍वासमत ठरावा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून ठरावाच्‍या संदर्भात मतदानापूर्वी चिदंबरम यांनी सरकारने केलेल्‍या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. राष्‍ट्रीय विकासाचा दर, कृषीक्षेत्रासाठी केलेली भरीव तरतुद यासह सरकारच्‍या कामातील पारदर्शकतेबाबत त्‍यांनी मुददेसूद भाषण केले. सरकारने प्रत्‍येक गोष्‍ट पारदर्शीपणे केली. भारत महासत्‍ता व्‍हावा असा कॉंग्रेसपक्षाचा प्रयत्‍न आहे. त्‍यामुळे अणू करार हा देशहिताचा आहे आणि तो देशाचे हित जोपासून करण्‍याची गरज असल्‍याचा पुनरुच्‍चारही त्‍यांनी केला.
सभागृहात त्‍यांचे भाषण सुरू असताना ब-याच वेळा गोंधळ झाला. सभापतिंनी वारंवार समज देउनही सदस्‍यांनी सभागृहात गोंधळ सुरूच ठेवल्‍याने त्‍यांच्‍या भाषणात वारंवार व्‍यत्‍य आणण्‍याचा प्रयत्‍न विरोधकांनी केला.

सोमवार, 21 जुलाई 2008

खासदार हरिश्चंद्र चव्हाण एअर अँब्युलन्समधून दिल्लीकडे

नाशिक, अपघातात जखमी झालेले मालेगावचे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण उद्या संसदेत विश्वासदर्शक ठरावावर होणा-या मतदानासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी भाजपने एअर अँब्युलन्सची व्यवस्था केलेय. ते आज संध्याकाळपर्यंत राजधानीत पोहोचतील, असे समजते.
अलीकडेच एका अपघातात, खासदार चव्हाण यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते संसदेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अनिश्चितता होती. परंतु, विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात, एक-एक मत निर्णायक ठरणार असल्याने, त्यांना दिल्लीत घेऊन जाण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यानुसार, मुंबईहून एक खास वैद्यकीय पथक नाशिकला गेलं, त्यांनी चव्हाणांच्या तब्येतीची तपासणी केली आणि कुटुंबियांशी चर्चाही केली. त्यानंतर त्यांना एअर अँब्युलन्समधून दिल्लीला नेण्याचं ठरलंय. आता ते उद्या संसदेच्या लॉबीमधून मतदान करतील.

बसपाच्या चारशेहून अधिक कार्यकर्त्यांची सोडचिठ्ठी

नागपूर, महाराष्ट्राचे प्रभारी कर्नल सुधीर सावंत यांना , कॉंग्रेसचा हेर असा ठपका ठेवून बहुजन समाज पक्षातून काढल्यामुळे बसपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला. नागपुरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट झाले.
सावंत यांना पक्षातून काढून टाकल्याला विरोध म्हणून सुमारे चारशेवर कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांच्याकडे राजीनामे देऊन बसपाला सोडचिठ्ठी दिली.
बहुजनांच्या हाती सत्ता देण्याचे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी राजीनामा दिलेले सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रात मिशनरी कार्यकर्त्यांची शक्ती उभारणार असल्याचा संकल्प कर्नल सावंत यांनी बोलून दाखवला. सुमारे एक ते दीड हजारांवर कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात तो स्वीकारला. बैद्यनाथ चौकातील कामगार भवन सभागृहात आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतूनही बसप कार्यकर्ते आले होते. बसप आणि बामसेफ मिशनमधील जुन्या कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आलं होतं.
कांशीराम यांच्या मिशनवर श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांची शक्ती महाराष्ट्रात उभी करण्यात येणार असल्याती माहितीही यावेळी बोलताना सावंत यांनी दिली. या शक्तीतून बसप प्रदेशाध्यक्ष विलास गरूड आणि त्यांच्या कंपूचे खरे स्वरूप मायावती यांच्या नजरेत आणून देण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली. आपण त्यांच्या भूलथापांना बळी न पडल्यामुळे , मायावतींकडे आपली तक्रार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधानसभेत पुरकेसरांविरोधात हक्कभंग

मुंबई-राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलेत. यावेळी, शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन शिकवण्याचा मुद्दा त्यांच्या अंगाशी आलाय. लैंगिक शिक्षण शिकवण्यास विधानसभेनं स्थगिती दिली असतानाही, गेल्या आठवड्यात पुरके सरांनी या विषयाबद्दल आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
शालेय शिक्षणात, लैंगिक शिक्षण या विषयाचा समावेश करण्याचा विषय अलीकडे खूपच गाजला होता. परंतु त्याहीआधी, गेल्या वर्षीच विधानसभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी हा विषय शिकवण्याला स्थगिती दिली होती. असं असतानाही, शिक्षणावरील चर्चेला उत्तर देताना वसंत पुरके यांनी, सेक्स एज्युकेशन शिकवण्यावरून आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या या भाषणाकडे लक्ष वेधून, हा सभागृहाचा अवमान असल्याचा मुद्दा शोभाताई फडणवीस यांनी उपस्थित केला. भंडारा जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये हा विषय शिकवला जात असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं.
बाबासाहेब कुपेकर यांनी हा हक्कभंग दाखल करून घेतला असून पुरकेंना स्पष्टीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुरकेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

"रालोआ'तील दहा खासदार उद्या अनुपस्थित राहणार?

नवी दिल्ली - विश्‍वासदर्शक ठरावावर मंगळवारी मतदान होणार असतानाच सोमवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) फूट पडल्याची चर्चा राजधानीमध्ये सोमवार दुपारपासून होती.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दहा खासदार मतदानाच्यावेळी अनुपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. यामध्ये गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी दोन खासदारांचा, बिजू जनता दलातील एकाचा, संयुक्त जनता दलातील दोघांचा आणि शिवसेनेतील एका खासदाराचा समावेश आहे.
विरोधी पक्षातील दहा खासदार अनुपस्थित राहणार असल्याच्या शक्‍यतेमुळे सोमवारी सत्ताधारी पक्षातील खासदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सभागृहात अशा घडल्‍या घडामोडी

अणू कराराच्‍या मुदयावरून डाव्‍या पक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्‍यानंतर पंतप्रधानांना विश्‍वासमत प्रस्‍ताव मांडण्‍यासाठी संसदेच्‍या विशेष अधिवेशनास आज सुरूवात झाली। अधिवेशनास सुरूवात झाल्‍यानंतर घडलेल्‍या काही प्रमुख घडामोडी अशा -
१) सभापती सोमनाथ चॅटर्जी सकाळी लोकसभेत आले आणि त्‍यांनी विश्‍वासमत प्रस्‍तावापूर्वी राजीनामा देणार नसल्‍याचे सिध्‍द केले.
२) संसदेत साडेचार वर्षातील सर्वाधिक संख्‍या आज पहावयास मिळाली.
३) सत्ताधा-यांच्‍या बाजूने एकही आसन रिकामे नव्‍हते मात्र विरुध्‍द पक्षाच्‍या बाजूने काही जागा रिकाम्‍या होत्‍या.
४) सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनुपस्थित होते.
५) राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव उर्फ मोहम्मद शाहबुद्दीन सभागृहात उपस्थित. सभागृहाच्‍या एका विशेष पत्राने त्‍यांना उपस्थितीसाठी परवानगी मिळविण्‍यात आली आहे.
६) नेहमीच गंभीर वाटणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आज प्रचंड आत्‍मविश्‍वासात सभागृहात प्रवेश करण्‍यापूर्वी त्‍यांनी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींकडे 'व्‍ही'खूण करून आपला विजय निश्चित असल्‍याचे पुन्‍हा अधोरेखित केले.
७) विश्‍वासमत प्रस्‍तावास सुरुवात होण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी सोबतच्‍या कुठल्‍यातरी विषयावर हसतानाही ते दिसून आले.
८) कामकाजास सुरूवात होताच सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. सभापतिंनी समज दिल्‍यानंतर घोषणा बंद.
९) मृत सदस्‍यांना श्रध्‍दांजली प्रस्‍तावाच्‍या वेळीही सदस्‍यांची चुळबूळ, सभापती रागावल्‍यानंतर शांतता.
१०) पंतप्रधानांनी केवळ तीन ओळीत विश्‍वासमत प्रस्‍ताव सादर केला.
११) कॉंग्रेस देशभक्‍त पक्ष असल्‍याचा प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन.
१२) विरोधी पक्ष नेते अडवाणींनी सरकारची अवस्‍था आयसीयुतल्‍या रुग्‍णासारखी झाल्‍याचा आरोप केला.
१३) सरकारला पराभूत करणे हा उददेश सरकार अस्थिर करायची नाही- आडवानी.
१४) सरकार बहुमतात- प्रणव मुखर्जी .
१५) मुखर्जी यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर सभागृहात गोंधळ.
१६) सभागृह 3 वाजेपर्यंत तहकूब .
१७) कामकाज 3 वाजेनंतर सुरू झाल्‍यानंतर पुन्‍हा गोंधळ.
१८) सदस्‍यांचे एकमेकाविरोधात आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी.

एसटीचालकाला वाईत मारहाण केल्याने "कामबंद' आंदोलन

वाई - वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याने चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ वाई आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक "काम बंद' आंदोलन केले. त्यामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली.
सर्जेराव नाना धायगुडे असे या चालकाचे नाव असून, त्याला वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धायगुडे दुपारी बाराच्या सु मारास खंडाळा आगाराची गाडी घेऊन वाईला येत होते. वाईजवळच्या एमएसईबी कार्यालयाजवळ गाडी न थांबविल्यामुळे गाडीतून प्रवास करणारा एमएसईबीचा अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात धायगुडे जखमी झाले.
घटनेचे वृत्त समजताच वाई आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले. पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

रविवार, 20 जुलाई 2008

रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?

नवी दिल्ली, २० जुलै-शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईसाठी ट्रेनमधे बसल्यानंतर परभणीचे खासदार तुकाराम रेंगे पाटील गायब झालेत. ते स्वतःच लपलेत , शिवसेनेने त्यांना गायब केलंय की नारायण राणेंनी , अशा चर्चा सुरू आहेत.
रविवारी दुपारी दिल्लीत शिवसेनेच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली। रेंगे पाटील त्याला हजर नव्हते. आमच्या अकरा खासदारांपैकी एकटे रेंगे पाटीलच आले नाहीत , असे पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले. रेंगे पाटलांच्या कुटुंबियांनी ते बैठकीला येत असल्याचे सांगितले होते , पण ते बैठकीला आलेच नाहीत , असेही राऊत म्हणाले.
रेंगे पाटलांच्या घरातलेही त्यांचा ठावठिकाणा सांगत नाहीत. त्यांना तो माहितच नाही , असा त्यांचा दावा आहे. शिवसेनेचे नेतेही चूप आहेत. तसेच रेंगे पाटलांशी गेले काही महिने जवळीक असलेले महसूल मंत्री नारायण राणेही याविषयी काहीच बोलायला तयार नाहीत.
यावेळी रेंगे पाटील काँग्रेसच्या बाजूने मतदान करतील , अशी खात्री सगळ्यांनाच होती. अगदी शिवसेना नेत्यांनाही होती. स्थानिक पक्षांतर्गत वादांमुळे त्यांची तिकीट कापली जाणे नक्की मानले जात होते. त्यामुळे कणकवलीत राणेंच्या गुंडांकडून मारहाण झालेले रेंगे पाटील काही महिन्यांपूर्वी राणेंच्या मुलाच्या लग्नाला हजर राहिले होते. गेले काही दिवस राणे शिवसेना खासदारांना आपल्या गळात ओढण्याच्या प्रयत्नात होते. त्यात रेंगे पाटलांशीही त्यांचा संपर्क असल्याची चर्चा खुलेआम होती. रेगेंना गायब करून थेट मतदानासाठी त्यांनी हजर केले , तर दिल्ली दरबारी त्यांची वट वाढणार आहे. तसेच रेंगेंनी मुख्यमंत्र्यांशी संधान बांधल्याच्या बातम्याही स्थानिक वृत्तपत्रांतून आल्या होत्या. त्याचाही संदर्भ या सगळ्याशी जोडून घेतला जात आहे.
दुसरीकडे शिवसेना ' गद्दारी ' शी अशाप्रकारे लढण्यात माहिर मानली जाते. शिवसेना रेंगे पाटलांच्या गायब होण्याविषयी मौन पाळून आहे , त्यामुळे हे सेनेचेच पराक्रम असावेत , अशी शंका घेतली जात आहे. रेंगे पाटलांनी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी त्यांना मतदान करूच देऊ नये , असे सेनेने ठरवले असावे.

मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास आंदोलनाची पुनरावृत्ती - राज ठाकरेंचा इशारा

पुणे - महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांनी कायद्यानुसार ८५ टक्के महाराष्ट्रातील मुलांना प्रवेश दिलाच पाहिजे. या संस्थांचे प्रवेश पार पडून याद्या जाहिर होईपर्यंत आम्ही शांत राहू. मात्र, त्यामध्ये मराठी मुलांना प्रवेश मिळाले नाहीत, तर पुन्हा या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करून किंवा तुरुंगात पाठवून हे आंदोलन थांबेल, असे वाटत असेल, तर तो भ्रम आहे, पाचशे कार्यकर्ते अटक झाले, तर पाच हजार कार्यकर्ते उभे राहतील, असेही त्यांनी बजाविले.
दरम्यान, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारशी केल्या असतील, तर त्यांना पदावरून काढून टाकू, असे ते म्हणाले.

पैशासाठी आपलेच घुसवताय परप्रांतियांनाः राज ठाकरे

पुण्याच्या आजूबाजूला ज्यांनी हजारो एकर जमीन घेतली आहे. त्यांना परप्रांतीय विद्यार्थ्यांचा ज्यांना पुळका सुटला आहे. आपल्या जमिनी विकण्यासाठी त्यांना उप-यांची मदत होते. शिक्षणासाठी आलेला राज्यात आलेला आपलं कायमचं बस्तान येथं बसतो. पैशासाठी आपलेच अशा परप्रांतियांना घुसवत असल्याचा टोला शरद पवार यांचं नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारला.
मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशात प्राधान्य मिळावे यासाठी मनसेने गेल्या आठवड्यापासून ४६ शिक्षण संस्थाविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या लोकांमुळे यापूर्वी मुंबईची वाट लागली आहे. आता पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची वाट लागणार आहे. जो तरुण शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतो. त्याला कॅम्पस इंटरव्हूवद्वारे इथेच नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर घर विकत घेऊन तो इथचं आपलं बस्तान मांडतो. हजारो एकरमध्ये उभारलेल्या आपल्या स्कीम खपवण्यासाठी या परप्रांतीयांचा उपयोग होतो. त्यामुळे याला सर्वस्वी आपले माणसे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे राज्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, या मुद्याला हात घालत राज ठाकरे म्हणाले, शिक्षणाचा धंदा करायचा असेल तर काढा, महाराष्ट्राचं ग्लोबल टेंडरच काढा ! मागासलेल्या राज्यातली म्हणून जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात ते ४० ते ५० लाख रुपये डोनेशन भरून प्रवेश घेतात. त्यावेळी हा पैसा कुठू आणला आहे. याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. पाटणा आणि लखनौ मध्ये तर येथील शिक्षणाच्या धंद्याच्या पाट्या लावल्या जातात.
आता अॅडमिशनची लिस्ट जाहीर होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. लिस्टमध्ये जर मराठी मुलांना प्राधान्य दिले नाही तर पुन्हा मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

मायावती पंतप्रधानपदाच्या उमेदवार?

नवी दिल्ली, २० जुलै-दिल्लीच्या गादीवर हक्क सांगण्याच्या दिशेने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुढचं पाऊल टाकलं आहे. विश्वासमताच्या लढाईत तिस-या आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे चालत आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची तिस-या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून बुधवारी घोषणा होण्याची शक्यता आहेय.
रविवारी रजा न घेता राजधानीतील राजकारण्यांनी मोठ्या घडामोडी सुरूच ठेवल्या। त्यात यूएनपीए म्हणजे तिस-या आघाडीला मायावतींनी आपल्या पदरात घेतल्याचं स्पष्ट झालं. समाजवादी पक्षाच्या जाण्यामुळे लुळ्या झालेल्या तिस-या आघाडीत हत्तीचं बळ आलं. सरकार पाडणं हा एकमेव अजेंडा ठरवत मायावती आणि त्यांच्या पाठोपाठ डावे तिस-या आघाडीबरोबर एकत्र आले. शिवाय कालपर्यंत काँग्रेससोबत असलेल्या देवेगौडा आणि अजित सिंग यांनीही त्यांची साथ देण्याची घोषणा केली.
मात्र हे सगळं घडत असताना भाजप कुठेच दिसत नव्हतं. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणींच्याकडे असणारं काँग्रेसविरोधाचं नेतृत्व मायावतींकडे सरकताना दिसत आहे. २३ तारखेला तिस-या आघाडीची बैठक होत असून त्यात मायावतींच्या नावाची पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होईल. मायावतींच्या प्रयत्नांमुळे मनमोहन सरकार पडलंच तर मायावती लगेचच पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर उभ्या राहतील. अन्यथा त्या लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत काँग्रेसच्या नाकी नऊ आणतील.
जर असे घडले तर अडवाणींची पंतप्रधान बनण्याची स्वप्ने धूसर होऊ शकतात. मात्र मायावतींच्या नेतृत्वातील तिसरी आघाडी प्रत्यक्ष निवडणुकांत काँग्रेससाठी खूपच घातक ठरू शकते.

मायावती पंतप्रधानपदाच्या उमेदवार?

नवी दिल्ली, २० जुलै-दिल्लीच्या गादीवर हक्क सांगण्याच्या दिशेने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुढचं पाऊल टाकलं आहे. विश्वासमताच्या लढाईत तिस-या आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे चालत आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची तिस-या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून बुधवारी घोषणा होण्याची शक्यता आहेय.
रविवारी रजा न घेता राजधानीतील राजकारण्यांनी मोठ्या घडामोडी सुरूच ठेवल्या। त्यात यूएनपीए म्हणजे तिस-या आघाडीला मायावतींनी आपल्या पदरात घेतल्याचं स्पष्ट झालं. समाजवादी पक्षाच्या जाण्यामुळे लुळ्या झालेल्या तिस-या आघाडीत हत्तीचं बळ आलं. सरकार पाडणं हा एकमेव अजेंडा ठरवत मायावती आणि त्यांच्या पाठोपाठ डावे तिस-या आघाडीबरोबर एकत्र आले. शिवाय कालपर्यंत काँग्रेससोबत असलेल्या देवेगौडा आणि अजित सिंग यांनीही त्यांची साथ देण्याची घोषणा केली.
मात्र हे सगळं घडत असताना भाजप कुठेच दिसत नव्हतं. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणींच्याकडे असणारं काँग्रेसविरोधाचं नेतृत्व मायावतींकडे सरकताना दिसत आहे. २३ तारखेला तिस-या आघाडीची बैठक होत असून त्यात मायावतींच्या नावाची पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होईल. मायावतींच्या प्रयत्नांमुळे मनमोहन सरकार पडलंच तर मायावती लगेचच पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर उभ्या राहतील. अन्यथा त्या लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत काँग्रेसच्या नाकी नऊ आणतील.
जर असे घडले तर अडवाणींची पंतप्रधान बनण्याची स्वप्ने धूसर होऊ शकतात. मात्र मायावतींच्या नेतृत्वातील तिसरी आघाडी प्रत्यक्ष निवडणुकांत काँग्रेससाठी खूपच घातक ठरू शकते.

सोमनाथ चटर्जींनी बोलाविली संसद सदस्यांची बैठक

नवी दिल्ली - केंद्रसरकारच्या मंगळवारी होणाऱ्या विश्‍वासदर्शक ठरावासाठी संसदेच्या दोन दिवसीय विशेष सत्राच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी सोमवारी संसद सदस्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विश्‍वासदर्शक ठरावासंबंधी मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे.
अणुऊर्जा करारास विरोध करीत डाव्या पक्षांनी केंद्राचा पाठिंबा काढून घेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर चर्चा तसेच त्यानंतर मतविभागणीसाठी लोकसभेचे विशेष सत्र बोलाविण्यात आले आहे.

चंद्राबाबूंची मायावतींशी भेट

नवी दिल्ली, २० जुलै-संसदेत सादर होणार्‍या विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध मतदान करण्यासाठी तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बसपा नेत्या मायावती यांची भेट घेऊन रणनिती आखली असल्याचे वृत्त आहे.
आम्ही अणुकराराचा विरोध करत असून संसदेतही त्याचा विरोध करणार असल्याचे नायडू यांनी मायावतींशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले. ही बैठक जवळ जवळ दोन तास चालली होती.
संसदेत होणार्‍या विशेष सत्रात तेलगू देसम आणि बसपा संयुक्त रणनिती आखून कराराचा विरोध करणार आहेत. तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या दृष्टीने चंद्राबाबू आणि मायावती यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तेलगू देसमचे पाच खासदार असून त्यांनी ठरावाच्याविरूद्ध मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवार, 19 जुलाई 2008

मुंबईच्या युवकाचा आजऱ्यात धबधब्यात बुडून मृत्यू

कोल्हापूर - आजरा येथील रामतीर्थ धबधब्यात पाय घसरुन पडल्याने अनिल गजानन जाधव (वय-२६ मूळ रा. अँन्टाफ हिल, मुंबई. सध्या राहणार, सुभाषनगर) या तरुणाचा शनिवारी दुपारी बुडून मृत्यू झाला.
आपल्या नऊ मित्रांबरोबर जाधव धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. तेथील शेवाळावर त्याचा पाय घसरला. तोल न आवरल्याने त्याचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली.

दीड हजार मिस्डकॉल देणारा प्रेमवीर पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई - प्रेमाला नकार देणाऱ्या मैत्रिणीला दिवसाला दीड हजारहून अधिक मिस्डकॉल्स देऊन त्रास देण्याचा प्रकार मालाड येथील तरूणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. अनोळखी नावाने, दरवेळी वेगवेगळ्या सीमकार्डचा वापर करून मैत्रीण तसेच तिच्या आईवडिलांना त्रास देणारा हा माथेफिरू प्रियकर मालाड पोलिसांच्या कोठडीत आहे.
अविनाश डोके (२५) असे या अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारबाजार परिसरात राहणाऱ्या या तरूणाचे एका महाविद्यालयीन तरूणीवर एकतर्फी प्रेम होते. सी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या तरूणीला त्याने दहा महिन्यांपूर्वी प्रेमाबद्दल विचारणाही केली होती. मात्र या तरूणीने त्याला नकार दिला होता. अविनाशने तिच्या नकारानंतर मैत्री कायम ठेवली. गेल्या सहा महिन्यांपासून तो तरूणीला तिच्या मोबाईलवर दिवसाला शेकडो मिस्डकॉल्स व एसएमएस करू लागला.
सततच्या मिस्डकॉल्स आणि एसएमएसला कंटाळलेल्या या तरूणीने आपला मोबाईल क्रमांक तीन वेळा बदलला. यानंतर मात्र तिचे आई वडिल, मामा आदींना अशाच प्रकारे अविनाश त्रास देऊ लागला. हा सगळा उद्योग आपल्या ओळखीचाच तरूण करीत असल्याची माहिती तरूणीला मुळीच नव्हती.
याप्रकरणी तिने बुधवारी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस निरिक्षक दिपक फटांगडे व उपनिरिक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने या परिसरातून शुक्रवारी दुपारी अविनाशला अटक केली.

एअरटेलची नेटवर्क यंत्रणा जळून खाक

मुंबई, ता. १९ - लोअर परळ येथील पेनीनसुला चेंबर्स इमारतीच्या तळमजल्यावर दिनांक १८ रोजी सकाळी भीषण आग लागली.
या आगीत एअरटेल मोबाईल नेटवर्कचा पुरवठा करणारी यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाल्याने शहरातील हजारो एअरटेल मोबाईल ग्राहकांचे फोन आज दिवसभर बंद होते. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे सोळा बंब ही आग विझविण्याची शर्थ करीत होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोअर परळच्या प्रसिद्ध पेनीनसुला पार्कमध्ये असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या इमारतीत मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. इमारतीचा तळमजला व पहिल्या मजल्यावर एअरटेलचे कार्यालय आहे. तळमजल्यावर या मोबाईलला नेटवर्क पुरविणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वाहिन्या या इमारतीच्या आतील बाजूने इमारतीच्या टेरेसपर्यंत जातात. या यंत्रणेत असलेल्या वाहिन्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मोबाईलला नेटवर्क पुरविण्यात उपयोगी ठरणाऱ्या वाहिन्यांच्या जाळ्यालाच ही आग लागली आणि काही क्षणातच ती संपूर्ण तळमजल्यावर पसरली. तळमजल्यावरून धुराचे लोट येऊ लागल्यानंतर इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
अग्निशमन दलाच्या सोळा बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या तळमजल्यात शिरून आग विझविताना जवानांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत एअरटेलची नेटवर्क यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाल्याने शहरातील एअरटेलच्या हजारो ग्राहकांना त्याचा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत एअरटेलची ही विस्कळित झालेली सेवा पूर्वपदावर आली नव्हती.

बाळासाहेब शिवसेना खासदारांना स्वतः भेटणार

बहुमताच्या प्रश्नावरून तिकडे दिल्लीत हवा तापली असताना मुंबईतही मातोश्री भवनावर हालचाली सुरू झाल्या असून अणू कराराच्या मुद्द्यावरून पक्षाच्या खासदारांची दुपारी होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना मातोश्रीवर स्वतः भेटणार आहेत.
कॉग्रेसने शिवसेनेचे १२ पैकी ३ खासदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. बहुमत ठरावाच्या संदर्भात पक्षाने आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असून आपण रालोआ सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या बैठकीत फारसे काही होणार नसले तरीही बाळासाहेबांनी खासदारांना स्वतः भेटीसाठी बोलावल्याने मातोश्रीवरून काय आदेश येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही खासदारांशी चर्चा करणार आहेत.

डाव्यांच्या व्हीपमध्ये सोमनाथदांचे नाव नाही

डाव्या विचारसरणीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आपल्या ५३ लोकसभा सदस्यांना २० जुलैपर्यंत राजधानीत पोचण्याच्या आणि २२ जुलै रोजीच्या संसदेतील बैठकीत मनमोहन सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावाविरुद्ध मतदान करण्याबाबतचा व्हीप बजावला आहे.
असे असले तरीही व्हीप बजावलेल्या खासदारांमध्ये लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जींचे नाव नाही.
कॉग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचा पाठिंबा काढून घेतलेल्या रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी तसेच फॉरवर्ड ब्लॉक हे अन्य दोन डावे पक्षही या संदर्भात आपल्या खासदारांना रविवारी मार्गदर्शक सूचना देणार आहेत.

गुरुवार, 17 जुलाई 2008

उधारीच्या पैशावरून वॉमनची हत्या

डोंबिवली, दि. १७ : उधारीचे पैसे न दिल्याने एका वॉचमेनवर मारल्याची घटना कल्याणात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील हरिहर सोसायटीत राहणारे भोरसिंग कुवर (४५) हे वॉचमेनचे काम करतात. पैशाची हात पसरले. मात्र त्यांचा मित्र पदमसिंग धामी (५३) यांनी गोरेसिंगकडे आधी दिलेले उधारीचे पैसे मागितले. गोरेसिमने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पैसे परत केले नाही. यावरुन या दोघांचा वॉचमेन केबिनमध्ये भांडण सूर झाले. पदमसिंगने त्याच्याजवळील धारदारचाकूने गोरेसिंगवर वार केले. यात गोरेसिंगची जाणीच मृत्यू झाला. महात्मा फुले पोलिसांनी पदमसिंगला हत्येप्रकरणी अटक केली आहे.

सराईत गुडांना सात वर्षाची सक्तमजूरी

नवी मुंबई, दि. १७ : बॅंक दरोडे, लुटमार, खुनी हल्ले, चोरी सारख्यागंभीर गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या चार गुडांना न्यायालयाने सात वर्षांची सक्त मजुरी शिक्षा ठोठावली.करणसिंग चौहान, अजय शर्मा, अरुण उर्फ संजय दगडू डोळशे, हेमंतकुमार शिरमोलीया असे आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र सदाशिव भोगवडे यांच्यावर तुर्भे परिसरात सदर गुडांनी खुनी हल्ला केला होता. सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तुर्भे पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या बांधून सबक पुराव्यासह जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी १००० हजार रुपयांचा दंड ठोठावली आहे.

मराठवाड्यातील मराठी मुलाचा मराठी तडका..

लई भन्नाट
मुंबई - मराठी चित्रपटाला आता नव्या आशय,विषय आणि संकल्पनांसोबत नव्या धाडसाचीही सयाथ मिळत आहे।मराठी सिनेमातले होणारे नवनविन प्रयोग आता प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतांना दिसत आहे.औरंगाबादच्या अशाच एका पंचवीशीतल्या विशाल सदावर्ते याने या लहान वयात लई भन्नाट या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.फक्त निर्मितीच नव्हे तर या मराठी चित्रपटात त्याने नायकाचीही भूमिका यशस्वीरित्या पार पाडली आहे.मुंबई,पुणे,नाशिक,सातारा,सांगली नंतर आता मराठवाडयातील औरंगाबाद शहरातील या विशालने निर्माता आणि नायक अशा दोन्ही जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या आहेत.नुकताच या चित्रपटाच्या माध्यमाने त्याची मुंबईत भेट झाली तेव्हा तो चित्रपटाविषयी भरभरुन बोलला....
* विशाल,चित्रपटाचा निर्माता ते नायक पर्यतच्या आपल्या प्रवासाविषयी काही सांगशील ?
- चित्रपट व्यवसाय हा काही आमचा वडिलोपार्जित वयवसाय नाही। परंर्तु चित्रपट दिग्दर्शक बाबु भट हे माझया वडिलांचे (पंकज सदावर्ते ) जवळचे मित्र्र. दोघांच्या मनात चित्रपट तयार करण्याविषयी एकमत झाल्यावर वडिलांनी याची सर्व जबाबदारी माझ्या खांदयावर टाकून मोकळे झाले, आणि मी देखील जराही विचार नकरताच होकार दिला आणि लगेचच कामाला लागलो.
* चित्रपटात काम करण्याचे कसे ठरले?
- निर्माता मी स्वत:च असल्याने सर्व कामांवर माझी बारिक नजर होतीच. चित्रपटात नविन कलाकार नायक म्हणून घ्यायचे ठरल्यावर आमच्या सर्व टीमने माझेच नाव सुचवले.याबाबत वडिलांशी चर्चा केली, त्यांनी होकार दिल्यावरही मी विचार करण्यासाठी दोन दिवस घेतले.्र सर्व बाजुंनी विचार करुन मी अखेर चित्रपटात नायक साकारायला तयार झालो.
* अभिनयाचे काही प्रशिक्षण घेतलेस का
- नाही, अभिनाचे मी कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. अभिनयाबाबत इतकेच सांगु शकतो की, काही वर्षांपुर्वी मी गोविंदाचा नसीब हा चित्रपट पाहिला होता, आणि तेव्हा मनाशी ठरवलं होतं की चित्रपटात काम करणयाचा योग आला तर विनोदीच करणार.नशीबाने माझा हा पहिलाच चित्रपट विनोदी आहे.
* निर्माता आणि अभिनय दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितरित्या कशा पार पाडल्यास ?
- सुरवातीला थोडं अवघड वाटल्यासारखं झालं कारण, प्रॉडक्शनच्या सर्व कामात मी हवाच होतो आणि नायक म्हणूनही मी सेटवर हवा होतो।यासाठी नंतर काही दिवसांनी मी योजनेने काम केले.सर्वप्रथम मी माझे प्रसंग चित्रित करुन घेतले,नंतर माझ्याशिवाय असलेले प्रसंग चित्रित केले.
* चित्रपटाविषयी काही सांग....
- लई भन्नाट हा चित्रपट नावाप्रमाणेच लई भन्नाट विनोदी आहे।ही एक प्रेमकथा आहे ज्याला विनोदी सादरीकरणाची झालर आहे.चित्रपटात एकूण सात गाणी आहेत.या चित्रपटाचे 90 टक्के चित्रिकरण औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.चित्रटात माझी नायिका तेजस्विनी पंडित आहे.याशिवाय चित्रपटात अनंत जोग,विनय आपटे,राहुल सोलापूरकर,संजय सुगावकर यांच्या विशेष भूमिका आहे, आणि चित्रपटील एका फटकेबाज लावणीत महाराष्ट्‌ाची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर दिसणार आहे.चित्रपटाचा विषय लक्षात घेता हा चित्रपट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात औरंगाबाद,नाशिक,नगर,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि याठीकाणी स्वतंत्र प्रिंटसह प्रदर्शित करणार आहोत.
नृत्य आणि अभिनयाचा सुरेख संगम साधणारी यशस्वी अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांना नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। या निमित्ताने जयश्रीबाईंच्या यशस्वी कारकीर्दीचा घेतलेला आलेख -
1955 सालापासून आजवर अनेक मराठी चित्रपटातून चमकलेल्या जयश्री गडकर यांचा जन्म 1942 साली झाला। त्या कर्नाटकातील कारवारच्या आहेत. नृत्य आणि अभिनयाचा सुरेख संगम साधणाऱ्या जयश्री गडकर यांनी 1955 मध्ये चित्रपती व्ही. शांताराम यांच्या गाजलेल्या "झनक झनक पायल बाजे' या चित्रपटाच्या अभिनेत्री संध्या यांच्याबरोबर गु्रपडान्समध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांच्या नृत्याचे फोटो काढून राम देवताळे यांनी दिग्दर्शक दिनकर पाटील यांना दाखवले. दिनकर पाटील यांच्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात अभिनेते राजा गोसावी यांच्या समोर एक नृत्य करण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली. हाच त्यांचा पहिला मराठी चित्रपट. शांताराम बापूंच्या आशिर्वादाने ज्या अनेक कलावंतांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यातील एक जयश्रीबाई. पुढे त्यांनी एका पाठोपाठ एक सरस भूमिका करीत मराठी चंदेरी दुनियेत आपलं बस्तान मांडलं. "उतावळा नवरा पैशाचा पाऊस, "अवघाची संसार', "आलिया भोगासी' अशा चित्रपटातून त्यांनी राजा गोसावींची नायिका म्हणून काम केले त्यातील एक जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर यांच्या गाठ पडली ठका ठका या चित्रपटात एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका केली. यानंतर त्यांना तमाशाप्रधान चित्रपटाची नायिका म्हणून अमाप यश मिळाले.
1959 मधील अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या सांगत्ये ऐका या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात 132 आठवडे चालण्याचा विक्रम केला होता। "सांगत्ये ऐका' मधील "बुगडी माझी सांडली गं...' या लावणीने अनेकांना वेड लावले. जयश्री गडकर-राजा गोसावी ही जोडी गाजल्यानंतर अभिनेते सुर्यकांत यांच्या बरोबरही जयश्रीबाईंनी पंचारती, रंगपंचमी, वैजंयता, लाखात अशी देखणी अशा अनेक चित्रपटातून कामे केली. त्यांनतर त्यांची अरुण सरनाईकबरोबर चांगली जोडी जमली आणि त्यांचे सवाल माझा ऐका, गणगवळण, एक गाव बारा भानगडी हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. मानिनी या चित्रपटातील प्रमुख भूमिका जयश्रीबाईंनी यशस्वीरित्या साकार करून महिलावर्गामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटविला. सुभद्राहरण मध्ये त्यांनी विक्रम गोखलेची नायिका म्हणून काम केले. अशी ही नृत्यनिपुण अभिनेत्री मराठीतली महानायिका बनली. त्यामागे त्यांची खूप मेहनत आहे.
मराठीप्रमाणे हिंदीतही महान अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर जयश्रीबाईंनी काम केले आहे। प्रायव्हेट सेक्रेटरी, सारंगा, बजरंगबली, तुलसी विवाह हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट आहेत. नृत्यप्रधान, अवखळ, खट्याळ, नखरेल, सालस, सात्विक, सोज्वळ अशा विविध भूमिका जयश्रीबाईंनी समर्थपणे साकार केल्या आहेत. रामायण या मालिकेतही जयश्रीबाईंनी समर्थपणे बाळ धूरीबरोबर भूमिका केली आहे. 1975 मध्ये जयश्री गडकर यांचा बाळ धुरी यांच्याबरोबर विवाह झाला. सासर माहेर आणि अशी असावी सासू या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं. जयश्री गडकर यांना साधी माणसं, मानिनी, वैजयंता आणि पवनकाठचा धोंडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच व्ही. शांताराम पुरस्कार, गदिमा पुरस्कार, माणूस पुरस्कार, अल्फा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जयश्री गडकर यांना महाराष्ट्र शासनाने चित्रभूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांना खूप आनंद झाला आहे. मुंबई मित्र परिवारातर्फे जयश्री गडकर यांचे हार्दिक अभिनंदन.

लाचलुचपत विभागाला ७ शासकीय कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

मुंबई, दि. १७ : बेकायदेशीररित्या मालमत्ता गोळा करणाऱ्या ७ शासकीय कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडे बेकायदेशीररित्या अवैध मालमत्ता जमवलेली असल्यास ती जप्त करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने निर्देशिलेल्या ७ शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील इन्स्पेक्टर बबन कदम याचा समावेश आहे. कदम याने एमपीएससी परिक्षा भरती प्रक्रियेत घोटाळा करून अवैध मालमत्ता मिळवली होती. त्याची १.५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर अन्य सहा जणांमध्ये सोलापूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या बाळाराम रोकडे (२०.३९ लाख), आरोग्य विभाग सहाय्यक संचालक, औरंगाबाद डॉ. भगवान चव्हाण (४३.२३ लाख रुपये), अहमदनगर येथील आरटीओ मोटर इन्स्पेक्टर सय्यद अब्दुल रहिम (१८.२७ रुपये लाख), लातूर येथील रमेश मेडगे (११.४२), नंदुरबारचा कृषी अधिकारी बबन पाटील (४०.५० लाख रुपये) आणि जालनाचे कृषी पर्यवेक्षक केदारनाथ बुधवंत (३०.१० लाख रूपये) आदींचा समावेश असून या सर्वांची एकूण ३.१८ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील व्यापाऱ्याला ४ लाखाला लुटले

कल्याण,दि.१७ : पोलिसांची रेट झाल्याचे सांगून सोन्याचे बिस्किटे खरेदी करण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुण व्यापाऱ्यास ४,२५,००० रू. लुटल्याची घटना कल्याणात घडली. तरुणास लुटण्यासाठी ४ जणांसोबत ३ अनोळखी पोलीस असल्याचे तरुणाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील टिळकनगर रोड येथील शांतीजोग सोसायटी राहणारा २५ वर्षीय ललित मनोहर सोनी हा व्यापारी ४ एप्रिल रोजी कल्याणातील आधारवाडी चौक जवळचं सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यासाठी झाले होते. येथे व्यवहार होताना आरोपी अशोक नायडू, राजू पटेल, सचिन गावकर, सुभाष यांनी व्यापाऱ्यास बाजारभावापेक्षा १० टक्के कमी भावाने ४० तोळे वजनाचे ४ सोन्याची बिस्किटे देण्याची लालचं दिली. या लालचेला सोनी बळी पडले. आणि त्यांनी त्यांच्याजवळील ४,२५,००० रुपयांची रोकड बाहेर काढली. त्याचवेळी आरोपींनी बनावट नाट्य करून पोलिसांनी रेट टाळल्याचे सांगून व्यापाऱ्यास घाबरवून पळण्यास सांगितले. सोनी यांनी घाबरून त्यांच्याजवळील रोकडही बनावट पोलिसांच्या हवाली केली होती. सोनी व्यापाऱ्यास घडलेल्या प्रकाराचा काही दिवसांनी संशय आल्याने आपण लुटलो गेल्याचे समजले. व्यापारी सोनीयांनी सदर प्रकाराविषयी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अद्याप ७ आरोपींना अटक झाली असून पुढील तपास वपोनि सुदाम राखपसरे करित आहे.

४८ वर्षीय इसमावर प्राणघातल हल्ला

कल्याण, दि.१७ : मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय इसमा बेकायदेशीरपणे प्राणघातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळ ५७, ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील किराईच गांव येथे राहणारा सुरेंद्रसिंग जनकसिंग तोगार (४८) हा काल रात्रौ ८ च्या सुमारास कल्याण (प.) येथील एस.टी.स्टॅंड येथे फिरत होता. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याजवळील बॅग व अंगझडती घेतली. यात ५००० रु. कि. गावठी बनावटीचा कट्टा ४०,००० रु.कि.एक विदेशी पिस्टल १०,००० रु.कि.एक लोखंडी रिव्हॉल्व्हर, ४५० रु.कि. दोन जिवंत पितळी काडतूस, १४५० रु. रोख रक्कम, ६० रु. जूनी काळी छत्री व २०० रु. बॅग असा एकूण ५७,७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला.
महात्मा फुले पोलिसांनी सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५(१), प्रमाणे गुन्हा नोंदविला असून त्याला अटक केली आहे.

अबू सालेम खटला प्रकरणात सीबीआयचा हलगर्जीपणा?

मुंबई,दि.१७: पोर्तुगालहून अबू सालेम याच्या प्रत्यार्पणात सीबीआयनं हलगय केल्याचे पत्र आता हे प्रकरण अबू सालेम विरोधात खटला लढवणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या वकीलांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविले असून या पत्रामुळे सीबीआयनं हे प्रकरण खरोखरी दूरदृष्टीने हाताळले नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुलै ७ रोजी पार्वगीजच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी अबू सालेमला भारतात परत पाठविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून सीबीआयनं प्रत्यार्पणाची मागणी का केली याचा खुलासा करण्याची नोटीस दिली होती. प्रत्यार्पणच का हवे डिपोर्टेशन का नको? आता या नोटीसीनं खुलासा करण्यात सांगितले होते.
सरकारकडून प्रत्यार्पणासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांशी झालेल्या तडजोडीनंतर अबू सालेमविरोधात नोंदविण्यात आलेल्या २५ पैकी फक्त ८ प्रकरणात त्याच्यावर खटला चालविण्यास संमती देण्यात आली. तसेच अध्यक्षपदी झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार अबू सालेम याला दीर्घ कालावधीची शिक्षा तसेच फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असे ठरले. डिपोर्टेशनमध्ये अबू सालेमला दीर्घ मुदतीची वा फाशीची शिक्षा होऊ नये ही अट राहिली नसती असे दिल्ली पोलिसांचे वकील पत्रात म्हणतात.
यासंबंधात सीबीआयच्या मतानुसार, डिपोर्टेशनची एव्ह्यूडिशन हा मुद्दा ऍडिशनल ऑलिसीटर जनरल यांच्या कार्यकक्षेत येत नाही। मात्र ऍडिशनल ऑलिसीटर जनरल यांनी ५ मार्च रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून हे प्रकरण पोर्तुगालमध्ये धाउगर्दीने हालविले गेले असल्यानं पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून आपली चूक सुधारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते, असे समजते.
या प्रकरणात दिल्ली पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीसही अशाच प्रकारचा स्वतंत्र अर्ज पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकतात, असेही ऍडिशनल ऑलिसीटर जनरल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आणले होते, असे समजते.

माहिम दर्ग्याच्या प्रवेशद्वाराला स्थानिकांचा विरोध

मुंबई, दि. १८ : श्री सिद्धीविनायक देवस्थानच्या संरक्षक भिंतीवरून वाद सुरु असताना आता माहिम येथील जगप्रसिद्ध माहिम दर्ग्यात उभारण्यात आलेल्या संरक्षक प्रवेशद्वाराला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे.
माहिम येथे पीर मखदूम सहिबबाबाचा जगप्रसिद्ध दर्गा असून हा दर्गा माहिमचा दर्गा म्हणून ओळखला जातो. केवळ मुस्लिम धर्मियच नव्हे तर जगभरातून नानाविध धर्माचे अनेक भाविक येथे येतात. नुकतेच या दर्ग्याजवळ संरक्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पीर मखदूम साहिब स्वंयसेवी संस्थेने दर्ग्याच्या संरक्षणाचे कारण पुढे करून या ठिकाणी संरक्षक प्रवेशद्वार उभारले आहे. मात्र या प्रवेशद्वाराला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ आम्ही या दर्ग्यातूनच ये-जा करीत असताना अचानक प्रवेशद्वार उभारून आम्हाला प्रवेश नाकारण्यात येणे हे चुकीचे असल्याचा तक्रार दर्गा स्ट्रीट ऍडव्हान्स्ड लोकल मॅनेजमेंटचे अध्यक्ष अन्वर खान यांनी केली.
दर्ग्यातून जाणारा मार्ग हा आधीच अरुंद असून येण्यासाठी वा जाण्यासाठी प्रवेशद्वाराचा वापर केला जाऊ शकतो असे म्हणत प्रवेशद्वारामुळे चेंगराचेंगरीही होऊ शकते अशी भितीही खान यांनी व्यक्त केली.
तर याबाबत राज्य अल्पसंख्यांक समिती आणि पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना समजावले. मात्र दर्गा समितीने आम्ही दर्ग्याच्या आतील बाजूस प्रवेशद्वार उभारत असून त्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज वाटत नाही. तसेच प्रवेशद्वार उभारायचे की नाही हा सर्वस्वी आमचा प्रश्र्न आहे त्यामुळे कुणीही यात मध्यस्थी करू नये. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोय लक्षात घेऊनच आम्ही हे प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात केवळ दर्ग्याचे संरक्षण हाच मुद्दा नसून दर्ग्याची स्वच्छता हा विषयदेखील महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्य अल्पसंख्यांक समितीच्या सदस्यांनी सदर मुद्दयात समझौता करण्यासाठी नसीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याला भेट दिली.

'वेगळ्या विदर्भास राजीव गांधी तयार होते'

स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी वेगळा विदर्भ करण्यास तयारी दर्शविल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी केला आहे. त्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिले होते, परंतु केवळ कॉंग्रेस हितासाठी आपण त्यांना त्यापासून काही काळासाठी परावृत्त केल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले.
साठे सध्या नागपुरात असून, श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात त्यांनी ही माहिती दिली.
राजीव यांनी नियुक्त केलेल्या संगमा समितीने आपला अहवाल दिल्यानंतर त्यांनी आपल्याकडे वेगळा विदर्भ राज्य करण्‍याविषयीचे मत जाणून घेतले होते. तेव्हा आपण त्यांना विरोध केल्यानेच वेगळे विदर्भ राज्य न होऊ शकल्याचे साठे म्हणाले.
तत्कालीन राजकीय समीकरणे आणि कॉंग्रेसच्या हितामुळे आपण राजीव यांना यासाठी विरोध केल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले. निवडणुकांनंतरची समीकरणे पाहूनच आपण वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी असे त्यांना आपण सुचवले होते. मात्र, नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली आणि कॉंग्रेसची सत्ताही गेल्याने हा विषय मागे पडल्याचे ते म्हणाले.
सध्या अणू कराराबाबत नाहक वाद केला जात आहे. हा करार देश हितावह असल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी शिर्डीतील साईमंदिर रात्रभर खुले

शिर्डीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणा-या गुरूपौर्णिमेच्या उत्सवाला आज बुधवारपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणा-या या सोहळ्यात लाखो साईभक्त गुरूदर्शन घेतील. त्यासाठी शुक्रवारी साईमंदीर रात्रभर खुले ठेवण्यात येईल.
साईबाबा संस्थाननेही या उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. साईबाबा शिर्डीत वास्तव्य करत होते तेव्हापासून गुरूपौर्णिमेचा हा उत्सव साजरा करण्यात येतो. आज पहाटे झालेल्या काकड आरतीपासून या उत्सवाला सुरूवात झाली.
मुंबई-पुण्यासारख्या अनेक शहरातून आणि आसपासच्या गावातून साईभक्त पालख्या घेऊन शिर्डीत येतात. या साईभक्तांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था अपुरी पडणार नाही, याची संस्थानातर्फे काळजी घेण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी साईमंदिरावर नयनरम्य रोषणाई करण्यात आली असून तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, 16 जुलाई 2008

सांगलीत पोलिस मुख्यालयातच पेटवून घेण्याचा प्रयत्न

सांगली - गेल्या दहा वर्षापासून पोलिस आणि ग्रामस्थांकडून संगनमताने त्रास होत असल्याच्या कारणावरून दिलिप किसन जाधव (वय ४५, रा.जाधववाडी, ता.खानापूर) यांनी बुधवारी पोलिस मुख्यालयात पेटवून घेण्याच्या इराद्याने ठाण मांडले. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल म्हणून उपाधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फच चौकशी करण्याचे अश्‍वासन अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी दिले.
सुमारे दीड तास मुख्यालयात श्री जाधव यांनी आपली कैफियत मांडली. याबाबतची श्री जाधव यांनी दिलेली माहिती अशी - खोटे गुन्हे दाखल करून अ माणुष मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त पोलिस निरिक्षक रामचंद्र घुगे यांच्याविरोधात खानापूर येथील विजय पाटील (रा.बामणी, खानापूर) यांनी मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली होती. सध्या न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणात श्री पाटील यांना न्यायाच्या लढ्यात निरपेक्ष भावनेने मदत केली होती. त्यामुळे संतापलेल्या पोलिस यंत्रणेने सतत त्रास दिला.
निवडणुकीचे निमित्त असो वा नाहक वाहन रोखून दंडात्मक कारवाई करणे असे प्रकार झाले. गावातील कुणाची तक्रार आली की शहनिशा न करता थेट अटकेची करणे मला साथ करणाऱ्या ग्रामस्थांच्या द्राक्षबागा कापून टाकणे असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकार गावातील विरोधकांकडून होत आहेत. त्याच्या या प्रयत्नांना पोलिस यंत्रणेतील लोक सातत्याने बळ देत आले आहेत. परवा परवान्यासह सर्व कागदपत्रे सोबत असतानाही स्वमालकीची रिक्षा काढून घेण्यात आली. याबाबत तक्रार करण्यासाठी पोलिस मुख्यालयात आल्यानंतर अधिक्षकांना भेटूच दिले जात नाही. नाईलाज म्हणून आज पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.''
अधिक्षक कृष्णप्रकाश म्हणाले,"" दहा वर्षापुर्वीच्या एखाद्या प्रकरणाचे कारण पुढे करून संपुर्ण पोलिस यंत्रणाच श्री जाधव यांना त्रास देत असेल हे न पटणारे प्रकरण आहे. घुगे यांनी चूक केली किंवा नाही याची मला माहिती नाही. त्याच्या प्रायश्‍चिताचा निर्णय न्यायालय करेल. परंतु एकापाठोपाठ येणारा प्रत्येक अ धिकारी असा त्रास देत असेल असे जाधव यांचे म्हणणे न पटणारे आहे. तरीही योग्य तो दंड भरून दुचाकी आजच परत द्यावी. आणि संपुर्ण प्रकरण चौ कशीचे आदेश इस्लामपूर विभागाच्या उपाधिक्षकांना देत आहे.''

सोमनाथ चटर्जी कम्युनिस्ट पक्ष सोडणार ?

नवी दिल्ली - पुढील आठवड्यात विश्‍वासदर्शक ठरावावरील कामकाजानंतर लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडण्याची शक्‍यता आहे.
विश्‍वासदर्शक ठरावापूर्वी श्री. चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर पक्षातून दबाव टाकला जात आहे, परंतु श्री. चटर्जी यांना आता हे पद सोडायची इच्छा नाही. त्यामुळे पक्षातील इतर वरिष्ठ नेते आणि श्री. चटर्जी यांच्यातील वाद सध्या विकोपाला गेले आहेत.
पुढील आठवड्यात सभापतीपद, लोकसभा सदस्यत्व आणि पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जवळच्या काही मित्रांकडे बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मत देण्यालाही त्यांचा विरोध आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांना पाठविले आहे.

पुढील मान्सूनपर्यंत रेल्वेचे वॉटरप्रुफ सिग्नल

मुंबई, दि. १६ : ऐन पावसाळ्यात रेल्वेची सिग्नल यंत्रणा कोलमडते आणि मग अपघातांना निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे वॉटरप्र्रुफ सिग्नल बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरातील रेल्वेचे सिग्नल यंत्रणा कोलमडून जाते. याचा परिणाम लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. कधी कधी सिग्नलमधील बिघाडामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते. ही नवीन यंत्रणा डिजिटल ऍक्सेल काऊंटर्स म्हणून ओळखली जाणार असून जोपर्यंत लोकल स्थानकातून जात नाही तोपर्यंत हे सिग्नल लाल रंगच दाखवतील. हे नवीन सिग्नल मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात तसेच पश्र्चिम रेल्वेच्या काही स्थानकावर बसविण्यात येणार आहेत. जागतिक बॅंकेकडून यासाठी निधी उपलब्ध केला जाणार असून जर्मनीहून ते बनवून येणार आहेत.

कर वसुलीसाठी पालिका घेणार केंद्राची मदत

मुंबई, दि. १६ : पाणी, नालेसफाई आणि मालमत्ता कराच्या बिलाची रक्कम वसूली करण्याबाबत वारंवार प्रयत्न करूनही अपयश मिळालेल्या मुंबई महानगर पालिकेने अखेर या कामासाठी केंद्र सरकारची मदत घेण्याचे ठरवले आहे.
यासंबंधी वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. हे मंडळ केंद्र सरकारला पाणी, नालेसफाई आणि मालमत्ता आदींवर आकारलेल्या कराची रक्कम कशाप्रकारे वसूल केली जावी याबाबत चर्चा करणार आहे. सध्या तरी पालिकेला २३२ कोटी रुपयांचा कर येणे बाकी आहे. ही कर वसुली व्हावी यासाठी आम्ही राज्य सरकारला वारंवार साकडे घातले होते मात्र राज्य सरकारने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असून अद्याप कोणतीही कर वसूली न झाल्याने आता आम्ही केंद्र सरकारचे सहाय्य घेणार आहोत अशी माहिती एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने दिली.
काही शासकीय इमारती तसेच खासगी संघटनांकडून पालिकेला २५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर येणे बाकी आहे. २०७ कोटी रुपयांची पाणीपट्टी यात महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ अर्थात म्हाडाकडून येणाऱ्या ९०.७ कोटी रुपयांच्या पाणीपट्टीचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय कापड उद्योग (एनटीसी) कडून ८.९६ कोटी रुपये, २४ लाख रुपये बेस्टकडून तर ४.१ कोटी रुपये पश्र्चिम रेल्वेकडून येणे बाकी आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शासकीय इमारतींना धमकावूनही त्यांच्याकडून हा करभरणा येत नसल्याने काहींचा पाणीपुरवठाच आम्ही बंद केला आहे. मात्र पालिका नियमात शासकीय इमारतींवर कशाप्रकारे कारवाई करावी यासाठी तरतूद नसल्याने आम्ही अधिक काहीही करू शकत नसल्याची खंत एका पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. पालिका आयुक्त जयराज पाठक यांनी पश्र्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्ट बंदर आदींना त्वरीत पाणीपट्टी आणि घनकचरापट्टी भरण्याबाबत गेल्या आठवड्यात पत्र पाठवले होते मात्र पालिका आयुक्तांच्या या इशाऱ्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे अखेर केंद्र सरकारची मदत घेण्याचे ठरविल्याचे पालिकेकडून कळविण्यात येत आहे.

चोवीस तासात नामफलक मराठीत

मुंबई, दि. १६ : "सर्व संस्था, दुकाने व आस्थापनांनी नामफलक मराठीत न लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी स्टाईलने त्यांच्यापर्यंत पोहचेल' या इशाऱ्याने अपेक्षेपेक्षा आधीच राज ठाकरे यांचा हेतू साध्य झाला आहे. "राज ठाकरे' यांच्या इशाऱ्याची गांभिर्याने दखल घेऊन अवघ्या चोवीस तासात मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेन्ट तसेच एचआयटीने नामफलक मराठी केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वांद्रे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सर्व संस्था, दुकाने व आस्थापनांनी लवकरात लवकर मराठी नामफलक लावण्याचे आवाहन केले होते. तसेच महिन्याभरात संबंधितांनी नामफलक मराठीत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी स्टाईलने त्यांना उत्तर देईल असा इशरारा दिला होता. त्याची गांभिर्याने दखल घेऊन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टचे कार्यकारी संचालक उदय साळूंखे यांनी दुसऱ्याच दिवशी मराठी नामफलक लावले. त्याचप्रमाणे एनआयटीच्या दादर शाखेतही ताबडतोब मराइी नामफलक लावण्यात आला असून महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्येही लवकरच मराठी नामफलक लावण्यात येतील अशी ग्वाही एनआयटीच्या विभागीय प्रबंधकांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, सचिन मोरे, रोहन सावंत, विशाल कोठार व किरण कदम यांनी ज्या ज्या शिक्षण संस्थांचे नामफलक मराठीत नाहीत त्यांना मनसेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एनआयटी, जेटकिंग ऍपटेक, कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, एमईटी, एचआर कॉलेज, केसी कॉलेज, लाला लजपत राय कॉलेज, खालसा कॉलेज, एस आय डब्ल्यू एम कॉलेज, केळकर कॉलेज, एस आय ई एस कॉलेज व एम के के कॉलेज, ओडूमल सहानी कॉलेज, नॅशनल कॉलेज व एम के के कॉलेज आदी मुंबईतील प्रमुख महाविद्यालयांना हे पत्र देण्यात आले आहे. या सर्व संस्था चालकांनी व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही वेलिंगकर इन्स्टिट्युट व एन आय आय टी प्रमाणे लवकरच मराठीच नामफलके लावण्याच आश्र्वासन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे

भिंवंडी, दि.१६ : भिवंडी महापालिकच्या मालकीच्या जागेवर बिल्डर लॉबीने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून गोदामे बांधलेली आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई करून झालेले अतिक्रमण दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते सिद्धेश्र्वर कामूतीर्र् यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहे.
भिवंडी तालुक्यातील मौजे दापोडे गावी सर्व्हे नंबर ११५ पै. क्षेत्र २२.९२ हक्टर जमिन शासनाने महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी दिली.
जमिनीचा मोबदला म्हणून साडेसहा कोटी रूपये शासनाने घेतले आणि ११ मार्च २००३ रोजी जमिनीचा ताब महापालिकेला दिला. जमिनीला कुंपण घालण्याचे काम सुरू केले असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करून कुंपन घालण्यास मनाई केली.
बिल्डर लॉबी आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संगनमताने मोठमेाठी गोदामे बांधून महापालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण केले. सदरचे अतिक्रमण तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी भिवंडीच्या पोलीस उपायुक्तांना १० जून २००८ रोजी पहा पाठवून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती.
त्याप्रमाणे १७ जून २००८ रोजी पत्र पोलीस देण्याचे नक्की झाले होते. मात्र याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस उपआयुक्तांना मोबाईल करून बंदोबस्त न देण्याच्या सूचना दिल्याने अतिक्रमण हटविण्याचे काम झाले नाही, असा आरोप सिद्धेश्वर कामुर्ती यांनी मुख्यमंत्र्याना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.

जिंदाल कंपनी खेळतेय मराठी विरुध्द भैय्या कामगारांचा खेळ

टिटवाळा, दि. १६ : मराठी कामगारांना शक्य तितक्या लवकर हाकलण्यासाठी जिंदाल कंपनीने नवीन मुक्ती सुरु केली असून सेवानिवृत्तीचा काळ ठरवताना याच कंपनीने मराठी कामगारांचे वय जास्त तर युपी, बिहारींचे वय कमी दाखविल्याचे बोलले जात आहे।
कंपनीने ( जिंदाल स्टील) कामगारांची भरती केल्यानंतर त्यांच्याकडून शाळेचे दाखले घेतले। त्यात स्थानिक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांनी खरे शाळेचे दाखले (शाळा सोडल्याचे) कंपनीत दिले. मात्र युपी, बिहार राज्यातील कामगारांनी निव्वळ खोटे आणि बनावट दाखले कंपनीत सादर केल्याने सेवानिवृत्तीचा काळ निघून गेल्यानंतरही केवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे आजही यु. पी.बिहारी कामगार अंगात त्राण नसतानाही याच कंपनीत काम करून २० ते २५ हजारांच्यावर पगार घेत असल्याचे चर्चेत आहे। यु.पी.बिहारींच्या कामगारांनी वयासंबंधी दिलेले दस्ताऐवज निव्वळ खोटे असताना व तशा शाळा या राज्यात कुठेच नसताना जिंदाल कंपनी अशा दाखल्यांची कसून चौकशी का? करीत नाही किंवा संबंधित शाळेशी का संपर्क साधत नाही? असा सवाल होत आहे. भैयांना सेवानिवृत्तीमध्ये मुभा आणि मराठी कामगारांना नियम लावणाऱ्या याच कंपनीत मनसेच्या राज ठाकरेंनी येऊन मराठी-भैया कामगार पाहिले आणि त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ विचारला तर सत्य समोर दिसेल, अशी मागणी होत आहे.
मोेडेल पण वाकणार नाही अशी वृत्ती असलेल्या मराठी कामगारांच्या या समस्येबाबत आज कुणीही ब्र काढत नसल्याचे येथे मराठी कामगारांची मुस्कटदाबी होत आहे तर भैये खोटया कागदपत्रांवर येथेच पाय रोवून आहेत. याकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

अंबानी बंधूंमध्ये हस्तक्षेप योग्य नाही : माकपा

नवी दिल्ली, दि. १६ : माकपाने सत्ता अबाधित राखण्याच्या गडबडीत पंतप्रधान कार्यालयाने दोन व्यापारी घराण्यातील वादात हस्तक्षेप करण्याच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप घेतला आहे माकपा पॉलिट ब्यूरोने मंगळवारी मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोन्ही अंबानी बंधूंमध्ये व्यक्तीगत स्तरावर हस्तक्षेप करण्याच्या आवाहनाला एक भयानक परंपरेचा शुभारंभ संबोधत म्हणाले की, विश्र्वासदर्शक ठराव जिंकून सत्तेत राहण्याचा सत्तारुढ पक्ष व आघाडीची मोठी महत्वकांक्षा असली तरी पंतप्रधान कार्यालयाने मध्यस्थी करायला नको होती.
प्रसिद्धी पत्रकानुसार, डा. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात कांग्रेस सप्रणीत संपुआ सरकारचा २२ जुलै रोजी लोकसभेत प्रस्तावित विश्र्वासदर्शक ठरावापूर्वी व्यापारी घराणे आप-आपल्या हितांना पाठिंबा मिळवण्यासाठी जाहिरपणे मैदानात उतरले आहेत.

सरकार टिकेल आणि करारही होईल:जायस्वाल

मुजफ्फरनगर, दि. १६ : केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांनी सांगितले आहे की, अमेरिकेसोबत करार होईल व सरकारही अबाधित राहिल कारण देशाचा विकास व्हावा अशी सरकारची इच्छा आहे.
जायस्वाल सोमवारी संध्याकाळी 'किसान चौपाल'ला संबोधित केल्यानंतर पत्रकारांसमवेत चर्चा करत होते. त्यांनी मायावतींनी सीबीआयवर केलेल्या टिकेवर प्रतिकि"या व्यक्त करतांना सांगितले की, मुख्यमंत्री स्वतः सीबीआयला उत्तरप्रदेशातून प्रकरण पाठवून त्यावर आपला विश्र्वास व्यक्त करते पण त्यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआय चौकशी करते तेव्हा त्या त्यास राजकारणाने प्रेरित म्हणत त्यावर टीका करतात. जायस्वाल म्हणाले की, सीबीआयच्या कामकाजात सरकारचा कुठलाच हस्तक्षेप नाही. त्यांनी विश्र्वास व्यक्त केला की, सरकार चालेल व अमेरिकेसोबत अणुकरार सुद्धा होईल.

अमरसिंगांनी आडवाणींवर तोफ डागली

नवी दिल्ली,दि. १६ :भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी "दलाल' म्हटल्याने समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी काल पत्रकार परिषदेत त्यांच्यावरच प्रतिहल्ला केला. आडवाणी लाल, भगवा, आणि हत्ती मिळून सपाला बदनाम करीत असल्याची टीका अमरसिंग यांनी केली.
कांग्रेस यापूर्वी लाल सलाम करत असे, आता दलाल सलाम करत आहे, असे वक्तव्य अडवाणी यांनी केले. हा त्यांनी माझ्यावर केलेला थेट आरोप आहे, असे मी समजतो, असे अमरसिंग यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या 21 मार्च रोजी अडवाणींनी मला त्यांच्या " माय कंट्री, माय लाइफ ' या आत्मचरित्राची प्रत त्यांच्या सहीनिशी पाठवून दिली.
त्यावेळी मी दलाल नव्हतो. आता तीनच महिन्यात मी दलाल कसा झालो? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. आडवाणी यांना पंतप्रधान होता येत नाही, त्या निराशेपोटीच ते अशी बेजबाबदार विधाने करीत आहेत, असेही अमरसिंग म्हणाले.

२३२ कोटींच्या कर वसुलीसाठी पालिका घेणार केंद्राची मदत

मुंबई, दि. १६ : पाणी, नालेसफाई आणि मालमत्ता कराच्या बिलाची रक्कम वसूली करण्याबाबत वारंवार प्रयत्न करूनही अपयश मिळालेल्या मुंबई महानगर पालिकेने अखेर या कामासाठी केंद्र सरकारची मदत घेण्याचे ठरवले आहे.
यासंबंधी वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. हे मंडळ केंद्र सरकारला पाणी, नालेसफाई आणि मालमत्ता आदींवर आकारलेल्या कराची रक्कम कशाप्रकारे वसूल केली जावी याबाबत चर्चा करणार आहे. सध्या तरी पालिकेला २३२ कोटी रुपयांचा कर येणे बाकी आहे. ही कर वसुली व्हावी यासाठी आम्ही राज्य सरकारला वारंवार साकडे घातले होते. मात्र राज्य सरकारने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असून अद्याप कोणतीही कर वसूली न झाल्याने आता आम्ही केंद्र सरकारचे सहाय्य घेणार आहोत अशी माहिती एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने दिली.
काही शासकीय इमारती तसेच खासगी संघटनांकडून पालिकेला २५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर येणे बाकी आहे. २०७ कोटी रुपयांची पाणीपट्टी यात महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ अर्थात म्हाडाकडून येणाऱ्या ९०.७ कोटी रुपयांच्या पाणीपट्टीचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय कापड उद्योग (एनटीसी) कडून ८.९६ कोटी रुपये, २४ लाख रुपये बेस्टकडून तर ४.१ कोटी रुपये पश्र्चिम रेल्वेकडून येणे बाकी आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शासकीय इमारतींना धमकावूनही त्यांच्याकडून हा करभरणा येत नसल्याने काहींचा पाणीपुरवठाच आम्ही बंद केला आहे. मात्र पालिका नियमात शासकीय इमारतींवर कशाप्रकारे कारवाई करावी यासाठी तरतूद नसल्याने आम्ही अधिक काहीही करू शकत नसल्याची खंत एका पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. पालिका आयुक्त जयराज पाठक यांनी पश्र्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्ट बंदर आदींना त्वरीत पाणीपट्टी आणि घनकचरापट्टी भरण्याबाबत गेल्या आठवड्यात पत्र पाठवले होते मात्र पालिका आयुक्तांच्या या इशाऱ्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे अखेर केंद्र सरकारची मदत घेण्याचे ठरविल्याचे पालिकेकडून कळविण्यात येत आहे.

मंगलवार, 15 जुलाई 2008

गवळीची न्यायालयात विनंती याचिका

मुंबई - शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी मोक्काखाली अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार अरूण गवळी याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी याकरिता न्यायालयात विनंतीअर्ज दाखल केला आहे.
त्यावर न्यायालय गुरूवारी निर्णय देण्याची शक्‍यता आहे.
मोक्‍का न्यायालयाचे न्यायाधिश वाय. डी. शिंदे हे तीन दिवस रजेवर असलेने गवळीच्या विनंतीअर्जावरील सुनावणी तीन दिवस पुढे ढकल्यात आली आहे.

भारिप-बहुजन महासंघाचे प्रवेशासाठी आंदोलन; पोलिसांचा लाठीमार

अहमदनगर - स्थानिकांना डावलून परप्रांतियांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करून त्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि येथील अहमदनगर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मंगळवारी सकाळी साडेअकरा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला.
नगर महाविद्यालयात शहरातील विद्यार्थ्यांना डावलून मिझोराम आणि अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाच्या जिल्हा संघटक ऍड. अनिता दिघे यांनी केला. याची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयात गेल्यावर प्रवेशासाठी नेमलेल्या काही दलालांनी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप दिघे यांनी केला.
दरम्यान महाविद्यालय सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. घटनेनंतर महाविद्यालय बंद करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सहकारमंत्री पतंगरावांच्या भारती विद्यापीठावर मनसेचा हल्ला

सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठावरही राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी आज हल्ला चढविला. परप्रांतीयांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्कत्यांनी सलग चौथ्या दिवशी , मंगळवारी सातारा रोडवरील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजवर , तसेच आयटी आणि बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटवर दगडफेक केली. यामध्ये मेडिकल कॉलेजची एक मुलगी जखमी झाली आहे.
गेले तीन दिवस मनसे कार्यर्कत्यांनी विविध शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा , तसेच मंगळवारी सकाळीही पोलिसांनी सुमारे २०० कार्यर्कत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह ७-८ कार्यकतेर् मोटारसायकलवरून भारती विद्यापीठाच्या आवारात पोचले. त्यांनी बाहेरूनच इमारतीच्या काचांवर दगडफेक केली आणि लागलीच तेथून पोबारा केला. जाताना आयटी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या इमारतीवरही त्यांनी दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप अटक झाली नसून तपास सुरू आहे.
दरम्यान , मेडिकल कॉलेजच्या पायऱ्यांवर बसलेली एक विद्याथिर्नी काच लागल्याने जखमी झाली असून तिला भारती हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आले आहे.
सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सात-आठ भुरटे लोक आले आणि काचांवर दगड मारून पळून गेले. हा हल्ला कसला, निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. कदम यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच आधी प्रवेश परीक्षा होते. त्या परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यापूर्वीच हा स्टंट करण्यात आला, असे ते म्हणाले.

सोमवार, 14 जुलाई 2008

हेल्मेट सक्तीविरुद्ध सविनय कायदेभंग

नागपूर, १४ जुलाई-शहरातील दुचाकी वाहनचालकांना हेल्मट घालण्याची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत, या निर्णयाविरुद्ध आपण सविनय कायदेभंग करणार असल्याचे भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
२००३ मध्ये राज्य सरकारने हेल्मेट सक्तीचा आदेश काढला होता. मात्र महापालिका क्षेत्रात कॉमन सर्वानाच असा आदेश काढणे चुकीचे आहे, असे फडणवीस यांचे मत आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १२९ नुसार आयएसआय ट्रेडमार्कचे हेल्मेट वापरण्यास सांगण्यात आले आहे. तरीही हेल्मेट पूर्णपणे सुरक्षा देऊ शकत नाहीत, चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत जवळपास १० हजाराच्या घरात आहे, ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही.
सरकार स्कार्फ वापरण्यावर एकीकडे बंदी आणतेय तर दुसरीकडे संपूर्ण चेहरा झाकेल अशी हेल्मेट वापरण्याचा आदेश देतेय, हे सरकारच्या निर्णयाशीच विसंगत आहे. त्यामुळे या आदेशाचा सविनय भंग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

अखेर ७०:३० चा घोळ संपला

मुंबई, दि. १५ : अकरावीसाठी ७०:३० अशा जिल्हा निहाय कोटयानुसार प्रवेश देण्याच्या निर्णयाबाबत कोलांटी उडी घेत राज्य सरकारने हा जिल्हा कोट्याचा वादग्रस्त निर्णय स्वत:हून मागे घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सादर करुन राज्यसरकारने हा अध्यादेश रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा घोळ संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
अकरावीमध्ये प्रवेश देताना महाविद्यालयांनी आपल्या जिल्ह्यातील ७० टक्के आणि बाहेरील जिल्ह्यातील ३० टक्के विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे असा अध्यादेश राज्य सरकारने काढला होता। त्यातच मुंबईत अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पार पाडल्यानंतर हा आदेश आल्यामुळे महाविद्यालये, पालक व विद्यार्थी गोंधळात पडले होते. या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळवणे अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे ठाण्यातील नगरसेकव प्रताप सरनाईक आणि सुधीर बर्गे यांनी या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
त्यावर न्यायालयाने अकरावी प्रवेशाला तात्पुरती स्थगिती देवून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्यसरकारला दिले होते. त्यानुसार सरकारच्या वतीने काल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञाद्वारे ७०:३० चा अध्यादेश रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यंदाच्या वर्षासाठी ही पध्दती लागू होणार नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थींच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळविण्याचा मार्ग निदान यावर्षी तरी मोकला झाला असल्याने अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीपट्टी भरण्यासाठी पालिकेची पश्र्चिम व मध्य रेल्वेला नोटीस

मुंबई, दि. १५ : मुंबईत कमालीच्या पाणीटंचाईने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले असताना पाण्याचा हवा तसा वापर करून त्याची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीही न भरणाऱ्या पश्र्चिम व मध्य रेल्वेला यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
गेल्या महिन्यात पालिका आयुक्त जयराज पाठक यांनी स्वत: पश्र्चिम आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाणीपट्टी भरण्यासंबंधीचे छोटेखानी पत्र पाठवले होते. या पत्रात पश्र्चिम रेल्वेवर ४.१० कोटी तर मध्य रेल्वेकडून ३.५० कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले। मात्र अद्याप दोन्हीही रेल्वेकडून बिलाची रक्कम आलेली नाही. पालिकेकडून पश्र्चिम आणि मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानक, कारशेड आणि स्टाफ क्वाटर्सला पाणी पुरवठा केला जातो. मात्र आत्तापर्यंत एकदाही या दोघांनी पाणी बिलाची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे निर्धारित करून दिलेल्या वेळेत पश्र्चिम आणि मध्य रेल्वेकडून पाणीबिल भरले न गेल्यास पाणी पुरवठा रद्द करण्यात येईल असा इशारा जल अभियंता एम. एम. कांबळे यांनी दिला आहे.
तर भाजपाचे उत्तर मुंबई महासचिव विनोद शेलार यांनी रेल्वेचे मालाड, कांदिवली आणि दहिसर या तीन ठिकाणी क्वाटर्स असून येथे दर दिवशी १०० टॅंकर पाणी पुरवठा करतात. मात्र सध्या मुंबईत असलेल्या पाणी टंचाईमुळे या परिसरातही १०० पाण्याचे टॅंकर्स पुरेसे ठरत नाहीत. जर रेल्वेने पाणी पुरवठा करणे रद्द केल्यास भाजपानेते आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

गुन्हेगारी जगताने घेतला सांकेतिक भाषेसाठी आयपीएलचा आधार

मुंबई, दि. १५ : भारतीय बॅटवर विसंबून राहू नका...चांगल्या परिणामासाठी सिझन बॅट वापरा....संपूर्ण संघाला बाद होऊ देऊ नका...केवळ छक्के मारत रहा...एका मागोमाग चौकारांचा पाऊस पडू द्या...अंपायरपासून विशेषत: तिसऱ्या अंपायरपासून सावध रहा तसेच कोणताही अपघात होण्यापासून सावध रहा... हे वाचून तुम्हाला गॅरी कस्टर्न तर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना टिप्स तर देत नाही ना असे वाटेल पण तसं काहीही नसून हे सर्व काही गुन्हेगारी जगतावर अधिराज्य करणाऱ्या गॅंगस्टर्सचे बदललेली सांकेतिक भाषा अर्थात कोड वर्ड आहेत.
गुन्हेगारी जगतावर अधिराज्य करणाऱ्या गॅंगस्टर टोळ्यांनी आपली सांकेतिक भाषा बदलली आहे। मुंबई पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी आपली सांकेतिक भाषा बदलून टाकली आहे.
खोका-पेट्यांची जागा "कान' आणि पेटीची "जागा' हाताने घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकत्याच काही फोन टॅपिंगद्वारे ही सांकेतिक भाषा टॅप केली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी जगताने आपल्या सांकेतिक भाषेसाठी नुकत्याच झालेल्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यातील भाषेचा वापर समाविष्ट केला आहे. गुन्हेगारी जगताने आपली सांकेतिक भाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीच्या सांकेतिक भाषेत टपका डाल ऐवजी आता आऊट, छक्का मार दे ऐवजी हिट द सिक्सर, पांडू से बचके रहेना ऐवजी अम्पायर देख रहा हैं, देसी घोडाऐवजी इंडियन बॅट तर सिझन बॅटचा अर्थ एके-४७ असा होतो (यापूर्वी झाडू वापरायचे).
तर षटकार मारू नको असे कोणत्या गॅंगस्टर टोळीकडून आपल्या सहकाऱ्याला सांगण्यात येते म्हणजे केवळ त्या व्यक्तीला धमकावणे, ठार करणे नव्हे। चौकारचा अर्थ बुलेटचा धाक दाखवणे वा त्याच्या गाडीला अपघात घडवून आणणे असा असून षटकारचा अर्थ ठार मारणे. तसंच अम्पायरचा गुन्हेगारी भाषेतील अर्थ म्हणजे पोलीस आणि थर्ड अम्पायर म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट असा होतो. ऍक्सिडंटचा अर्थ अटक होण्याची शक्यता. वाहनांसाठीही गुन्हेगारी जगतात सांकेतिक शब्द आहेत. चार चाकी वाहनांसाठी बकरी, टॅक्सी म्हणजे चुहा (उंदीर). तर एखादा शार्प शूटर मोटारसायकलवरून आला असेल तर त्याचा सांकेतिक शब्द मुर्गी असा ठेवण्यात आला आहे.
पोलिसांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी गुन्हेगारी जगतात अशा सांकेतिक भाषेचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे एकदा का पोलिसांना या सांकेतिक शब्दांचा अर्थ कळल्यास त्या गुंडाचं काही खरं नसतं. त्यामुळे गुन्हेगारी जगतात सतत सांकेतिक भाषा बदलली जाते.