सोमवार, 4 अगस्त 2008

शिवसेना, राष्ट्रवादीत हाणामारी

शहापुर, ४ अगस्ट- शहापूरजवळ खुटघर येथे शिवसेना, आगरी सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यर्कत्यांमध्ये रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हाणामारीत चार महिलांसह १६ जण जखमी झाले असून त्यांना शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.
आगरी सेनेचा वर्धापनदिन नुकताच खुटघर येथे झाला. त्यावेळी आगरी सेनेचे कार्यकतेर् मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यश राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना पचले नसावे व त्याचाच राग मनात ठेवून ही हाणामारी झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य किसन भांडे यांनी केला. तर, एका विधवेच्या भांडणात राष्ट्रवादीच्या कार्यर्कत्यांनी सहकार्य केल्याचा राग येऊन ही हाणामारी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीतफेर् करण्यात आला आहे.
हाणामारीत राष्ट्रवादीचे ११ तर शिवसेना व आगरी सेनेचे पाचजण जखमी झाले. शहापूर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिस इन्स्पेक्टर शिवाजी शेलार काही जखमींना घेऊन एका खासगी गाडीतून उपजिल्हा हॉस्पिटलकडे येत असताना जमावाने गाडीवर दगडफेक करून शेलार यांना धक्काबुक्की केली असे प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितले मात्र, शेलार यांनी त्याचा इन्कार केला आहे.

उच्च न्यायालयाने "गर्भपात प्रतिबंधक' कायद्याविरुद्ध याचिका फेटाळली

मुंबई, ४ अगस्ट- "गर्भपात प्रतिबंधक' कायद्याला आव्हान देणारी याचिका आज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुंबईमधील मेहता दांपत्याने ही याचिका दाखल केली होती.
गर्भामध्ये दोष असल्याने मेहता यांना चोवीस आठवड्यांनंतर गर्भपात करायचा होता. परंतु कायद्याप्रमाणे मातेच्या जिवाला धोका असल्याशिवाय वीस आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्याला गर्भपातास परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती.
या याचिकेला अनुसरून वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनीही सध्याचा कायदा अपूर्ण असल्याचे मत नोंदविले होते.
ही याचिका दाखल झाल्यापासून या विषयावर बरीच मतमतांतरे व्यक्त झाली होती. त्यामुळेच सगळ्यांचेच लक्ष आता उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते.

आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बस पेटवली

उस्मानाबाद, ४ अगस्ट - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजी ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी येथून १५ कि।मी. अंतरावर असलेल्या हिंग्लजवाडी गावात नागपूर-पंढरपूर बस पेटविली.
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या काही आंदोलनकर्त्यांनी नागपूर- पंढरपूर बसवर दगडफेक करत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि बसला आग लावली. या आगीत बस पूर्णतः: जळून खाक झाली. या गोंधळादरम्यान बसमधून उतरताना एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली. बस पेटविल्यानंतर त्याठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीची पत्रके टाकून आंदोलनकर्ते पसार झाले.

राजीवजींच्या हत्येचा पश्चात्ताप होतोय!

मुंबई, ४ अगस्ट- ' राजीव गांधी हे महान नेते होते. त्यांच्या हत्येमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा मला मोठा पश्चात्ताप होत आहे,' असे नलिनी श्रीहरन हिने म्हटले आहे. मात्र हत्येच्या प्रमुख सूत्रधाराला काहीच शिक्षा झाली नसल्याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे.
नलिनी हिने अन्य चार जणांसह १९९१ साली राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला। दुदैर्वाने तो यशस्वी झाला. त्याबद्दल आता आपल्याला प्रचंड पश्चात्ताप होत आहे, असे तिने म्हटले आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला ई मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत तिने हे नक्राश्रू ढाळले आहेत. हत्येचा खरा सूत्रधार पकडला गेला का, असे विचारले असता, 'खरे सूत्रधार सिवारसन, सुबा आणि धनू हे त्या बॉम्बस्फोटातच ठार झाले. धनू तर स्वत:च मानवी बॉम्ब होती. त्यामुळे त्यांना शिक्षा होणे शक्यच नव्हते,' असे काहीसे गोलमाल उत्तर तिने दिले. एलटीटीईचा फोटोग्राफर एस. हरीबाबू यानेच या कटाची माहिती उघड केली होती.
हत्येनंतर महिन्याभरात अटक झालेल्या नलिनीला मृत्यूदंड झाला होता. मात्र गरोदर असल्यामुळे सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर तिची शिक्षा कमी करून जन्मठेप करण्यात आली. काही दिवसांपूवीर्च प्रियांका गांधी यांनी तुरुंगात नलिनी यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिचे मतपरिवर्तन झाल्याचे सांगितले जाते.