अहमदाबाद, २७ जुलै - येथे शनिवारी झालेल्या १७ भीषण बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच राज्य सुरक्षा संस्थेत सुसंवाद साधण्यासाठी गुजरात सरकारने रविवारी गृहखात्याच्या अधिपत्याखाली एका विशेष समितीची नियुक्ती करण्याची घोषणा केली.
गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी माहीती देताना सांगितले कि, बॉम्बस्फोट मालिकेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक विशेष समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत चार अन्य सदस्य असून त्यामध्ये राज्य पोलिस संचालक प्रमुख, राज्य आय. बी. प्रमुख, कायदा संचालक तसेच डायरेक्टोरेट ऑफ फोरेंसिक सायन्सचे संचालक यांचा समावेश आहे.
ही समिती केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच अन्य राज्यांच्या सुरक्षा संस्थांशी सुसंवाद साधून राज्य पोलिसांच्या मदतीने बॉम्बस्फोट मालिकेच्या तपासात मदत करेल.
याशिवाय केंद्रीय सुरक्षा समिती तसेच अन्य राज्यांच्या सुरक्षा समित्यांकडून याआधीच्या बॉम्बस्फोटांच्या तपासाच्या माहीतीचा अभ्यास करून अहमदाबाद येथील बॉम्बस्फोटाची दिशा ठरवेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें