मुंबई, ५ अगस्ट- मध्यंतरी वाढदिवसाच्या पार्टीत सलमानखान आणि शाहरुख खान यांच्यात झालेल्या वादानंतर कॅटरीना कैफ सलमानवर नाराज झाली होती. त्यामुळे ती बॉयफ्रेंड' सलमानखानशी असलेली मैत्री तोडणार असा समज सगळीकडे पसरला होता. पण या समजाला कॅटरीनाने मंगळवारी छेद दिला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या "फेंडशिप डे'च्या पार्श्वभूमीवर या दोघांचे पुन्हा जुळल्याची चर्चा आहे.
"आमच्याबद्दल कुणीतरी उगाचच गैरसमज पसरवीत असून मी सलमान खानबरोबर असलेले "प्रोफेशनल' संबंध अजून तोडलेले नाही'' असे स्पष्टीकरण कॅटरिनाने केले। एका कार्यक्रमानंतर ती पत्रकारांशी बोलत होती" चांगली स्क्रिप्ट असेल तर मी नक्कीच सलमानखान बरोबर चित्रपटात काम करेल। तसेच आमच्या तारखा जुळल्या तर सोहेल खानच्या पुढच्या सिनेमात आम्ही नक्की एकत्र येऊ'' असेही कॅटरिना म्हणाली.
मात्र वेळेअभावी शाहरुख खानच्या "टेंप्टेशन' या कार्यक्रमात आपण काम करणार नाही असेही कॅटरिनाने यावेळी जाहीर केले। लवकरच यशराज फिल्मच्या एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी दीर्घकाळासाठी आपण अमेरिकेत जाणार आहोत असे ती म्हणाली.
"सिंग इज किंग' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर तिने अक्षयकुमारची बऱ्यापैकी स्तुती केली. अक्षय कुमार या चित्रपटात तिचा सहकलाकार आहे.