मुंबई - मराठी चित्रपटाला आता नव्या आशय,विषय आणि संकल्पनांसोबत नव्या धाडसाचीही सयाथ मिळत आहे।मराठी सिनेमातले होणारे नवनविन प्रयोग आता प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतांना दिसत आहे.औरंगाबादच्या अशाच एका पंचवीशीतल्या विशाल सदावर्ते याने या लहान वयात लई भन्नाट या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.फक्त निर्मितीच नव्हे तर या मराठी चित्रपटात त्याने नायकाचीही भूमिका यशस्वीरित्या पार पाडली आहे.मुंबई,पुणे,नाशिक,सातारा,सांगली नंतर आता मराठवाडयातील औरंगाबाद शहरातील या विशालने निर्माता आणि नायक अशा दोन्ही जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या आहेत.नुकताच या चित्रपटाच्या माध्यमाने त्याची मुंबईत भेट झाली तेव्हा तो चित्रपटाविषयी भरभरुन बोलला....
* विशाल,चित्रपटाचा निर्माता ते नायक पर्यतच्या आपल्या प्रवासाविषयी काही सांगशील ?
- चित्रपट व्यवसाय हा काही आमचा वडिलोपार्जित वयवसाय नाही। परंर्तु चित्रपट दिग्दर्शक बाबु भट हे माझया वडिलांचे (पंकज सदावर्ते ) जवळचे मित्र्र. दोघांच्या मनात चित्रपट तयार करण्याविषयी एकमत झाल्यावर वडिलांनी याची सर्व जबाबदारी माझ्या खांदयावर टाकून मोकळे झाले, आणि मी देखील जराही विचार नकरताच होकार दिला आणि लगेचच कामाला लागलो.
* चित्रपटात काम करण्याचे कसे ठरले?
- निर्माता मी स्वत:च असल्याने सर्व कामांवर माझी बारिक नजर होतीच. चित्रपटात नविन कलाकार नायक म्हणून घ्यायचे ठरल्यावर आमच्या सर्व टीमने माझेच नाव सुचवले.याबाबत वडिलांशी चर्चा केली, त्यांनी होकार दिल्यावरही मी विचार करण्यासाठी दोन दिवस घेतले.्र सर्व बाजुंनी विचार करुन मी अखेर चित्रपटात नायक साकारायला तयार झालो.
* अभिनयाचे काही प्रशिक्षण घेतलेस का
- नाही, अभिनाचे मी कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. अभिनयाबाबत इतकेच सांगु शकतो की, काही वर्षांपुर्वी मी गोविंदाचा नसीब हा चित्रपट पाहिला होता, आणि तेव्हा मनाशी ठरवलं होतं की चित्रपटात काम करणयाचा योग आला तर विनोदीच करणार.नशीबाने माझा हा पहिलाच चित्रपट विनोदी आहे.
* निर्माता आणि अभिनय दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितरित्या कशा पार पाडल्यास ?
- सुरवातीला थोडं अवघड वाटल्यासारखं झालं कारण, प्रॉडक्शनच्या सर्व कामात मी हवाच होतो आणि नायक म्हणूनही मी सेटवर हवा होतो।यासाठी नंतर काही दिवसांनी मी योजनेने काम केले.सर्वप्रथम मी माझे प्रसंग चित्रित करुन घेतले,नंतर माझ्याशिवाय असलेले प्रसंग चित्रित केले.
* चित्रपटाविषयी काही सांग....
- लई भन्नाट हा चित्रपट नावाप्रमाणेच लई भन्नाट विनोदी आहे।ही एक प्रेमकथा आहे ज्याला विनोदी सादरीकरणाची झालर आहे.चित्रपटात एकूण सात गाणी आहेत.या चित्रपटाचे 90 टक्के चित्रिकरण औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.चित्रटात माझी नायिका तेजस्विनी पंडित आहे.याशिवाय चित्रपटात अनंत जोग,विनय आपटे,राहुल सोलापूरकर,संजय सुगावकर यांच्या विशेष भूमिका आहे, आणि चित्रपटील एका फटकेबाज लावणीत महाराष्ट्ाची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर दिसणार आहे.चित्रपटाचा विषय लक्षात घेता हा चित्रपट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात औरंगाबाद,नाशिक,नगर,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि याठीकाणी स्वतंत्र प्रिंटसह प्रदर्शित करणार आहोत.
नृत्य आणि अभिनयाचा सुरेख संगम साधणारी यशस्वी अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांना नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। या निमित्ताने जयश्रीबाईंच्या यशस्वी कारकीर्दीचा घेतलेला आलेख -
1955 सालापासून आजवर अनेक मराठी चित्रपटातून चमकलेल्या जयश्री गडकर यांचा जन्म 1942 साली झाला। त्या कर्नाटकातील कारवारच्या आहेत. नृत्य आणि अभिनयाचा सुरेख संगम साधणाऱ्या जयश्री गडकर यांनी 1955 मध्ये चित्रपती व्ही. शांताराम यांच्या गाजलेल्या "झनक झनक पायल बाजे' या चित्रपटाच्या अभिनेत्री संध्या यांच्याबरोबर गु्रपडान्समध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांच्या नृत्याचे फोटो काढून राम देवताळे यांनी दिग्दर्शक दिनकर पाटील यांना दाखवले. दिनकर पाटील यांच्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात अभिनेते राजा गोसावी यांच्या समोर एक नृत्य करण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली. हाच त्यांचा पहिला मराठी चित्रपट. शांताराम बापूंच्या आशिर्वादाने ज्या अनेक कलावंतांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यातील एक जयश्रीबाई. पुढे त्यांनी एका पाठोपाठ एक सरस भूमिका करीत मराठी चंदेरी दुनियेत आपलं बस्तान मांडलं. "उतावळा नवरा पैशाचा पाऊस, "अवघाची संसार', "आलिया भोगासी' अशा चित्रपटातून त्यांनी राजा गोसावींची नायिका म्हणून काम केले त्यातील एक जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर यांच्या गाठ पडली ठका ठका या चित्रपटात एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका केली. यानंतर त्यांना तमाशाप्रधान चित्रपटाची नायिका म्हणून अमाप यश मिळाले.
1959 मधील अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या सांगत्ये ऐका या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात 132 आठवडे चालण्याचा विक्रम केला होता। "सांगत्ये ऐका' मधील "बुगडी माझी सांडली गं...' या लावणीने अनेकांना वेड लावले. जयश्री गडकर-राजा गोसावी ही जोडी गाजल्यानंतर अभिनेते सुर्यकांत यांच्या बरोबरही जयश्रीबाईंनी पंचारती, रंगपंचमी, वैजंयता, लाखात अशी देखणी अशा अनेक चित्रपटातून कामे केली. त्यांनतर त्यांची अरुण सरनाईकबरोबर चांगली जोडी जमली आणि त्यांचे सवाल माझा ऐका, गणगवळण, एक गाव बारा भानगडी हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. मानिनी या चित्रपटातील प्रमुख भूमिका जयश्रीबाईंनी यशस्वीरित्या साकार करून महिलावर्गामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटविला. सुभद्राहरण मध्ये त्यांनी विक्रम गोखलेची नायिका म्हणून काम केले. अशी ही नृत्यनिपुण अभिनेत्री मराठीतली महानायिका बनली. त्यामागे त्यांची खूप मेहनत आहे.
मराठीप्रमाणे हिंदीतही महान अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर जयश्रीबाईंनी काम केले आहे। प्रायव्हेट सेक्रेटरी, सारंगा, बजरंगबली, तुलसी विवाह हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट आहेत. नृत्यप्रधान, अवखळ, खट्याळ, नखरेल, सालस, सात्विक, सोज्वळ अशा विविध भूमिका जयश्रीबाईंनी समर्थपणे साकार केल्या आहेत. रामायण या मालिकेतही जयश्रीबाईंनी समर्थपणे बाळ धूरीबरोबर भूमिका केली आहे. 1975 मध्ये जयश्री गडकर यांचा बाळ धुरी यांच्याबरोबर विवाह झाला. सासर माहेर आणि अशी असावी सासू या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं. जयश्री गडकर यांना साधी माणसं, मानिनी, वैजयंता आणि पवनकाठचा धोंडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच व्ही. शांताराम पुरस्कार, गदिमा पुरस्कार, माणूस पुरस्कार, अल्फा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जयश्री गडकर यांना महाराष्ट्र शासनाने चित्रभूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांना खूप आनंद झाला आहे. मुंबई मित्र परिवारातर्फे जयश्री गडकर यांचे हार्दिक अभिनंदन.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें