नवी दिल्ली, ३१ जुलै- बसपा अध्यक्षा मायावती पंतप्रधान पदाच्या उमेदवार नाहीत, अशी घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. मायावतींना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जाण्याच्या तिस-या आघाडीच्या प्रयत्नांपासून आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करत भाकपने आपण कुणाही व्यक्तीला असे प्रोजेक्ट करू इच्छित नसल्याचे म्हटले आहे.
पक्षाचे महासचिव प्रकाश करात म्हणाले, की मला खात्री आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी आपल्या बळकटावस्थेत उभी राहू शकेल.
कॉंग्रेस किंवा भाजप या पक्षांव्यतिरिक्त राजकारण उभारता येईल अशा तिस-या आघाडीच्या निर्मितीचा प्रयत्न डावे पक्ष करीत आहेत.
तिसरी आघाडी केवळ निवडणुकांपूरती मर्यादीत नसावी तर या आघाडीचा खास कार्यक्रमही असावा असे आपल्या पक्षाचे म्हणणे असल्याचेही करात यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें