रविवार, 13 जुलाई 2008

कबड्डी स्पर्धेत देवरुख स्पोर्टस्‌क्लब मुलींचा संघ विजयी

संगमेश्वर, दि.१४ : रत्नागिरीतील आर्यन स्पोर्टस क्लब आयोजित जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सवात देवरुख स्पोर्टस कल्बच्या मुलींच्या संघाने कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले.
रत्नागिरीतील छ. शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत १४ ते १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी व खो-खो स्पर्धेत एकूण २२ संघानी सहभाग हायस्कूलचा ३४/७ असा एकतर्फी तर १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत शिर्के हायस्कूलवा ३३/१५ असा दणदणीत विजय मिळविला। दोन्ही गटातील विजेतेच आपणाकडे राखले होते. या विजयबद्दल दोन्ही संघाचे शहरातून कौतुक होत आहे. मुलींमधील क्रिडा गुणांना चालना मिळावी यासाठी देवरुख स्पोर्टस क्लबने मुलींचे संघ तयार केले असून या संघानी आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
ऍकॅडमीच्या या यशाबद्दल आमदार सुभाष बने, अशोक जाधव युयुसु आर्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडी प्रमुख डॉ. नलीनी भुवड, जि.प.स. आरक्याशेठ बने यांनी खास अभिनंदन केले आहे.

ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा पुण्याचे वर्चस्व

ठाणे, दि.१४ : ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदाही पुण्याने बाजी मारली आहे. पहिले पाच ही क्रमांकावर पूण्याच्या आर्मांने वर्चस्व मिळवित प्रथम क्रमांकाचा मान नीरजपाल सिंग याने तर महिलांची स्पर्धा उरणच्या निलम कदम हिने बाजी मारली.
ठाणे मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने पार पडलेल्या १९ व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेतील मुख्य स्पर्धा (४२ किमी) पूण्याच्या आर्मीतील नीरज पालसिंग यांनी २ तास २३ मिनिटांनी पार करीत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला, तर जयाभाई दत्तात्रय यांनी २ तास ३९ मिनिटे १२ सेकंदाने दुसरा क्रमांकाचा मान पटकावला. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या मानावे लागणारे नथुराम त्यांचा दुसरा क्रमांक २० सेकंदानी हुकला। तसेच चौथ्या क्रमांकावर शिवदान सिंग आणि पाचव्या क्रमांकावर प्रदीप कुमार हे पुणे आर्मीच्या नावांची नोंद आज झाली. विशेष म्हणजे पहिला आलेला नीरजपाल हा पहिल्यांदा पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत धावत होता.
दरम्यान १० किमी महिलांच्या स्पर्धेत प्रथम निलम कदम हिने ३२ मिनिटे ५२ सेकंदात अंतर पार करून विजय आपल्याकडे खेचून आणली. तर पश्चिम रेल्वेची वैशाली हजारे हिने ३४ मिनिटे ३१ सेकंदात अंतर कापील दुसरा क्रमांक पटकावला। तर सारती संस्थेंची मंजूळा पावेल हि तिसरी आली. निलम कदम हिने मागील वर्षा ठाणे महार्पौर स्पर्धा जिंकली होती.
या स्पर्धेतील मिश्र रेल्वे मॅरेथॉन स्पर्धा पश्चिम रेल्वेने मारली। तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पूणेकरांना समाधान मानावे लागले. तसेच धम्माल ऑलिंपीक दौड स्पर्धा मुंबईच्या अमित नाचरे याने जिंकली. तर ठाण्याच्या विठ्ठल कांबळे याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या व्हीलचेअर्स स्पर्धा वाजिद कुरेशीने जिंकली असून दुसऱ्या क्रमांकावर सुरेश नाचाणे आणि तिसऱ्या क्रमांकावर सत्यप्रकाश तिवारी यांना समाधान मानावे लागले.
पहिल्यांदा धावलो आणि जिंकलो. नीरजपाल यापूर्वी आपण अर्ध मॅरेथॉनमध्ये धावलो आणि यंदा पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावलो आणि तीही जिंकलो. त्यामुळे खूप आनंद झाला असल्याचे नीरजपाल यांनी सांगितले या स्पर्धेसाठी तीन महिन्यांपासून जोमाने सराव केल्यानेच हा विजय खेचून आणता आला.

भातसाच्या दुषित पाण्याचा ग्रामस्थांनी घेतला धसका

टिटवाळा, दि.१४:वासींद येथे "भातसा'च्या पात्रात हजारो मासे मृत पावल्याचे ऐकल्यानंतर कल्याण ग्रामीण भागात नदीच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली असून याच भागातील नदीकाठच्या रहिवाशांनी "भातसा' चे पाणी पिणे बंद केले आहे.
शहापूर तालुक्यातील वासींद गावात ९ जुलै रोजी भातसाच्या पात्रातील हजारो लहान मोठे मासे अचानक मृत पावल्याने परिसरातील रासायनिक कंपन्यांच्या दूषित पाण्याकडे बोट दाखविण्यात येत होते. परंतु शासकीय यंत्रणा अशा कारखान्यांची चौकशी करून कारवाई करण्याऐवजी चौकशी सुरू असल्याचे सांगत असल्याने सतत दूषित होणाऱ्या भातसा नदीतील पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या कल्याण तालुक्यातील लोकांत चांगलीच घबराट पसरली आहे. कारण यापूर्वी अशाच प्रकारे एकवेळ खडवली येथील भातसाच्या पात्रात रसायन मिश्रीत तेलाचा तरंग पाण्यात आढळला होता. त्यावेळी सुद्धा प्रदूषण महामंडळ, तहसिलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या जिवापेक्षा कारखानदारांची बाजू मांडून प्रकरण दाबले. म्हणून वासींद येथील घटनेतसुद्धा रासायनिक कंपन्यांचा हात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. सुप्रसिद्ध लिबर्टी ऑईल मिलच्या दूषित रसायन युक्त पाण्याने ही घटना झाल्याचे लोक सांगतात. पण शासकिय यंत्रणा कबूल करण्यास तयार नाही. म्हणून लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

ड्राय-डे मुळे मद्यपींचा गोराई-मनोरीकडे मोर्चा

मुंबई, दि. १४ : आषाढी एकादशी हा मद्यपींसाठी ड्राय-डे असल्यामुळे शहरातील बिअर बार व दारुची दुकाने बंद असतात. त्यामुळे वर्षाचे बाराही महिने ओल्या पार्ट्या झोडणाऱ्यांची मोठी पंचाईत होते. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील तळीराम दरवर्षी ड्राय-डेच्या दिवशी आपला मोर्चा बोरिवली पश्र्चिमेकडील गोराई व मनोरी बीचकडे वळवतात. कारण या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वच हॉटेल्स आणि रिसॉर्टवाले या तळीरामांची उत्तम बडदास्त ठेवतात.
पोलीस कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी येथील हॉटेल्सचे मालक मद्यपींसाठी वेटिंग रुममध्ये सोय करून देतात. त्यामुळे दरवर्षी ड्राय-डेच्या दिवशी हे रिसॉर्टस्‌ ओसंडून वाहतात आणि तळीरामांची तहान शांत करतात.

हुल्लडबाजी करून त्रास देणाऱ्या नायजेरियन नागरिकांची हकालपट्टी

मुंबई, दि. १४ : रात्री उशिरापर्यंत डान्सपार्टी आयोजित करून हुल्लडबाजी करणाऱ्या कालिना येथे राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांना वाकोला पोलिसांनी हुसकावून लावले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कालिना येथील कोलोवेरी गावात राहणाऱ्या इसबेल शेकर या महिलेच्या शेजारी १२ हून अधिक नायजेरियन नागरिक अवैधरित्या भाड्याने वास्तव्य करीत होते. हे नागरिक रोज रात्री उशिरापर्यंत डान्सपार्टी आयोजित करून आसपासच्या लोकांची झोपमोड करीत होते. याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर शास्त्री नगर आणि कालिना गावातील रहिवाशांनी अखेर याप्रकरणी कालिना रहिवाशी संघटनेची मदत घेतली. कालिना रहिवाशी संघटनेने वाकोला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी कारवाई करून या सर्वांच्या मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेले नायजेरियन नागरिक अवैधरित्या या परिसरात रहात होते. कोणताही पुरावा न पाहता त्यांना या ठिकाणी रहायला घरमालकांनी परवानगी दिल्याचे तपासात उघड झाले असून पोलिसांनी सखोल चौकशी हाती घेतली आहे.

फेम मल्टिप्लेक्सकडून बीपीओ कर्मचाऱ्यांसाठी खास सकाळचा चित्रपट शो

मुंबई, दि. १४ : सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर गलेलठ्ठ पगार देणाऱ्या बीपीओ कंपन्यांकडे आकर्षित होत आहेत. गलेलठ्ठ पगार तर मिळतो मात्र शिफ्ट ड्यूटींमुळे बीपीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनोरंजनासाठी वेळच मिळत नाही. एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला तर तो पहायला मिळत नाही अशावेळी या कर्मचाऱ्यांना नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा आस्वाद घेता यावा यासाठी मालाडच्या फेम सिनेमा या मल्टिप्लेक्सने सकाळी ७.३० वाजताचा विशेष खेळ या शुक्रवारपासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
याबाबत फेम सिनेमाचे मार्केटिंग आणि जाहिरात विक्री सहाय्यक उपाध्यक्ष अभिषेक रैना यांनी सांगितले की, बहुंताश बीपीओ कंपन्या या उपनगरात असून त्या प्रामुख्याने मालाड, गोरेगाव येथे आहेत आणि हाच विचार करून आम्ही बीपीओतील रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ७.३० वाजताचा खेळ दाखविण्याची अभिनव योजना आखली आहे. कामाचे तास संपल्यानंतर इच्छुक बीपीओ कर्मचारी त्वरित चित्रपट पहायला येऊ शकतात. विशेष म्हणजे या खास शोच्या तिकिटांची किंमतही अगदी माफक आहे. ७ 0 रुपये एवढ्या अल्पदरात ही सेवा बीपीओ कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आली आहे. सकाळी ३ चित्रपटांचे शो ठेवण्यात आले असून रात्रभर काम करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना जर गोल्ड क्लासमध्ये बसून चित्रपटाचा आस्वाद घ्यावासा वाटला तर त्यासाठी त्यांना अवघे १०० रुपये मोजावे लागतील. या ठिकाणी ६१ खुर्च्या असून १६ जोड्या तेथे चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतात. येथे बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या १५० डिग्रीमध्ये फिरवून आरामात बसून चित्रपट पाहू शकतात.
एव्हढेच नव्हे तर घरात असल्याप्रमाणे अंगावर ब्लॅंकेट आणि उशीही या गोल्ड क्लास तसेच मध्यांतरमध्ये कॅफेटेरियात वेज चीज बर्गर, चिकन शम्मी कबाब पानीनी आदींसारखे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

बेहिशोबी मालमत्ता बाळगणारी मालाडची बारगर्ल गोत्यात!

मुंबई, दि. १४ : काही डान्सबारमध्ये काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या मालाड येथील बारगर्लकडे सुमारे २ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळल्याने आयकर विभागाची झोपच उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुबी रमेश ठाकूर या २४ वर्षीय बारबालेकडे अवैध संपत्ती असल्याची माहिती मिळताच आयकर विभागाने तिच्या मालाड येथील शिव महिमा अपार्टमेंटमधील घरावर धाड टाकली. या फ्लॅटची किंमत ८.५ लाख रुपये आहे. तर मालाड पश्र्चिम येथे लिकिंग रोडवर असलेल्या विजय अपार्टमेंटमध्ये ६० लाखांचा फ्लॅट आणि तिचे आजोळ असलेल्या ढोलपूर येथे ३५ लाखांचा बंगला तिने खरेदी केला आहे. रुबीच्या एचडीएफसी बॅंकेच्या गोरेगाव स्थित शाखेतील खात्यात दागिने आणि पैसे असे एकूण २५ लाख रुपये जमा आहेत। तर वर्सोवा स्थित सेंट्रल बॅंकेतही तितकीच रक्कम आहे.
रुबीकडे ६ लाख रुपयांची मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एयू ७७१२) असून याबाबत तिच्या घरच्यांना विचारले असता अशी कोणत्याही प्रकारची मालमत्ता जमा केली नसून यासंदर्भात रुबीला विचारणा करावी असे आयकर विभागाला सांगितले.
दरम्यान, अंधेरीतील दासी बार, विलेपार्ले पूर्व येथील गोल्डन बिन बार, सांताक्रुझ पश्र्चिम येथील संगीत बार, तर अंधेरी पूर्व येथील कॅम्पस बार येथे काम करणाऱ्या रुबीला महागडे जीवन जगण्याची हौस होती. मात्र तिच्याकडे इतका पैसा कुठून आला हे मात्र आयकर विभागासाठी न उलगडणारे कोडे आहे.