नवी दिल्ली, २० जुलै-संसदेत सादर होणार्या विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध मतदान करण्यासाठी तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बसपा नेत्या मायावती यांची भेट घेऊन रणनिती आखली असल्याचे वृत्त आहे.
आम्ही अणुकराराचा विरोध करत असून संसदेतही त्याचा विरोध करणार असल्याचे नायडू यांनी मायावतींशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले. ही बैठक जवळ जवळ दोन तास चालली होती.
संसदेत होणार्या विशेष सत्रात तेलगू देसम आणि बसपा संयुक्त रणनिती आखून कराराचा विरोध करणार आहेत. तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या दृष्टीने चंद्राबाबू आणि मायावती यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तेलगू देसमचे पाच खासदार असून त्यांनी ठरावाच्याविरूद्ध मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें