नाशिक, २० सप्टेम्बर- नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होताच, त्यातच काल मध्यरात्री कसारा घाटात लतिफवाडी येथे दरड कोसळल्यानं तिथे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरही वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली आहे.गेल्या चार तासांपासून संपूर्ण कसारा घाटात ट्रॅफिक जॅम झाले असून वाहतूक कासवगतीने सुरू आहे. परंतु, रस्त्यावरचा मातीचा ढीगारा बाजूला करण्याचं काम सुरू असून आणखी तासाभरात वाहतूक सुरळीत होईल, असे समजते.
नवी