सांगली - गेल्या दहा वर्षापासून पोलिस आणि ग्रामस्थांकडून संगनमताने त्रास होत असल्याच्या कारणावरून दिलिप किसन जाधव (वय ४५, रा.जाधववाडी, ता.खानापूर) यांनी बुधवारी पोलिस मुख्यालयात पेटवून घेण्याच्या इराद्याने ठाण मांडले. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल म्हणून उपाधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फच चौकशी करण्याचे अश्वासन अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी दिले.
सुमारे दीड तास मुख्यालयात श्री जाधव यांनी आपली कैफियत मांडली. याबाबतची श्री जाधव यांनी दिलेली माहिती अशी - खोटे गुन्हे दाखल करून अ माणुष मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त पोलिस निरिक्षक रामचंद्र घुगे यांच्याविरोधात खानापूर येथील विजय पाटील (रा.बामणी, खानापूर) यांनी मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली होती. सध्या न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणात श्री पाटील यांना न्यायाच्या लढ्यात निरपेक्ष भावनेने मदत केली होती. त्यामुळे संतापलेल्या पोलिस यंत्रणेने सतत त्रास दिला.
निवडणुकीचे निमित्त असो वा नाहक वाहन रोखून दंडात्मक कारवाई करणे असे प्रकार झाले. गावातील कुणाची तक्रार आली की शहनिशा न करता थेट अटकेची करणे मला साथ करणाऱ्या ग्रामस्थांच्या द्राक्षबागा कापून टाकणे असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकार गावातील विरोधकांकडून होत आहेत. त्याच्या या प्रयत्नांना पोलिस यंत्रणेतील लोक सातत्याने बळ देत आले आहेत. परवा परवान्यासह सर्व कागदपत्रे सोबत असतानाही स्वमालकीची रिक्षा काढून घेण्यात आली. याबाबत तक्रार करण्यासाठी पोलिस मुख्यालयात आल्यानंतर अधिक्षकांना भेटूच दिले जात नाही. नाईलाज म्हणून आज पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.''
अधिक्षक कृष्णप्रकाश म्हणाले,"" दहा वर्षापुर्वीच्या एखाद्या प्रकरणाचे कारण पुढे करून संपुर्ण पोलिस यंत्रणाच श्री जाधव यांना त्रास देत असेल हे न पटणारे प्रकरण आहे. घुगे यांनी चूक केली किंवा नाही याची मला माहिती नाही. त्याच्या प्रायश्चिताचा निर्णय न्यायालय करेल. परंतु एकापाठोपाठ येणारा प्रत्येक अ धिकारी असा त्रास देत असेल असे जाधव यांचे म्हणणे न पटणारे आहे. तरीही योग्य तो दंड भरून दुचाकी आजच परत द्यावी. आणि संपुर्ण प्रकरण चौ कशीचे आदेश इस्लामपूर विभागाच्या उपाधिक्षकांना देत आहे.''
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें