रविवार, 6 जुलाई 2008

वारांगनाचे मायाजाल अन्‌ पोलिसांची कोठडी

नागपूर - वारांगनेचा हट्ट पुरविण्यासाठी अनेक बॅंकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. इम्रानखान जलीलखान (वय २८) असे त्याचे नाव असून, तो छिंदवाड्यातील रहिवासी आहे.
क्‍सीचालक असलेल्या इम्रानचे गंगाजमुनातील एका वारांगनेवर प्रेम जडले. मात्र, तिने त्याला महिन्याला साठ हजार द्यावे लागतील, अशी अट घातली. ती पूर्ण करण्यासाठी इम्रानने बॅंकांना गंडविण्याचा सपाटा लावला. दुसऱ्याच्या नावाचे धनादेश मिळविल्यानंतर बनावट स्वाक्षरी करून त्याने बॅंक ऑफ इंडियाच्या शंकरनगर, धरमपेठ, सदर शाखा, पंजाब नॅशनल बॅंकेची लकडगंज शाखा, स्टेट बॅंक ऑफ इंडियाची गीतांजली, छावनी, इतवारी शाखा, सेंट्रल बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सीताबर्डी शाखा, अशा ९ बॅंकांना त्याने पाच ते सात लाखांचा गंडा घातला.
सात महिन्यांत पाच ते सात लाख रुपये प्रेयसीवर उधळल्यानंतर तो आज सकाळी साडेदहाला बॅंक ऑफ इंडियाच्या झांशी राणी चौक शाखेत गेला। त्याने दिलीप काळे यांचा धनादेश ३८६३५१ विड्रॉलसाठी दिला. १५ हजारांची रक्कम असल्यामुळे रोखपाल खातरजमा करण्यासाठी व्यवस्थापक वसंत पोरम यांच्याकडे गेले. धनादेशावर असलेली स्वाक्षरी पाहून व्यवस्थापक पोरम यांना शंका आली. त्यांनी स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी दिलीप काळे बणून बॅंकेत आलेल्या इम्रानला त्याच्या वडिलाचे नाव विचारले. गडबडलेल्या इम्रानने भलतेच नाव सांगितले. त्यामुळे पोरम यांनी त्याला गप्पात रंगवून सहकाऱ्यांच्या मदतीने धंतोली पोलिसांना बोलावून घेतले.
पोलिस निरीक्षक रामरतन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार राजेंद्र सरोदे, रवी फलके, धनराज सरोदे, श्‍याम दुल्हारे यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान इम्रानने सांगितलेली त्याची "प्रेमकथा' ऐकून पोलिस आणि पत्रकारही स्तंभित झाले. वारंगनेच्या प्रेमात पडलेला टॅक्‍सीचालक इम्रान आता पोलिसांच्या कोठडीत आहे.

विदर्भात साथीच्या रोगाचे थैमान

नागपूर - विदर्भात साथीच्या रोगाने थैमान घातले असून, आतापर्यंत पूर्व विदर्भात चंडीपुरा आजाराने दोन आणि मलेरियाने चार असे एकूण सहा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे।
साथीच्या रोगाचा प्रभाव चंद्रपूर जिल्ह्यात अधिक दिसून आला आहे. जिल्ह्यात चिकनगुण्या, चंडीपुरा, मलेरिया व डेंग्यू या संमिश्र साथीच्या आजाराचे असंख्य रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात चिकनगुण्याचे एकूण ६९ तर मलेरियाचे १८ संशयित रुग्ण आढळले. या जिल्ह्यात चंडीपुरा आजाराने एकाचा; तर मलेरियाने चौघांचा मृत्यू झाला. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात डेंग्यूचे ६ रुग्ण आढळून आले. तसेच भंडारा जिल्ह्यातसुद्धा ३५ जणांना विविध साथींचे रोग आढळले.
जिल्ह्यातील वरठी येथे चंडीपुरा आजाराने एक जण मरण पावला. नागपूरच्या दोन खासगी रुग्णालयातही डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

गुप्त धनाच्या आमिषाने तिघांना सव्वासात लाखांचा गंडा

औरंगाबाद - मोहिनी विद्येच्या बळावर पैसे दुप्पट करण्याचे व गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून तीनजणांना सुमारे सव्वासात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. सय्यद मोईन सय्यद आमीर (वय ४३), शेख मेराज शेख पाशा (दोघेही रा. गांधीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी सय्यद मोईन याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मपाणी कॉलनी, रेल्वेस्टेशन येथील तरुण धनंजय वामनराव गायकवाड (वय २९) याची सय्यद मोईन याच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. भेटीगाठींमुळे ओळखीचे रूपांतर मैत्रीत होण्यास वेळ लागला नाही. धनंजयची आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्याचे मोईन, मेराज यांनी हेरले व त्याला बनविण्यास सुरवात केली. मोईनला मोहिनी विद्या येते. त्याद्वारे मोईन अशक्‍य गोष्टीही शक्‍य करतो, असा बनाव मेराजने केला. धनंजयला ते खरे वाटले. धनंजयचा विश्‍वास बसल्याचे पाहून मोईनने मोहिनी विद्येद्वारे पैसे दुप्पट करता येतात, असे त्याला सांगितले.
धनंजयला त्याची भुरळ पडली। मोईनने धनंजयचा पूर्ण विश्‍वास बसावा म्हणून दर्ग्यात जाऊन शपथ घेतली. त्यानंतर धनंजयने ८० हजार रुपये त्याला दिले; पण मोईनचे समाधान झालेच नाही. त्याने पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. धनंजयने त्याची ही मागणीही पूर्ण केली. मोईनच्या कथित मोहिनी विद्येची भुरळ पडलेल्या धनंजयने चुलत भाऊ गिरीष गायकवाड व मेहुणा रवींद्र मुळे यांनाही मोईनला पैसे द्यायला लावले. त्यानंतर सुरू झाला मोईनचा बनवाबनवीचा खेळ. कधी पंचधातूंची अंगठी करायची, तर कधी रात्रीला गंडेदोरे करायचे असे सांगून मोईन व मेराज त्यांच्याकडून पैसे उकळत राहिले. पाच लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातल्यानंतर त्यांनी गुप्तधनाचा नवा फासा टाकला. मला गुप्तधन दिसते, काढता येते, असे सांगून मोईनने त्यांना बनविणे सुरू केले.
मोईनवर प्रचंड विश्‍वास बसल्यामुळे या तिघांनी त्याला ११ तोळे सोने दिले. त्यानंतर आज पैसे मिळतील, उद्या मिळतील, असे करून त्याने टोलवाटोलवी सुरू केली. पैसे तर देऊन बसले आता विश्‍वास ठेवण्याशिवाय तिघांजवळ पर्याय नव्हता. त्यामुळे सलग दोन वर्षे ते त्याच्या बनवाबनवीस खरेच समजत राहिले. बनवाबनवीची मर्यादा संपल्यानंतर त्यांनी त्याला निक्षून विचारले. तेव्हा त्याने माझे कोणी काही वाकडे करूच शकत नाही, असे त्यांना धमकाविणे सुरू केले. त्यामुळे धनंजयने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून मोईन व मेराजविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दौलतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य जमादार प्रकाश दांडगे अधिक तपास करीत आहेत.

चार्ल्स शोभराज पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत

काठमांडू - येथील केंद्रिय कारागृहातून सुटका झाल्यानंतर नेपाळी बालेबरोबर विवाह करून संसार थाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार्ल्स शोभराजचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्‍यता आहे। त्याने आपली प्रेमिका निहिता विश्‍वास हिच्याशी विवाह केल्यास त्याला आणखी ३ वर्षे तुरूंगात खडी फोडावयास जावे लागू शकते.
शोभराजवर महिलांना मोहपाशात ओढून त्यांची हत्या करण्याचे आरोप आहेत. १९७५ मध्ये काठमांडूमध्ये एका अमेरिकी तसेच कॅनाडाच्या प्रवासी महिलेची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने जुलै २००४ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सध्या शोभराज व त्याची प्रेमिका निहिता विश्‍वास यांच्या रोमान्स सुरू असल्याचे आहे. इतकेच नव्हे तर ६४ वर्षीय शोभराजने २० वर्षीय निहितासोबत साखरपुडाही उरकल्याचे बोलले जात आहे.
फ्रांसमध्ये राहणाऱ्या चातल नामक महिलेशी शोभराजने पुर्वी विवाह केला आहे. तसेच त्याची आणखी एक पत्नी ऑस्ट्रेलियात राहात असल्याचीही माहीती मिळाली आहे.
शोभराज मात्र पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्याचे सांगत आहे.

भारताच्या डोक्यावर काश्मिरी मुस्लिमांचा बोझा कशासाठी?

जम्मू-काश्मिरमध्ये 6 वर्षापूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता प्रचंड बंदोबस्तात विधानसभेची निवडणूक पार पडली। सुमारे 44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या काळात कॉंग्रेस आणि पीपल्स्‌ डेमॉक्रॅटिक पार्टी यांनी मुख्यमंत्रीपद निम्म्या काळासाठी वाटून घेत आजवर सरकार चालवले. मात्र आता निवडणूकांचे वेध लागलेले असताना पुन्हा जम्मू-काश्मिरमधील धार्मिक विभागणीचे तेढीत रुपांतर करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते.
अमरनाथ शाइन बोर्डाला नुकतेच निवृत्त झालेले राज्यपाल एस.के. सिन्हा यांनी ४० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला। या जमिनीचा वापर अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या भागातील यात्रेकरुंमध्ये वाढ होईल. पर्यायाने येथील जनतेला उत्पन्नाचे एक साधन मिळेल हा उद्देश आहे. मात्र काही फुटीरवादी, पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी येथील मुस्लिम जनतेच्या भावना भडकावून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा डाव रचला. भावना भडकावून ते यशस्वी होत असल्याचेही वरिल प्रकरणावरून दिसते.
राज्यपाल हे या अमरनाथ शाइन बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत। मे महिन्यात गुलाम नवी आझाद यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाने यात्रेकरूंच्या निवासासाठी 40 हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी)चे प्रमुख व माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद, सय्यद अली गिलानी व उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसेन बेग यांचाही पाठींबा होता. मात्र मुस्लिम धार्जिण्यांनी, विशेषत: हुरियतमधील गटांनी येथील मुस्लिमांना भडकावून, धार्मिक, सांस्कृतिक स्वरूप बदलण्याचा कट रचला असून बाहेरील लोकांना म्हणजे हिंदूंना या खोऱ्यात बसवून मुस्लिमांचे खच्चीकरण करण्यात येईल अशा उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली. यामध्ये पीडीपीच्या नेत्यांनीही कोलांटी उडी मारून मंत्रीमंडळात घेतलेल्या निर्णयाला विरोध केला. मुफ्ती मोहम्मद सईद त्यांची कन्या मेहबुबा, सय्यद गिलानी व मिरवेज उमर फारूख हे हुरियतमधील दोन गट, नॅशनल कॉन्फरन्सचे खा. ओमर अब्दूल्ला, फारूख अब्दूला, जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटचे यासीन मलिक, अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शंहा अशा काश्मिरमधील सर्व संघटनांच्या मुस्लिम नेत्यांनी अमरनाथ बोर्डाला विरोधात एकसुरात आक्रोश प्रकट केल्याने फुटीरतावाद्यांना आयते कोलित सापडले. ज्या बेग यांनी पाठींबा दिला होता त्यांनीच सरड्यासारखा रंग बदलून सरकारचा पाठींबा काढण्याची धमकी दिली. या धमकित आणि विरोधामागे निवडणुकीचे राजकारण असल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी भाजपा आणि इतर हिंदुत्त्ववादी संघटनानी मतांच्या राजकारणासाठी हा प्रश्न देशभरात पेटवून दिला.
त्यामुळे मुख्यमंत्री आझाद एकाकी पडले। अमरनाथ बोर्डाला भूखंड दिल्याचा सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा लागला. सिन्हा यांना हटवून एन.एन. वोरा यांची राज्यपालपदी नेमणूक केली. प्रधान सचिव अरूणकुमार यांचीही उचलबांगडी झाली. फुटीरतावाद्यांच्या सर्व मागण्या आझाद यांना मान्य कराव्या लागल्या. यातून शेवटी निष्पन्न काय झाले? अखेर कॉंग्रेसने काश्मिरच्या मुस्लिमांपुढे शरणागती पत्करत गुडघेच टेकले!
ऑक्टोबर 2002 मध्ये पीडीपी-कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले. निम्म्या काळासाठी राज्य करून पीडीपी नेत्यांनी आपल्या भाकऱ्या भाजून घेतल्या. आता निवडणूका डोळ्यासमोर दिसू लागताच त्यांनी पुन्हा आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. तरीही या काश्मिरी नेते आणि काश्मिरी मुस्लिमांच्या मनधरणीसाठी भारत कोट्यवधी रुपचे खर्च करीत आहे.सरकार कोणाचेही असो, प्रत्येकवेळी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्यातच त्यांनी धन्यता मानली. हिंदू-मुस्लिम भाई-भाईचा नारा दिला जातो. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाटाघाटी सुरू असल्याचे दिसते. वाटा मोकळ्या सुद्धा केल्या. रेल्वे पाठोपाठ बसगाड्या सुद्धा सुरू केल्या. मात्र गेल्या 10 वर्षात आपल्याला काय फळ मिळाले? 30 हजार निष्पाप लोकांच्या हत्या, हजारो भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले, काश्मिर खोऱ्यामधून काश्मिरी पंडीत आणि संपूर्ण हिंदूंना पळवून लावले. हिंदू यात्रेकरूंचा खुलेआम बळी घेतला जातो, हे कसले आमचे भाई? काश्मिर खोऱ्यामधून हिंदूंना पळवून लावले. काश्मिरी मुसलमान संपूर्ण भारतात कोठेही संपत्ती, जमिन खरेदी करू शकतो. परंतु काश्मिरमध्ये मात्र कोणीही भारतीयाला जमिन घेऊ दिली जात नाही. अमरनाथ बोर्डाला ४० हेक्टर जागा दिल्याचे व तेथे हिंदूंना आश्रय दिल्यास भविष्यात मुस्लिमांना जड जाईल या एकाच हेतूने सर्व मुस्लिमांनी एकमताने ठाम विरोध दर्शविला। विदेशी वृत्तवाहिनी "बीबीसी' वरून नेहेमी काश्मिरी मुस्लिमांवर अत्याचार झाल्याचे दाखवले जाते. परंतु हेच काश्मिरी भारतीयांचे रक्त (पैसा) कसा शोषून घेत आहेत याबद्दल बोलण्यास किंवा लिहिण्यास मात्र कोणीही धजावत नाही.
भारतातील इतर राज्यात सर्वाधिक गरीबी रेषा २६ टक्के असताना काश्मिरमधील गरीबी रेषा फक्त ३.४ टक्के आहे. सीएजीआरच्या अहवालानुसार १९९१ मध्ये काश्मिरला १२४४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. ते दरवर्षी वाढत जाऊन २००२ मध्ये ४,५७८ कोटी रुपये झाले. केंद्र सरकारतर्फे काश्मिरच्या प्रत्येक व्यक्तीवर १० हजार रुपये सबसिडी दिली जाते. अन्य राज्यांची तुलना केल्यास ते जवळजवळ ४० टक्क्यांनी जास्त आहे. त्याचबरोबर अब्जावधी रुपये विविध योजनांवर खर्च केले जात आहेत. जम्मू-उधमपूर रेल्वे योजना ६०० कोटी, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला योजना ५००० कोटी, विविध रस्त्यांसाठी २००० कोटी, सलाई पॉवर प्रोजेक्ट ६०० कोटी, दुलहस्ती हायड्रो प्रोजेक्ट ६००० कोटी, डल झील सफाई योजना १५० कोटी, अशा विविध योजनांच्या नावाखाली अब्जावधी रुपये अक्षरश: काश्मिरींसाठी उधळले जात आहेत. मात्र तरीही काश्मिरी मुसलमान अतिरेक्यांनाच पाठींबा देत असतात. त्यामागेही एक कटू सत्य असे आहे की, याच अतिरेक्यांमुळे काश्मिरी पंडीत पळून गेले. त्यांच्या जमिनी, घरे, इतर संपत्ती या मुस्लिमांनी हडपल्या आहेत. मग हेच मुसलमान पंडितानंा पुन्हा कसे स्वीकारणार? यासाठी आता या काश्मिरी मुसलमानांना धडा शिकवलाच पाहिजे. ज्या राज्यातून जास्त महसूल गोळा होईल त्या राज्याला केंद्राने अधिक मदत करावी. काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून सैन्याद्वारे सर्व अतिरेक्यांना शोधून काढून त्यांना ठेचून काढले पाहिजे. यावेळी त्यांना लपण्यासाठी थारा देणाऱ्या राजकीय नेत्यांनाही मागचा-पुढचा विचार न करता गोळ्या घातल्या पाहिजेत. पंजाबमध्ये गिल यांनी ठाम निर्णय घेतले तसे ठोस निर्णय घेऊन अतिरेक्यांना ठेचले पाहिजे. मग त्यावेळी अमेरिका असो की पाकिस्तान कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, मानवाधिकारवाल्यांनाही न जुमानता हि कारवाई व्हायला हवी. पण आम्ही अहिंसेचे प्रचारक. त्यामुळे असे कधी घडेल हे स्वप्नातही शक्य नाही. काश्मिरमधील आतंकवाद कधीच नष्ट होऊ शकत नाही असे एका केंद्रीय गृहखात्याच्या अधिकाऱ्याने रेल्वेने दिल्लीला जाताना माझ्याशी बोलताना सांगितले. अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, अतिरेक्यांशी लढण्यासाठी काश्मिरी पोलीस, बीएसएफ, सीआरपीएफ आणि सैन्य दलास दरवर्षी ६०० ते ८०० कोटी रुपये "सस्पेंस अकाऊंट' मध्ये दिले जातात। ज्याचे कोणतेही ऑडीट केले जात नाही. तसेच हे पैसे कोठे खर्च केले याचा जाबही अधिकाऱ्याला विचारला जात नाही. परंतु हा पैसा खरोखरच त्यासाठी वापरला जातो का? त्यामुळे हा प्रश्न कायम अनुत्तरीतच आहे.
यासाठी आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे। या काश्मिरी मुसलमानांना धडा शिकवायचा असेल तर यांची सबसिडी त्वरीत बंद करा. अब्जावधी रुपयांची उधळपट्टी थांबवा. तेच पैसे इतर राज्यांच्या विकासासाठी वापरा. त्यांचा पैसा बंद झाला की डोकी ठिकाणावर येतील. पोटावर लाथ बसली, पोटाला चिमटा काढला तरच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. अन्यथा हे असेच चालू राहील. धर्मनिरपेक्षतावादी व मानवाधिकारवाले आदळआपट करतील. पण त्यांना आम्ही विचारतो की, हे अतिरेकी तुम्हाला विचारून अत्याचार करतात काय? हे अतिरेकी का बनले? ते तर स्वर्गात 72 पऱ्या उपभोगण्यासाठी मिळतील या लालचेने "जेहादी' बनले. मग आमच्या पैशांवर हे ऐश करणारे कोण? जरा इज्राईल देशात डोकावून पहा. तिकडे अतिरेक्याचे घर-दार बुलडोजरने उखडून फेकले जाते. संपूर्ण परिवाराला दंड ठोठावला जातो. अतिरेक्यांचे नातेवाईक फिलीस्तानच्या रस्त्यांवर भीक मागतात. असे आमच्या भारतात कधी होईल?

छातीत कळ आल्याने उमा भारती रुग्णालयात

मनमाड, दि. 5 : मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या छातीत कळ आल्याने शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितले. देवदर्शनानिमित्त उमा भारती पंजाब मेलने प्रवास करीत होत्या.
मनमाडमध्ये पोहोचल्यावर त्या शासकीय विश्रामगृहात थांबल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत कळ आली. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

महिला पत्रकाराला विनयभंग करणारे रेल्वे कर्मचारी सस्पेंड

मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास करणा-या एका महिला पत्रकाराची छेड काढल्याप्रकरणी दोन रेल्वे कर्मचा-यांना सेवेतून सस्पेंड करण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम संपवून ही महिला पत्रकार घरी परतत असताना धावत्या लोकलमध्ये छेडखानीचा हा धक्कादायक प्रकार घडला.
एनडीटीवीचे पत्रकार धर्मेंद्र तिवारी शनिवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत घरी चालले होते. घाटकोपरला जाण्यासाठी या दोघांनी सायनला लोकल पकडली. कुर्ल्याला गाडी आल्यानंतर दारुच्या नशेत धुंद असलेला रेल्वे यार्ड मास्तर शशीकांत पाटील आणि त्याचा मित्र रविंद्र ठाकूर हेही डब्यात चढले. पाटील याने तिवारी यांच्यासोबत असलेल्या महिला साथीदाराची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेला अटकाव केला असता पाटील आणि ठाकूर यांनी तिवारींना उलट धक्काबुक्की केली.
आपण एका पत्रकार महिलेची छेड काढलीय हे लक्षात आल्यावर या दोघांनीही दमदाटी करत रेल्वे पोलिस फोर्सचे जवान असल्याचे सांगून पळून जाण्याचा प्रयत्न केला। पण या दोघा पत्रकारांनी या बेशिस्त कर्मचा-यांना जबरदस्तीने घाटकोपर स्टेशनवर उतरवून त्यांना आरपीएफच्या जवानांच्या ताब्यात दिले. पाटील आणि ठाकूर या दोघांही कर्मचा-यांना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोलेस्टेशन चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कर्मचा-यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली. तर त्यांच्या शरीरात दारूचे प्रमाण तपासण्यासाठी या कर्मचा-यांचे रक्ताचे नमून घेण्यात येणार आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल.

सोनिया-राणे भेट फक्त ११ मिनिटे

नारायण राणे शनिवारी सोनियांना भेटले. सकाळी १०.१० ते १०.२१ अशा ११ मिनिटांच्या भेटीत, राणेंनी मुख्यत्त्वे गोरेगावच्या प्रदेश काँग्रेस मेळाव्यात झालेल्या गोंधळाबाबत आपली बाजू सोनियांपुढे मांडली. त्यांचे म्हणणे सोनियांनी शांतपणे ऐकून घेतले. झाले गेले विसरून जा, प्रकरण वाढवू नका, त्यापेक्षा आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला या भेटीत राणेंना मिळाल्याचे समजले.
महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाबाबत आपली भूमिकाही निघता निघता काही मिनिटांत राणेंनी मांडली. त्यावर सोनियांनी थेटपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी राज्यात काँग्रेस संघटनेच्या संदर्भात येत्या आठवड्यात बरेच विषय मागीर् लागलेले असतील, असे संकेत एकूण वातावरणावरून स्पष्ट झाल्याचे त्यांच्या निकटवतीर्यांकडून समजले. सोनियांच्या भेटीनंतर मार्गारेट अल्वांना भेटण्यासाठी राणे त्यांच्या निवासस्थानी गेले. भेटीचा तपशील अल्वांना कथन केल्यानंतर दुपारी बारा वाजताच्या विमानाने राणे मुंबईला परतले.

अ. भा. मानवाधिकार विकल्पच्या नाशिक तालुकाध्यक्षपदी चौधरी

देवळाली कॅम्प दि. 5 - अखिल भारतीय मानवाधिकार नागरीक विकल्पच्या नाशिक तालुकाध्यक्षपदी देवळाली कॅम्प येथील राजाभाऊ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे।
नाशिक जिल्हाध्यक्ष पवन क्षिरसागर व सरचिटणीस कुलदिप गाभा यांनी नाशिक येथे झालेल्या अ. भा. मानवाधिकार नागरीक विकल्पच्या बैठकीत राजाभाऊ चौधरी यांना तालुकाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देताना विकल्पचे नियम व करावयाची कामे याबाबत सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणेकामी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख, कार्याध्यक्ष शेरूभाई शेख, नाशिक शहराध्यक्ष अंजुम मकरानी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. राजाभाऊ चौधरी यांचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे, रिपाई नेते विश्वनाथ काळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, जि. प. सदस्य हेमंत गोडसे, पं. स. उपसभापती सुभाष शिंदे त्याचप्रमाणे अनिल गोडसे, दिपक बलकवडे, तानाजी करंजकर, सुरेश कदम, काकासाहेब देशमुख, प्रशांत जाधव, संजय गोडसे, चंद्रकांत गोडसे, आर डी जाधव, सुरेश निकम, संतोष शिंदे, रवी डोंगरे, शरद गोडसे, गोविंद मोजाड, संतोष गोडसे, संजय सुरेश गोडसे आदींनी अभिनंदन केले.

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचे ३२ बळी

लखनऊ - गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि घरे कोसळण्याच्या घटनांमुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत ३२ जणांचा बळी गेला आहे।
राज्यातील सर्व मोठ्या नद्या दुथडी भरून वाहात आहेत. अयोध्येतील घागरा नदीची पातळी वाढत असून पलिंया कल्याण येथील शारदा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पूरग्रस्त २१ जिल्ह्यांसाठी २१ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.