शनिवार, 2 अगस्त 2008

रेंगे समर्थक-शिवसैनिकांत परभणीमध्ये हाणामारी

परभणी - शिवसेनेतून काढून टाकलेले खासदार एड. तुकाराम रेंगे पाटील आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे यांच्या समर्थकांत शनिवारी (ता. दोन) सकाळी जोरदार हाणामारी झाली. श्री. रेंगे हे सकाळी साडेनऊच्या सुमारास देशमुख गल्लीतील मारुती मंदिरात अभिषेकासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आलेले श्री. लंगोटे यांनी श्री. रेंगे यांच्याकडे "आता खासदारकीचा राजीनामा द्या', अशी मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.
श्री. रेंगे यांचे चिरंजीव बाळासाहेब यांनी श्री. लंगोटे यांचे चिरंजीव आणि वडिलांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. त्यानंतर दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. श्री. रेंगे यांनी आपल्याजवळील रिव्हॉल्वर बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही गटांचे समर्थक विखुरले.

दहीहंड्या रस्त्यांवर नको! मुंबई पोलिस

मुंबईत दहीहंड्या गर्दीत, रस्त्यांवर न उभारता मोकळ्या मैदानांत उभाराव्यात, अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली आहे। रस्त्यांवरील मोठ्या दहीहंड्यांसाठी उसळणाऱ्या गदीर्त घातपात होऊ नये, यासाठी पोलिसांनी हा पर्याय पुढे केला आहे. तर, शहरात एवढी मैदाने तरी आहेत का, असा सवाल करीत दहीहंडी मंडळांसह त्यांच्या समन्वय समितीनेही त्यास विरोध दाखवला आहे.
मुंबईत दहीहंडीसाठी लाखो मुंबईकर, हजारो गोविंदा रस्त्यांवर उतरतात। सध्याची परिस्थिती पाहता त्याच्या सुरक्षेचे पोलिसांच्या मनावर आजच दडपण आले आहे. ठाणे, दादर, वरळी, अंधेरी, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या 'मोठ्या राजकीय' दहीहंड्यांना सुरक्षा व वाहतूककोंडी अशी कारणे दाखवून परवानगी देण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप दहीहंडी उत्सव मंडळे करू लागली आहेत.
' दहीहंडी काळात सुरक्षाव्यवस्थेचे मोठे आव्हान असेल। रस्त्यांवर चोहोबाजूने होणाऱ्या गदीर्वर नजर ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मोठ्या दहीहंड्या मैदानात लागल्यास सुरक्षेच्या दृष्टीने ते अधिक सोयीचे ठरेल. या संदर्भात दहीहंडी समन्वय समितीची येत्या आठवड्यात बैठक होईल. दहीहंडीला आमचा विरोध नाही. पण उत्सवातील उत्साहाचा कोणी गैरफायदा घेऊ नये; हे पाहणे आमचे काम आहे', असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांनी सांगितले.
त्याचवेळी, सुरक्षेचा मुद्दा पुढे करून पोलिस विनाकारण दहीहंडीत अडथळे निर्माण करीत असल्याचे दहीहंडी उत्सव मंडळांचे म्हणणे आहे। 'दहीहंडी उभारण्याएवढी मैदाने मुंबई, ठाण्यात आहेत का' असा सवाल करीत, रस्त्यावरील एकाही दहीहंडीला पोलिसांनी विरोध केल्यास आम्ही त्याचा विरोध करू, असे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन अहिर आणि कार्याध्यक्ष जितेंद आव्हाड यांनी सांगितले.
रस्त्यावरील दहीहंडीस बंदी आणण्यापेक्षा गदीर्च्या ठिकाणी लोकांनी, गोविंदा मंडळांनी काय खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन पोलिसांनी करावे. सुरक्षेची काळजी पोलिसांइतकीच आम्हालाही आहे; असे श्ाीदत्त माझगाव, जय जवान जागेश्वरी, सार्वजनिक उत्सव मंडळ ताडवाडी, जय भारत परेल या गोविंदा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

'आय वॉन्ट टू किल बाळासाहेब!'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेतच , पण त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक स्क्रॅप ऑर्कुट या सोशल कम्युनिटी बेबसाइटवर आल्यानं शिवसैनिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे।
ऑर्कुटवर ' अँटी शिवसेना ' नावाची कम्युनिटी असून त्यावर हा संदेश येऊन पडलाय. जोहराज उर्फ सूरज या व्यक्तीनं हा स्क्रॅप पाठवलाय. ५ ऑगस्टला बाळासाहेबांना ठार मारण्याची धमकी त्यानं दिलेय. भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता विकास रेपाळे याने हा स्क्रॅप पहिल्यांदा पाहिला आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच , ठाण्याच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल केली आहे .
शिवसेनेचा तिरस्कार करणा-या या कम्युनिटीचे एकूण ३६ सदस्य आहेत। या कम्युनिटीमध्ये ‘kill bal thakeray’ आणि i will kill BAL THAKREY ON 5TH AUG 2008 नावाची टॉपिक आहेत. त्यातील मजकूर अत्यंत धक्कादायक आहे. ‘kill bal thakeray’ या टॉपिकमध्ये किरण वाहिद या मुलीनं ‘I want to kill him and I also want to kill his entire group shiv sena sucks’ असा स्क्रॅप पाठवला आहे. त्याखाली Arry नावाच्या व्यक्तीचाही असाच एक संदेश येऊन पडलेला आहे. तो म्हणतो ,
‘Yeah ur rt Kiran i agree wid u ...i also want to kill his entire group coz Shiv sena hit out at the growing number of North Indian students coming to Pune for higher education। these ridiclous think they can just erase history of north indians nd make a new one, well its not gonna happen.i wish puttin all this bullshyt nd makin up their own shyt is just ridiclous’
किरण वहिद या तरुणीच्या प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीनुसार ती अविवाहित असून दिल्लीची राहणारी आहे. तिचं मूळ गाव अहमदाबादची असल्याचं या ठिकाणी लिहिलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यापूर्वीही अनेकदा दहशतवादी संघनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या ‘ मातोश्री ’ निवासस्थान कडेकोट पोलिस बंदोबस्त असतो. आता ऑर्कुटवरची ही कम्युनिटी आणि त्यावरचे स्क्रॅप प्रकाशझोतात आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

दहशतवाद चिरडून काढण्याची गरज- पंतप्रधान

कोलंबो, 2 ऑगस्ट- दहशतवादाचा सामना करायचा असेल तर दहशतवाद आणि आशियाई देशांमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर दहशतवादा विरोधातील लढाई आणखी आक्रमक करण्याची गरज पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली। दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनांच्या संमेलनात ते बोलत होते.
दहशतवादा विरोधातील मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगतानाच यासाठी आता आक्रमकता आणि दृढ निश्चय करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले। बेंगलूरू, अहमदाबाद आणि काबुल मधील भारतीय दूतावासावर झालेले हल्ले हे अमानवीय कृत्य असल्याचेही मनमोहन यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाला चिरडून काढण्यासाठी सर्व आशियाई देशांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तुकाराम रेंगे पाटलांना मारहाण

मुंबई, २ ऑगस्ट- शिवसेना प्रमुखांचा पक्षादेश झुगारून विश्वासमता दिवशी अनुपस्थित राहिलेले शिवसेनेचे बंडखोर खासदार तुकाराम रेंगे पाटील यांना आज शिवसैनिकांनी मारहाण केली.
सरकारने विश्वासमत प्रस्ताव दाखल केल्यापासूनच रेंगे पाटील गायब होते. २९ तारखेला ते परभणीत पोहचल्यानंतर त्यांनी या भागात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
या पूर्वीच शिवसैनिकांचा राग पाहता त्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती. आज एका समारंभात सहभागी होण्यासाठी पार्टी उपस्थित राहणार असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागल्यानंतर त्यांनी या समारंभातच पाटील यांना घेराव घालून त्यांना मारहाण केली.
यानंतर पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.