नवी दिल्ली - पुढील आठवड्यात विश्वासदर्शक ठरावावरील कामकाजानंतर लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
विश्वासदर्शक ठरावापूर्वी श्री. चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर पक्षातून दबाव टाकला जात आहे, परंतु श्री. चटर्जी यांना आता हे पद सोडायची इच्छा नाही. त्यामुळे पक्षातील इतर वरिष्ठ नेते आणि श्री. चटर्जी यांच्यातील वाद सध्या विकोपाला गेले आहेत.

पुढील आठवड्यात सभापतीपद, लोकसभा सदस्यत्व आणि पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जवळच्या काही मित्रांकडे बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मत देण्यालाही त्यांचा विरोध आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांना पाठविले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें