मुंबई, २५ जुलै- - राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना परदेशात स्कॉलरशिप देण्याची राज्य सरकारची योजना असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सुभाष चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना हंडोरे यांनी सांगितले की, आतापर्यंत ७२ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी परदेशात पाठविण्यात आले आहे, पण नजीकच्या काळात यामध्ये निश्चितच वाढ होईल। त्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारने १९ कोटीची तरतूद केली आहे व गेल्या चार वर्षांत दहा कोटी खर्च करण्यात आले आहेत.
सन २००३ ते २००६ या काळात सरकारने दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठविले आहे, त्यांनतरच्या दोन वर्षांत २५ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे. पण या योजनेचा लाभ अधिक विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी मागणी वाढत आहे.असेही हंडोरे यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें