रविवार, 10 अगस्त 2008

स्वातंत्र्यदिनीच निषेधाचे झेंडे

मुंबई, १० अगस्ट-स्वातंत्र्यदिनीच दलित पँथर संघटना काळा दिवस पाळणार असल्याचे संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष पवनकुमार बोरुडे यांनी जाहीर केले आहे. तर एका एसटी सेवेसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दलितांना जगणे मुश्कील असून दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध म्हणून स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार घालणार असल्याचे बोरुडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। गेल्या महिन्यात नाशिक येथे झालेल्या संघटनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात हा निर्णय झाल्याचे समजते. दलितांना अधिकार आणि सुरक्षितता देण्यात देशाचे स्वातंत्र्य कुचकामी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार दलित पँथर १५ ऑगस्टला काळी निशाणे फडकावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बोरिवली-शीवमागेर् वेल्हे अशी एसटी बस सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तोरणा विकास सेवा समितीने दिला आहे. तसे पत्र एसटी महामंडळास पाठवण्यात आले असून महामंडळ यावर काय निर्णय देणार याकडे आता लक्ष लागले आहे. समितीच्या वतीने महामंडळाकडे लेखी अर्ज सादर करूनही बोरिवली-वेल्हे व्हाया शीव बस सुरू झाली नसल्याने समितीने येत्या १५ ऑगस्टला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

वारणा धरणातून पाणी सोडले ; २६ गावांना अतिदक्षतेचा इशारा

सांगली, १० अगस्ट - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रात्री व रविवारी दिवसभर दमदार पाऊस पडला. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात अ तिवृष्टी झाली आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातून ३ हजार क्‍युसेक प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आले आहे. शिराळा तालुक्‍यातील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीकाठावरील २६ गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी ११ फुट ३ इंच आहे। पूर्व भागातील सात तालुक्‍यात मात्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्‍यातील भात, सोयाबीन आणि भूईमुगाच्या पिकाला पाऊस उपयुक्त आहे. मिरज आणि तासगावच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनाही मदत होणार आहे. जनावरांसाठी लागणारा चारा लगेच उपलब्ध झाला नाही, तरी या पावसाने किमान माळरानात पालवी फुटून त्या ठिकाणी जनावरे चरायला सोडता येतील. दोन महिन्यानंतर चारा मिळेल. विहिरी व कुपनलिकांची खालावणारी पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होईल. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात जनजीवनावर परिणाम झाला आहे.
रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे। हवेत गारठा आणि ढगाळ वातावरण कायम आहे. गेल्या २४ तासात झालेला पाऊस तालुकानिहाय ( मिमि)असा ः शिराळा- ७८, वाळवा-६४, सांगली-३२, मिरज-३०, तासगाव- १७, पलूस-१६, कवठेमहां काळ-१३, जत-७ व आटपाडी-४ असा पाऊस झाला.
धरणे, पाऊस (मिमि), पाणीसाठा व कंसात क्षमता( टीएमसी)।
कोयना , २४३, ७७।१८ (१०५)
वारणा- १४२, ३०।६५( ३४.४)
धोम- ४८, ५।८८ ( १३.५)
कन्हेर- ७५, ५.१९( १०.१०)

पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक पावसामुळे ठप्प

पुणे, १० अगस्ट- कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस होत असल्यानं मुंबई आणि कोकणात जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालाय. लोणावळा-कर्जत दरम्यान ठाकूरवाडीला दरड कोसळल्यानं लोणावळ्याच्या पुढची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आलीय.
या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून जाणाऱ्या प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन क्वीन आज मुंबईला गेल्या नाहीत. तसेच इंद्रायणी एक्‍सप्रेस, इंटरसिटी आणि डेक्कन या गाड्या पुण्याला आलेल्या नाहीत.
मुंबईहून सुटणाऱ्या पुणेमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याणहून मनमाड, दौंड या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी अजेंडा हवा!

मुंबई, १० अगस्ट-एड्ससारख्या अनैतिक वर्तनाशी जोडल्या गेलेल्या आजाराच्या विरोधात जागृतीसाठी जर ठोस कार्यक्रम उभा राहात असेल आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यात त्याला यश येत असेल; तर समाजात झिरपलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात 'सभान' करणारा कार्यक्रम का आखला जाऊ नये? तात्पर्याच्या दिशेने जाणारा हा प्रश्न् शुभदा मैत्रा यांनी सादर केलेले संशोधन आणि त्याअनुषंगाने झालेल्या चचेर्अंती निर्माण झाला.
' फोरम अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लोरेशन' (फॅक्से) या संस्थेने शुभदा मैत्रा यांना त्यांची 'बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मानसिक आरोग्य' या विषयावरील विकसित केलेली संशोधनपद्धती सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते। मैत्रा यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेतील 'केअर फॉर हेल्थ अॅण्ड मेण्टल हेल्थ' या शाखेच्या वतीने बाल लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या २० ते ४० वयोगटातल्या काही महिलांच्या मुलाखती आणि पाहणीतून हाती लागलेली सत्ये आणि निष्कर्ष समोर ठेवले. त्या म्हणाल्या की, सर्वाधिक बाल लैंगिक शोषणाचे प्रकार हे कुटुंब आणि कुटुंबाबाहेरील परिचयाच्या व्यक्तींकडूनच होतात. त्याला बळी पडणाऱ्या मुलांना ही काहीतरी वाईट, चुकीची गोष्ट आहे हे आतून कळत असतं पण ती त्याचा उच्चार करू धजत नाहीत. कारण आपण याविषयी बोललो तर इतरांच्या रोषाला बळी पडू, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा, चांगल्या गोष्टी यांना पारखे होऊ, अशी त्यांना भीती वाटते.
शिक्षक मुलांना मारतात तेव्हा त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा, असं पालक सांगतात का? मग आपल्यावरच्या अत्याचाराबद्दल मुलांनी बोलावं, अशी अपेक्षा पालक कशी बाळगू शकतात, असा प्रश्ान् करून मैत्रा म्हणाल्या की, अशा प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यायला हवा।
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींना अनेक मानसिक आजार जडतात. सतत दु:खी-उदास राहणं, एकटं वाटणं, वजन कमी होणं, अनियमित निदा, दु:स्वप्न पडणं, एकाग्रता भंग पावणं, शिक्षणावरून लक्ष उडणं, भयगंड निर्माण होणं, स्मृतिभ्रंश, मानसिक दुभंग, व्यसनाधीनता, आत्महत्येचे प्रयत्न अशी अनेक लक्षणं त्यांच्या ठायी दिसू लागतात आणि मुख्य म्हणजे त्या आत्मप्रतिष्ठा गमावून बसतात, असे मैत्रा यांनी सांगितलं. आई-मुलीच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होणं, समवयस्क मित्र-मैत्रिणींशी संवाद तुटणं आणि पुरुषांवरचा विश्वास उडणं अशाही समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते.

कोकणावर आभाळ कोसळले

मुंबई, १० अगस्ट- राज्‍यात गेल्‍या ४-५ दिवसांनंतरही पावसाचा जोर कायम असून कोकणात गेल्‍या ८ दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसामुळे कोकणवासीयांचे जनजीवन पूर्णतः विस्‍कळीत झाले आहे। राज्‍यात आजवरचा सर्वाधिक पावसाची नोंद या चार दिवसांत झाली असून कोकण रेल्‍वेसेवा व मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक पूर्णतः खंडीत झाली आहे.
राज्‍यात अनेक दिवसांची ओढ दिल्‍यानंतर पावसाने पुन्‍हा एकदा जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे विदर्भात नागपूरमध्‍ये मुसळधार पाउस झाला। महाबळेश्‍वरमध्‍ये आजवरचा सर्वाधिक विक्रमी ४४० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोल्‍हापूर, सिंधुदुर्ग, चिपळूण, सावंतवाडी आदी भाग प्रभावित झाले आहेत.
कोकणात खेड, दापोळी, चिपळूण, कराड येथील वाहतूक पूर्णतः विस्‍कळीत झाली असून सिंधुदुर्ग जिल्‍हयातील भंगसाळ, वरवणेसह अनेक लहान-मोठया नदयांना पूर आला आहे। तर कर्जतमध्‍येही दूरघ्‍वनी व वीजपुरवठा खंडीत झाला आहे. रत्‍नागिरी व लांजा जवळील इंदवटी धरण फुटल्‍याने आणि अतिवृष्‍टीमुळे मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दुरवस्‍था झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्‍याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आला आहे. तर कोकण रेल्‍वेवरील वाहतुकही बंद झाली आहे. तर अतिवृष्‍टीमुळे लांजा-निवसर रेल्‍वे स्‍टेशनवर जमीन ढासळल्‍याने रेल्‍वेमार्ग कोलमडला आहे.
कोल्‍हापूरमध्‍येही गेल्‍या ८ दिवसांपासून सतत पाउस होत असल्‍याने सुमारे ७० गावांचा संपर्क तुटला आहे। महाबळेश्‍वरमध्‍ये जोरदार पर्जन्‍यवृष्‍टीमुळे पर्यटन व्‍यवस्‍थेवरही परिणाम झाला आहे.
मुंबई-पुणे रेल्‍वे मार्गावरील मंकी हीलजवळ दरड कोसळल्‍याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. लोणावळयाजवळील सिंहगड इन्‍स्‍टीटयुटवर अतिवृष्‍टीने दरड कोसळली आहे. सुदैवाने येथे कोणतीही प्राणहानी झाली नाही.

अंदमान बेटावर वादळ आणि भूकंप

पोर्टब्लेअर, १० ऑगस्ट- अंदमान बेटांना आज वादळ आणि भूकंपाचे जबरदस्त धक्के बसल्याने या भागात भीतीचे वातावरण असून, या भागात अनेक प्रवासी अडकले आहेत।
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पासून अंदमान भागात तासी ५० ते ६५ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू लागल्याने या भागातील साऱ्या वाहतूक सेवा कोलमडल्या आहेत.
आज अंदमानला ६.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. यात कोणते नुकसान झाले याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नसली तरी, त्सुनामीची शक्यता मात्र वेधशाळेने फेटाळली आहे.
दुपारी एक वाजता किमान सात ते आठ मिनिटे हा भूकंपाचा धक्का जाणवला. अंदमानच्या उत्तरी भागात हा धक्का जाणवला नसल्याची माहिती अंदमान आपत्तीनिवारण व्यवस्था प्रमुख एस एन झा यांनी दिली.
अंदमानात सध्या खराब वातावरण असून सततचे वादळ आणि सुरू असलेल्या पावसाने या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचेही झा यांनी स्पष्ट केले.

सीमा भागातील मोबाइल सेवा खंडित करणार

नवी दिल्ली, १० अगस्त- सीमाभागातील सुरक्षेचा विचार करून केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना सीमाभागावरील सेवा खंडित होणारी साधने बसवण्याचे आदेश दिले आहेत. सीमाभागावर वा सीमा भाग ओलांडेपर्यंत कोणत्याही मोबाइल कंपन्यांची सेवा उपलब्ध असू नये, असे आदेश सरकारतर्फे मोबाइल कंपन्यांना देण्यात आले आहेत.
मोबाइलचा वाढता वापर आणि त्याचा अतिरेकी करत असलेला वापर लक्षात घेऊन सुरक्षेचा उपाय म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमाभागापासून ५०० मीटर अंतरावर मोबाइलला यापूवीर्च बंदी घालण्यात आली होती. मात्र मोबाइल कंपन्या या नियमाची अमलबजावणी होते वा नाही याची तपासणी करण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळेच कंपन्यांना सेवा खंडित करणारे मशिन बसवणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.