नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी टाकलेला दबाव लाथाडल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांपैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) सोमनाथ चटर्जी यांच्याविरूद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। माकपच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोमनाथ चटर्जी यांनी माकपकडून कोणतीही नोटीस मिळाल्याचा मंगळवारी इन्कार केला होता. तसेच माकप नोटीस पाठवू शकत नाही कारण आपण पॉलीट ब्युरोचे सदस्य नाही. त्यामुळे राजीनामा द्यायचा कि नाही ते ठरविण्याचा अधिकार केवळ आपल्यालाच असल्याचे म्हटले होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें