शनिवार, 4 अक्टूबर 2008

पाकिस्‍तान नवे युद्ध क्षेत्र

इस्लामाबाद, ४ ऑक्टोबर- आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस कमीटीने पाकिस्तान हे नवे युद्ध क्षेत्र असल्‍याचे घोषित केले आहे.
रेडक्रॉसचे प्रवक्ते मार्कोसोई यांनी एका अमेरिकन वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत पाकिस्तान हे जगाचे नवे युध्‍द क्षेत्र असल्‍याचे म्‍हटले आहे. पाकमध्‍ये नुकत्‍याच झालेल्‍या स्फोटांनंतर आणि पाकच्‍या उत्तर भागात पसरलेल्‍या अशांततेनंतर पाकिस्‍तान युध्‍दक्षेत्र म्‍हणून घोषित केले गेले आहे.
या भागात आतापर्यंत 20 हजारापेक्षाही जास्‍त लोक बेघर झाले आहेत. तर पाक सैन्‍य आणि तालिबानींमध्‍ये झालेल्‍या संघर्षात हजारो जणांना प्राण गमवावे लागले आहे.

गुरुवार, 2 अक्टूबर 2008

अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये करार मंजूर झाला

वाशिंगटन, २ ऑक्टोबर - उलट-सुलट प्रश्न उपस्थित झाले, चर्चा रंगली, जरासे खटकेही उडाले, बराच खल झाला... पण अखेर, भारत-अमेरिका नागरी अणुकसहकार्य कराराला अमेरिकी सिनेटमध्ये मान्यता मिळाली. अणुकराराच्या बाजूने ८६ मतं मिळाली, तर १३ जणांनी कराराला आपला विरोध दर्शवला. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये करार मंजूर झाला असल्यानं आता राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, आपल्या कारकिर्दीतल्या शेवटच्या महिन्यात या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करतील.
अमेरिकेच्या ' हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने ' तीन दिवसांपूर्वी या कराराला मान्यता दिली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी संध्याकाळी हा करार सिनेटमध्ये सादर झाला. त्यानंतर त्यावर जोरदार चर्चा रंगली. त्यात प्रमुख विषय होता, तो भारतानं अणुकरार केल्यास काय होईल, अमेरिका कोणती पावले उचलणार, याबद्दल अनेक सदस्यांनी विचारणा केली. जेफ बिंगमॅन आणि डॉर्गन यांनी दुरुस्त्या सुचवल्या.
त्यावर, भारतानं अणुचाचणी केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असं अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी स्पष्ट केलं. त्यांना मिळणारं अणुइंधन, तंत्रज्ञान आणि रिअॅक्टरची परवानगी काढून घेण्याची कारवाई होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावरही बरेच उलटसुलट प्रवाद समोर आले, पण मतदानावेळी अपेक्षेप्रमाणे अणुकरार संमत झाला. त्यामुळे भारत-अमेरिकेदरम्यानच्या अणुव्यापारावरील तीन दशकांपासूनचे निर्बंध संपुष्टात आले आहेत.
अणुकराराला अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानं आता शनिवारी कोंडोलिझा राईस भारतभेटीवर येऊन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर, जॉर्ज बुश या करारावर स्वाक्षरी करतील आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल.

बुधवार, 1 अक्टूबर 2008

अगरतळ्यात ५ स्‍फोट, २ ठार, ३० जखमी

अगरतळा, १ अक्टोबर-त्रीपुराची राजधानी अगरतळा शहरातील पाच गजबजलेल्‍या भागात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्‍या सुमारास झालेल्‍या ५ स्‍फोटात २ जण ठार सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. कमी तीव्रतेच्‍या या स्‍फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगरतळा शहरातील गुडबाजार, राधानगर बसस्‍थानक, एम.जी.बाजार व जी.बी.हॉस्पिटल परिसरात स्‍फोट झाला. दिल्‍लीत झालेल्‍या स्‍फोटांशी या स्‍फोटांचे साम्‍य असून गर्दीच्‍या ठिकाणी हे स्‍फोट घडवून आणण्‍यात आला आहे. बसस्‍थानक परिसरात 2, उद्यान, बाजार व रुग्‍णालयाच्‍या परिसरात १ स्‍फोट झाला आहे.

राज ठाकरेंना अटक करण्‍याचे आदेश

जमशेदपूर, १ ऑक्टोबर- उत्‍तर भारतीय आणि बिहारीच्‍या छठ पर्व उत्‍सवाबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केलयाबद्दल झारखंडच्‍या एका न्‍यायालयाने राज ठाकरे यांना अटक करून न्‍यायालयात हजर करण्‍याचे आदेश बजावले आहेत.
मुंबईच्‍या पोलीस आयुक्‍तांच्‍या नावे बजावलेल्‍या या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.
न्याय दंडाधिकारी ए. के. तिवारी यांनी राज यांना अटक करून १७ नोव्‍हेंबरपर्यंत अटक करण्‍याचे आदेश दिले आहेत. न्‍यायालयाने त्‍यासाठी राज यांच्‍या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावले आहे. येथील एक वकील हमीद रजा यांनी राज यांच्‍या विरोधात उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांच्‍या छठ पूजेविरुध्‍द वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याचा आणि हिंसा पसरविल्‍याचा आरोप करून खटला दाखल केला आहे.

मंगलवार, 30 सितंबर 2008

शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेवच

पुणे, ३० सप्टेम्बर- छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी कोंडदेव होते, हे सांगणारे इतिहासात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर यांनी सोमवारी केला। शहाजी राजांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी आधीच्या पुरस्कारातून दादोजी कोंडदेव यांचे नाव काढून टाकणे गैर आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का नव्हते, हे निष्कर्ष पुरस्कारासाठी लावणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काही मोजक्या व्यक्ती आणि संघटनांच्या दडपणाखाली सरकारने समिती नेमली असून त्यांच्या अभ्यासावर आधारित चुकीचे निर्णय सरकार घेत असल्याची टीका बलकवडे यांनी केली. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिकवल्याचे उल्लेख असून त्याकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीत परस्परच नेमणूक केली असून आपल्याला याबद्दलची माहिती वृत्तपत्रातूनच कळाली असल्याचे मेहेंदळे आणि बेडेकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे कोणतेही लेखी पत्र किंवा साधा फोनही अधिकृतरित्या केला नसल्याचे ते म्हणाले. या समितीत १५ अभ्यासक असून यातल्या १० जणांना इतिहासातले काहीही कळत नसल्याचे बेडेकर यांनी नमूद केले. ज्यांना फारसी, मोडी आणि पशिर्यन येत नाही ते कसले अभ्यासक असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकार संशोधनात जातीयवाद आणत असून दादोजी कोंडदेव ब्राह्माण होते म्हणूनच त्यांचे नाव बाजूला करण्याचा घाट काही संघटना आणि व्यक्तींनी घातला असल्याचे मेहेंदळे म्हणाले. या सर्व घटनांचा संशोधनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


चामुंडादेवी चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे आदेश

जोधपूर, ३० सप्टेंबर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चामुंडादेवी चेंगराचेंगरी कांडानंतर चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
जखमींनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत देण्यात येईल. राजे यांनी मेहरनगढ भागातील घटनास्थळी भेट दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्यास चौकशी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मालेगांव बळींना सरकारची मदत जाहीर

मुंबई, ३० सप्टेंबर- महाराष्ट्र सरकारने मालेगाव बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना पन्नास हजार तर तुरळक जखमींना पंचवीस हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख युरोपच्या दौऱ्यावर असून स्फोटात जखमी झालेल्या पोलिसांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मालेगावात काल रात्री वर्दळीच्या भिक्कू चौक भागात झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला तर सत्तर जण जखमी झाले आहेत.

सोमवार, 29 सितंबर 2008

राष्ट्रपतींच्‍या दौ-यात स्फोट, चार जवान शहीद

छत्तीसगड, २९ सप्टेम्बर-राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्‍या दौ-यादरम्यान छत्तीसगडच्‍या बस्तर जिल्‍ह्यातील पर्यटन स्थळ चित्रकोट येथे नक्सलवाद्यांकडून केल्‍या गेलेल्‍या भुसूरंगाच्‍या स्‍फोटात केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान शहीद झाले.
स्फोटामुळे जीपमध्‍ये असलेले दोन जवान घटनास्‍थळीच शहीद झाले तर आणखी दोघांचा उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला.

रविवार, 28 सितंबर 2008

बांगलादेशी घुसखोरांना अटकाव घाला: अडवाणी

गुवाहाटी, २८ सप्टेंबर-राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करण्यासाठी पाकच्या आयएसआयवर हल्ला चढवताना भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणार्‍या घुसखोरांना अटकाव घालण्याची गरज व्यक्त केली.
ईशान्येत आयएसआयच्या पुढाकाराने घुसखोरी होते. ईशान्येतील लोकांना त्रस्त करणार्‍या घुसखोरीबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सतर्क होते. दिल्लीत शनिवारी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातील स्फोटके हे बांगलादेशातून आणण्यात आले होते.
देशात याअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटातील स्फोटके आणि दिल्ली स्फोटातील स्फोटकांमध्ये फरक होता। हे बॉम्ब बांगलादेशातून पाठवण्यात आले होते.
घुसखोरी ही फक्त आसामच्या अस्तित्वास धोका नसून देशाच्या सुरक्षेसही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आसाममधील मुस्लिमांना त्यांनी सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले.

बुधवार, 24 सितंबर 2008

मुंबईत 5 दहशतवाद्यांना अटक

मुंबई, २४ सप्टेंबर- मुंबई पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागाने केलेल्‍या एका कारवाईत इंडियन मुजाहिदीनच्‍या ५ सदस्‍यांना अटक करण्‍यात आली. अटक करण्‍यात आलेले उत्‍तर प्रदेशातील दहशतवादी आजमगढ येथील रहिवासी असल्‍याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्‍त हसन गफूर यांनी दिली. मुंबईत घातपात घडवून आणण्‍याचे त्‍यांचे नियोजन होते.
मुंबईतील भिवंडी, गोवंडी आणि मुंब्रा परिसरातून फजलूर रहमान गॅंगसाठी काम करणा-या पाच दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने आज छापे टाकून अटक केली. मोहमद सादीक, अफजल उस्‍मानी, अबू आरीफ, आतीफ बदर आणि मो.जाकीर शेख अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून मोठ्या प्रमाणावर स्‍फोटके, मशीन गन डिटोनेटर आदी जप्‍त करण्‍यात आले आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्‍तानात प्रशिक्षण दिले गेले असल्‍याची माहिती समोर आली आहे. अटक करण्‍यात आलेल्‍यांपैकी ४ जणांना मुंबईतून तर अफजलला आजमगढ येथून अटक करण्‍यात आली आहे.
या दहशतवाद्यांचे संबंधही आजमगढशीच असल्‍याची माहिती समोर आली असून इंडियन मुजाहिदीनसाठी ते काम करीत होते. २००५ पासून दहशतवादी कारवायांमध्‍ये या सर्वांचा सहभाग आहे. अहमदाबाद व सूरत शहरात बॉम्‍ब ठेवण्‍यात आणि धमकीचा ई-मेल पाठविण्‍यात त्‍यांचा सहभाग आहे. अटक करण्‍यात आलेल्‍यांपैकी सादीक हा इंडियन मुजाहिदीनचा फाऊंडर मेंबर आहे. तर दोघे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुंबई पोलीस व दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्‍या संयुक्‍त कारवाईचा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अभिनंदन केले असून कारवाईत सहभागी पथकाला ५ लाखांचे पारितो‍षिक जाहीर केले आहे.
दरम्‍यान, कर्नाटकचा रोशन खान हा फरार असून त्‍याचा शोध सुरू आहे. तर या सर्व दहशवाद्यांवर नियंत्रण ठेवणारा आमीर रजा नावाचा दहशवादी पाकिस्‍तानात लपून असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी कारवायांसाठी हवालाच्‍या माध्‍यमातून पैसे मिळत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सोमवार, 22 सितंबर 2008

मास्टरमाइंड तौकिर मुंबईत?

मुंबई, २२ सप्टेम्बर-राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, बंगळुरूत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकिर मुंबई परिसरातच असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाल्यानं मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. गुजरात आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीनं त्यांनी जोरदार शोधमोहीम हाती घेतलेय.
गेल्या शनिवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर, पोलिसांनी तौकिरच्या शोधासाठी जंग जंग पछाडलंय. तोच या स्फोटांचा मास्टरमाइंड असल्याचं समजतं. त्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत पोलिसांना हवाय. परंतु, त्याचा काहीच ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही. दिल्ली स्फोट प्रकरणी, एन्काउंटर झाल्यानंतर, ब-याच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण त्यांच्याकडूनही तौकिरबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
असं असतानाच, तौकिर मुंबईजवळ असल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली असून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तौकिरसोबत आणखी दोघं असू शकतात. सागरी मार्गानं ते पळून जाण्याची शक्यता असल्यानं समुद्रकिना-यांवर नाकाबंदी करण्यात आलेय. मुंबई, दिल्ली आणि गुजरात पोलिस तौकिरला अटक करू शकले, तर सगळ्याच बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा होणार आहे. ते खूप मोठं यश असेल.

रविवार, 21 सितंबर 2008

भावना भडकावू नका; नोकऱ्या द्या

पुणे, २१ सप्टेम्बर-मराठीच्या नावावर तरुणांना भडकावण्यापेक्षा तुम्हीच त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्या, असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे किंवा मनसेचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मॅक्स टेलिकॉम यांच्या सहकार्याने पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तांत्रिक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर अपर्णा डोके आदी उपस्थित होते.
सध्या वाढत्या स्पधेर्त प्रत्येक तरुणाला नोकरी मिळणे अवघड झाले आहे. यासाठी तरुणांनी तांत्रिक शिक्षणाकडेही वळायला हवे असे पवार यावेळी म्हणाले. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश संपादन करायचे त्यासाठी ध्येय समोर ठेवून कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

शनिवार, 20 सितंबर 2008

कसारा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

नाशिक, २० सप्टेम्बर- नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होताच, त्यातच काल मध्यरात्री कसारा घाटात लतिफवाडी येथे दरड कोसळल्यानं तिथे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरही वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली आहे.
गेल्या चार तासांपासून संपूर्ण कसारा घाटात ट्रॅफिक जॅम झाले असून वाहतूक कासवगतीने सुरू आहे. परंतु, रस्त्यावरचा मातीचा ढीगारा बाजूला करण्याचं काम सुरू असून आणखी तासाभरात वाहतूक सुरळीत होईल, असे समजते.

शहीद निरीक्षक शर्मांवर अंत्‍यसंस्कार

नवी दिल्ली, २० सप्टेंबर- नवी दिल्‍लीतील जामिया नगर येथे झालेल्‍या एन्‍काउंटरमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या स्‍पेशल सेलचे निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्‍यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.
मोहनचंद शर्मा शुक्रवारी जामिया नगर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. या हल्‍ल्‍यात एका दहशतवाद्याला पकडण्‍यात आले असून दोघांना ठार करण्‍यात आले आहे. दिल्लीच्‍या एम्स रुग्‍णालयात शवचिकित्‍सेनंतर त्‍यांचे पार्थिव घरी नेण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर निगमबोध येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आला.

शहीद निरीक्षक शर्मांवर अंत्‍यसंस्कार

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर- नवी दिल्‍लीतील जामिया नगर येथे झालेल्‍या एन्‍काउंटरमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या स्‍पेशल सेलचे निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्‍यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.
मोहनचंद शर्मा शुक्रवारी जामिया नगर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. या हल्‍ल्‍यात एका दहशतवाद्याला पकडण्‍यात आले असून दोघांना ठार करण्‍यात आले आहे. दिल्लीच्‍या एम्स रुग्‍णालयात शवचिकित्‍सेनंतर त्‍यांचे पार्थिव घरी नेण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर निगमबोध येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आला.

गुरुवार, 18 सितंबर 2008

'मिहान'मध्ये मराठी माणसाला स्थान पाहिजेचः राज

मुंबई, १८ सप्टेम्बर-विदर्भाला नवी ओळख मिळवून देऊ शकणा-या ' मिहान ' सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मराठी माणसाला योग्य स्थान मिळायलाच पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन पुकारेल, असा इशारा अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
आज नागपुरातून राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झाला. त्यात राज यांनी सुरुवातीला, जागतिक दर्जाच्या मिहान प्रकल्पाची माहिती घेतली. नागपूरसह विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची सुवर्णसंधी म्हणून मिहानकडे बघण्यात येत आहे. त्यातून नागपूरच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे, कारण या प्रकल्पांतर्गत माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग, सेवा उद्योग, आयात-निर्यात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जातेय. तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे होणारी उलाढाल अवाढव्य असेल. त्यामुळे सुमारे चार लाख रोजगार उलपब्ध होणार आहेत.
मिहान प्रकल्पातल्या रोजगारांमध्ये मराठी माणसाला प्राधान्यानं स्थान मिळालं पाहिजे, असे राज यांनी ठणकावून सांगितले। तिथेही जर आम्हाला डावललं गेलं तर मनसे हा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानं, हा दौराही गाजणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हा दौरा २३ तारखेपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना २० तारखेला शिक्षा सुनावली जाणार असताना, राज ठाकरे भंडा-यातच आहेत.

बुधवार, 17 सितंबर 2008

जागतिक वित्तीय संकटापासून भारत पूर्णत: सुरक्षित राहू शकत नाही: अनिल अंबानी

मुंबई, १७ सप्टेम्बर- जागतिक अर्थव्यवस्थेशी भारतीय अर्थव्यवस्था जोडली गेलेली असल्यामुळे जागतिक वित्तीय संकटापासून भारत पूर्णत: सुरक्षित राहू शकत नाही, असा इशारा 'रिलायन्स कॅपिटल'चे अध्यक्ष व 'एडीएजी' समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांनी मंगळवारी दिला. 'लेहमन ब्रदर्स'चे निघालेले दिवाळे, आथिर्क संकटातून सुटण्यासाठी 'मेरिल लिंच'ने केलेली स्वत:ची विक्री या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
कंपनीच्या वाषिर्क सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी म्हणाले : भारतातील शेअर बाजार आणि परकीय चलन बाजारांवर जागतिक, अमेरिकेतील घडामोडींचे परिणाम आताच दिसू लागले आहेत। मात्र त्यांची तीव्रता कमी प्रमाणात असेल. याचे कारण आहे आपल्या धोरणर्कत्यांनी, सरकारांनी स्वीकारलेले सावध, टप्प्याटप्प्यांनी आथिर्क सुधारणा अमलात आणण्याचे नेमस्त धोरण!
अमेरिकेच्या कर्जपेठेतील पेचप्रसंगाने वित्तीय बाजारातील बड्या कंपन्यांचा बळी घेतला आहे. वाढती देशांतर्गत भाववाढीची चढती कमान, खूपच दोलायमान बनलेले शेअर बाजार यांमुळे ग्राहकांचा खर्च करण्याची क्षमता घटली असून सर्वच क्षेत्रांत विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. पण सुदैवाने देशांतर्गत मागणी आणि गुंतवणुकीच्या बळावर आपण जागतिक मंदीच्या झंझावातापासून सहीसलामत राहू, असे अंबानी पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)

मराठा आरक्षणाचा सहानुभूतिपूर्वक विचार: देशमुख

मुंबई, १७ सप्टेंबर- राज्यातील मराठा जातीला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच राज्य सरकार याचा सहानुभूतिपूर्वक विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली.
याविषयावर अधिक मंथन करण्याची गरज नसून, लवकरच याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याविषयाची माहिती राज्य सरकार जमवत असून, इतर कोणत्याही जातीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंगलवार, 16 सितंबर 2008

राज ठाकरे यांची वकिलांना आर्त हाक!

मुंबई, १६ सप्टेम्बर-मुंबईत झालेल्या ७/११ बॉम्बस्फोटातील आरोपींचे वकील पत्र घेणा-या वकिलांना आपल्या ठाकरी भाषेत ठणकावणारे राज ठाकरे यांची भाषा आता मृदू झाली आहे. त्यांनी या आरोपींचे खटले लढणा-या वकिलांना भावनिक आवाहन करून अशा केस घेवू नये असे सांगितले आहे. या संदर्भातील पोस्ट आता मुंबईच्या विविध ठिकाणी लावले आहेत.
२००६ मध्ये राज ठाकरे यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपींचे वकील पत्र घेणा-या वकीलांना धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याचे अनेक खटले दाखल करण्यात आले. मात्र, आता दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना कायद्याची जाण झाली आहे. त्यांनी आपली मागणी कायम ठेवली. मात्र, गांधीगिरी करून ते वकिलांना भावनिक आवाहन करीत आहेत.
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटनंतर मनसेतर्फे विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात बॉम्ब स्फोटाच्या आरोपींच्या वकिलांचा विरोध करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये एका चिमुड्याला आपल्या मृत आईसमोर रडताना दाखवलं आहे. त्याच्या शेजारी असलेल्या मजकूरात म्हटले आहे की, वकील साहेब, आम्हांला तुमचा गर्व आहे. तुम्ही बॉम्ब स्फोटातील आरोपींसाठी लढत आहात. पण हे सांगा जे बॉम्ब स्फोटात मारले गेले त्या आमच्या कुटुंबाचा काय दोष होता. त्यांना न्याय कोण देणार ? आमचे कुटुंब आम्हांला परत द्या.
वकिलांनी वकिली करताना काही गोष्टींच भान राखावं असा सल्ला देत या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, बॉम्ब स्फोटात मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर उभे राहून तुम्ही तुमचे स्थान उंचावू नका. मनसेचे सचिव चिंटू शेख यांनी हे पोस्टर लावले आहे.
चिंटू शेख यांची बहिण शाहीन ही सुद्धा पेशाने वकील आहे. पेशा आणि वैयक्तीक मत यात नेहमी फरक करायला हवे. मात्र, असा विषय असेल तर वकीलांनी बॉम्बस्फोटांच्या आरोपींच्या केस घेवू नये. माझ्या भावाच्या मताशी मी सहमत असल्याचे शाहीन हीने सांगितले.

सोमवार, 15 सितंबर 2008

दहशतवाद्यांचे पुढचे टार्गेट मुंबई?

मुंबई, १५ सप्टेम्बर- मुंबई जयपुर , अहमदाबाद, बंगळुरू आणि नवी दिल्लीनंतर दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणा-या इंडियन मुजाहिदीनने आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लक्ष्य करण्यीच धमकी दिली आहे.
चार महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आता पर्यंत सुमारे १३० लोकांनी प्राण गमावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मुंबई पोलिसच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) मुस्लिमांना विनाकारण त्रास दिला आहे. त्यामुळे हे हल्ले करण्यात आल्याचे इंडियन मुजाहिदीन केलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुस्लिमांवर होणा-या या अत्याचारावर इंडियन मुजाहिदीनची करडी नजर असल्याचंही या नमूद केलं आहे.
या दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या इमेलमध्ये लिहिले आहे की, तुम्हांला माहिती पाहिजे की तुम्ही जे काही करतायं ते आम्हांला माहित आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. योग्य वेळीची आम्ही वाट पाहत आहोत. अंसारनगर आणि अंधेरीतील मोगरापाडा भागात मध्यरात्री मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जाणून बूजून मुस्लिमांवर कारवाई करण्यात आली.
चौकशी करताना मुस्लिम महिला आणि मुलांशी ज्या प्रकारे वागणूक दिली जाते. त्याची किंमत मुंबईतील लोकांना आपले प्राण गमावून द्यावी लागणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुंबईच्या एटीएस विभागाला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील आहे, असेही या मेलमध्ये लिहिलेलं आहे. राजस्थानचे उपपोलिस महानिरीक्षक ए. के. जैन यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
ईमेलमध्ये गुरुअलहिंदी आणि अल-अरबी या दोन नावांनी सह्या केल्या आहे.

शुक्रवार, 12 सितंबर 2008

मराठमोळ्या सोनालीने घेतली जयाची बाजू

मुंबई, १२ सप्टेंबर- मराठी बाण्‍यासाठी राज ठाकरे यांनी जगभर रान माजविले असताना आता चक्‍क मराठमोळ्या सोनाली बेंद्रे हिने राज यांचे आंदोलन चुकीचे असल्‍याचे सांगून त्‍यांना घरचा आहेर दिला आहे। सोनालीच्‍या मते तिचे यजमान गोल्‍डी बहल यांच्‍या 'द्रोण' या चित्रपटाच्‍या संगीत रिलीज कार्यक्रमात जया बच्चन यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यात आक्षेपार्ह असे काहीही नव्‍हते. त्‍याचा उगाच माध्‍यमांकडून आणि राजकारण्‍यांकडून बाऊ केला गेला.
सोनालीने जया बच्चन यांची बाजू घेताना सांगितले, की जे लोक जया यांना ओळखतात त्‍यांना चांगले माहीत आहे की जयाजींच्‍या टीप्‍पणी मागे कोणताही उद्देश नव्‍हता. आपण त्‍यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्‍या अशा प्रकारचे वक्‍तव्‍य करणार नाहीत अशी खात्री तिने व्‍यक्‍त केली आहे.

मुंबई आमच्या बापाचीच! दिवाकर रावते

मुंबई, १२ सप्टेम्बर- ' मुंबई ही आमच्याच बापाची असून ती तुमच्यासारख्या घटनेच्या आधारे आक्रमण करणाऱ्या परप्रांतियांची तर मुळीच नाही. त्यामुळे कृपया आपल्या वदीर्ची गुर्मी घेवून लवकरच महाराष्ट्रातून दिल्लीसारख्या मुक्कामी जावे', अशी टीका शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांना केली आहे,
' मुंबई कुणाच्या बापाच्या नाही,' अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या के. एल. प्रसाद यांना रावते यांनी पत्र पाठवले असून त्यात ही सूचना केली आहे. आपण पोलिस खात्यात असूनही गावगुंड वापरतात तसली भाषा वापरून मुंबईकरांचा घोर अपमान केल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
' एखाद्याचा बाप काढणे हे महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. पोलिसांच्या पदाची आणि वदीर्ची माहिती सर्वांनाच आहे. मात्र या पदावर असताना मुंबईकरांचा बाप काढणे, हे एवढे तुम्हाला सोपे वाटते का? यालाच अधिकाराचा अहंकार व वदीर्ची मस्ती म्हणतात', असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

गुरुवार, 11 सितंबर 2008

बच्चन कुटुंबियांविरुद्ध राज'बंदी' मागे

हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह धरणार्‍या खासदार जया बच्चन यांच्याविरोधात रणशिंग फूंकण्‍याचे आदेश दिलेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी आपले बच्चन कुटुंबिय विरोधातील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली असून, अमिताभ यांना देशाच्या कोणत्याही सीमा नाहीत, त्यांनी माफी मागितल्याने आपण आपले आंदोलन मागे घेत असल्याचे राज यांनी आज जाहीर केले.
'हम यू पी वाले है। हम हिंदी में ही बात करेंगे असे जया यांनी द्रोण चित्रपटाच्या म्युझिक रिलीज प्रसंगी म्हटले होते। यानंतर मनसेने यावर आक्षेप घेत राज यांनी बच्चन कुटुंबियांविरोधात आंदोलन करण्‍याचा निर्णय घेतला होता.
राज यांनी पत्रकार परिषद घेत जया यांच्यावर तोफ डागत आधी त्यांनी माफी मागावी आशी मागणी केलीर होती. जया आणि अमिताभ यांनी याविषयी मराठी जनतेची माफी मागितल्यानंतर आज राज यांनी आपण बच्चन कुटुंबियांविरोधात आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मंगलवार, 9 सितंबर 2008

'बोलण्यापूर्वी मी विचार करायला हवा होता'- जया

मुंबई, ९ सितम्बर- 'हम युपीवाले है, हिंदी में ही बोलेंगे, असे म्हणता नव्या वादाला जन्म घालणाऱ्या अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना राज ठाकरे यांनी मराठी झटका दाखविल्यानंतर अखेर उपरती झाली आहे। आपण हे वक्तव्य करण्यापूर्वी विचार करायला हवा होता। पण या वक्तव्यामागे मराठी लोकांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. 'माझ्या बोलण्याने मराठी मानांना वेदना झाल्या असतील तर मी त्यासाठी माफी मागते असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्न केला.
शनिवारी 'द्रोण' या चित्रपटाच्या म्युझिक अल्बमच्या अनावरणप्रसंगी, बोलताना त्यांनी काहीही गरज नसताना मध्येच उठून ' मै यूपी वाली हूं और, हिंदी में ही बात करुंगी. महाराष्ट्र के लोग मुझे माफ करे' असे वक्तव्य केले होते. यानंतर या प्रकरणावरुन राज्यात राजकाणाला सुरुवात झाली होती. मनसेने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांचा विरोध सुरु केला होता। शिवसेनेही त्यावर टीका केली होती. पण राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन बच्चन कुटुंबियांच्या चित्रपटांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात येईल. ते प्रदर्शित करू दिले जाणार नाहीत, असे जाहीर केले, असा इशारा दिला. त्यानंतर मग जया बच्चन यांना आपल्या चुकीची जाणीव झाली.
तोपर्यंत राज समर्थकांनी मुंबईत प्रत्यक्ष कृतीस सुरुवात करून बच्चन कुटुंबियांची पोस्टर्स फाडली. त्यांच्या चित्रपटांची, जाहिरातींची पोस्टर्स, होर्डिंग्ज तोडायला सुरवात केली. मग मात्र जया यांना आपण काय बोललो याचे भान आले आणि त्यांनी सरळ माफीनामा जाहीर करून टाकला. आपण मराठीही चांगले बोलू शकतो. हवे तर याची परीक्षाही घ्या, असे सांगत त्यांनी आपले मराठीप्रेमही व्यक्त केले.

शनिवार, 6 सितंबर 2008

नितेश राणे यांच्यावर हल्ला

कांदिवली, ६ सप्टेम्बर- महसूलमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री समतानगर येथील ठाकूर कॉलेज जवळ काही तरूणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.
ठाकूर कॉलेज येथील एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त नितेश राणे आले होते. त्यावेळी स्थानिक तरूण आणि स्वाभिमानच्या कर्यकर्त्यात बाचाबाची झाली. नितेश राणे हे स्वाभिमान या संघटनेचे प्रमुखही आहेत. बाचाबाचीनंतर नितेश राणे तेथून जाण्यासाठी निघाले होते, त्यावेळी त्यांच्या गाडीवर मागून काही लोकांनी दगड फेकले आणि गाडीच्या काचा फोडल्या.
मात्र, नितेश यांना कोणतीही इजा झाली नसून ते या हल्ल्यातून सुखरूप बचावले असल्याचे समतानगर पोलिसांनी सांगितले.

शुक्रवार, 5 सितंबर 2008

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांचा निकाल आज

नवी दिल्ली, ६ सप्टेम्बर-गेले काही दिवस राजकीय पक्षांचे लक्ष असलेल्या दिल्ली विद्यापीठ विद्याथीर् संघाच्या निवडणुकीचे मतदान शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पार पडले. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १० उमेदवार मैदानात होते. मात्र खरी स्पर्धा एनएसयूआयची सोनिया सप्रा आणि अभाविपची नुपूर शर्मा या दोन विद्याथिर्नींमध्येच असल्याचे स्पष्टपणे जाणवले. निकाल शनिवारी जाहीर होणार आहे.
राजधानीतील ५१ महाविद्यालयांच्या सुमारे ८० हजार विद्याथीर् या निवडणुकीशी संबंधित आहेत.
यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजपच्यादृष्टीने देखील अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशा चार प्रमुख जागांसाठी एकूण ३० उमेदवार मैदानात आहेत.
लागोपाठ ५ वषेर् तिरंगा फडकवणाऱ्या एनएसयूआयला यंदाही विजयश्ाी कायम राखायची आहे, तर अभाविपला पुन्हा भगवा फडकवण्याची आकांक्षा आहे. जेएनयुच्या धतीर्वर प्रेसिडेन्शिअल डिबेटचा प्रयत्नही यंदा विद्यापीठात झाला तथापि प्रमुख उमेदवारांचा त्यात सहभाग नसल्याने अपूर्व गोंधळात अवघ्या १५ मिनिटांत हा प्रयोग आटोपता घ्यावा लागला.

राष्ट्रपती शनिवारी विदर्भाच्या दौर्‍यावर

मुंबई, ५ सप्टेम्बर- राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे उद्या (शनिवारी) विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. शहरात विविध ठिकाणी शिलान्यास कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अमरावती येथून सुरू होणाऱ्या नवीन रेल्वेस हिरवी झेंडी दाखवतील.
विशेष विमानाने त्यांचे नागपूर येथे साडेदहा वाजता आगमन होईल. यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व राज्यपाल एस सी जमीर त्यांचे स्वागत करतील. राष्ट्रपती येथून अचलपूरसाठी रवाना होतील, मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत असतील.

पूरग्रस्त बिहारसाठी मदतीचे आवाहन

मुंबई, ५ सप्टेम्बर- बिहार सध्या इतिहासातील सर्वात भीषण अशा पूराचा सामना करीत आहे. राज्यातील बहुतेक जिल्हे पाण्याखाली गेले असून सुमारे पंधरा लाख लोक बेघर झाले आहेत. या लोकांनी केवळ घरच नाही तर उत्पन्नासह सर्व काही गमावले आहे. पूरग्रस्त बिहारसाठी मोठ्या प्रमाणात मदतकामाची आवश्यकता आहे.
' दैनिक वृत्त सेवा (DNS) मराठी' आपल्या वाचकांना पूरग्रस्त बिहारसाठी मोठ्या मनाने 'मुख्यमंत्री मदत निधी'ला मदत करण्याचे आवाहन करीत आहे। मदत करणाऱ्यांना आयकराच्या ८०जी(२) अंतर्गत करसवलत मिळेल. आपल्या मदतीचे चेक/ड्राफ्ट 'मुख्यमंत्री मदत निधी' या नावाने काढून पुढील पत्त्यावर पाठवावा. तो पाटणा येथील बँकेत वटणारा असावा. पत्ता : मुख्यमंत्री मदत निधी, मुख्यमंत्री बिहार, सचिवालय, ४ देशरत्न मार्ग, पाटणा ८००००१.
तुम्ही कम्प्युटरवरून ऑनलाइनही मदत पाठवू शकता. त्यासाठी बँक अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे : मुख्यमंत्री मदत निधी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पाटणा सचिवालय शाखा, अकाऊंट नं. १०८३९१२४९२८.

गुरुवार, 4 सितंबर 2008

विजय दर्डा यांच्याकडून वसुली करण्याचा आदेश

मुंबई, ४ सप्टेम्बर-खासदार विजय दर्डा यांनी खासदार निधीचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले असून या रकमेची वसुली करण्याचा आदेश केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
लष्करातून निवृत्त झालेल्या आणि यवतमाळच्या जामनकर नगर येथे राहणा-या दिंगबर पाजगडे यांनी विजय दर्डा यांच्याविरोधात खासदार निधीचा गैरवापर केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई हाय कोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी दरम्यान सुमारे ३४ लाख ५३ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर केंद्र सरकारने वसुलीचे आदेश दिले.

विजय दर्डा यांच्याकडून वसुली करण्याचा आदेश

मुंबई, ४ सप्टेम्बर-खासदार विजय दर्डा यांनी खासदार निधीचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले असून या रकमेची वसुली करण्याचा आदेश केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
लष्करातून निवृत्त झालेल्या आणि यवतमाळच्या जामनकर नगर येथे राहणा-या दिंगबर पाजगडे यांनी विजय दर्डा यांच्याविरोधात खासदार निधीचा गैरवापर केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई हाय कोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी दरम्यान सुमारे ३४ लाख ५३ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर केंद्र सरकारने वसुलीचे आदेश दिले.

बुधवार, 3 सितंबर 2008

अणुकरारात बुश यांच्याकडून भारताची दिशाभूल?

वॉशिंग्टन / व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), ता. ४ - अणुइंधन पुरवठा गटाच्या (एनएसजी) आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या तोंडावर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी लिहिलेल्या "गोपनीय' पत्राच्या गौप्यस्फोटाने डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या पोटात भीतीचा गोळा उठला.
अणुचाचणीचा भारताचा हक्क अबाधित नाही आणि अखंडित अणुइंधन पुरवठ्याचे अमेरिकेवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही, असे बुश यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हे पत्र नऊ महिने जुने असून ते डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार कोसळू नये, याकरिता चक्क "दडवून' ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, या पत्रातील तपशील डॉ. सिंग यांना माहीत होता की नाही, याबाबत ठोस समजू शकलेले नाही.
"एनएसजी'ने आजच्या बैठकीत अणुकराराला हिरवा कंदील द्यावा, यासाठी बुश प्रशासन आणि डॉ. सिंग यांचे सरकार अक्षरशः धडपडत असतानाच हे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या पत्रातील आशयानुसार, अणुकरारासाठी अमेरिकेने भारताला "सवलती' नव्हे, तर बऱ्याच कठोर अटी लादल्या असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. अणुकरारातील काही महत्त्वाच्या कलमांचा भारताने जो अर्थ काढला आहे, नेमका त्याच्या विपरीत असा अर्थ बुश प्रशासनाने लावला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकीकडे बुश यांनी भारताची दिशाभूल केली, तर दुसरीकडे डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला अंधारात ठेवले, असा आरोप करण्यास डावे पक्ष आणि भाजपने सुरवात केली आहे. यामुळे डॉ. सिंग यांचे सरकार अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हे पत्र बुश यांनी प्रतिनिधी गृहाच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष हावर्ड बर्मन यांना लिहिले आहे. बर्मन यांनी अणुकराराबद्दल ४५ प्रश्‍न विचारले होते. त्याला बुश यांनी १६ जानेवारी रोजी उत्तर दिले. मात्र, ते पत्र तब्बल नऊ महिने "दडवून' ठेवण्यात आले. स्वतः बर्मन यांनी "वॉशिंग्टन पोस्ट' या प्रख्यात दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, "हे पत्र सार्वजनिक केले तर डॉ. सिंग यांचे सरकार कोसळेल, अशी भीती परराष्ट्र मंत्रालयाला वाटत असल्याने त्यांच्या विनंतीनुसार मी ते सार्वजनिक केले नाही. मात्र, जर उद्या "एनएसजी'ने मान्यता दिलीच तर ते अमेरिकन कॉंग्रेससमोर येईल. तेव्हा सर्व सदस्यांना वस्तुस्थिती माहिती व्हावी, यासाठी आपण हे पत्र आताच सार्वजनिक करत आहोत.'
ऑगस्ट २००७ मध्ये डॉ. सिंग यांनी संसदेत केलेल्या भाषणामध्ये अनेक शंकांचे, आक्षेपांचे निराकरण केले होते. ""अणुचाचणी घेण्याचा भारताचा हक्क कोणत्याही स्थितीत अबाधित आहे आणि अणुइंधनाचा पुरवठा अखंडितच राहील,'' असा दावा त्यांनी केला होता. आता बुश यांच्या स्पष्टीकरणानुसार, तशी स्थिती नसल्याचा अर्थ ध्वनित होत आहे. विशेष म्हणजे बुश यांचे पत्र जानेवारीमधील आहे आणि डॉ. सिंग यांनी संसदेत ऑगस्टमध्ये भाषण केले होते. त्यामुळे बुश यांच्या पत्राचा तपशील त्यांना होता की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगलवार, 2 सितंबर 2008

सेंसेक्स में उछाल सूचकांक १५ हजार के पार

मुंबई, २ सितंबर- कच्चे तेल के पिघलने के साथ ही बैंकिंग, रियलटी, ऑइल एंड गैस और इंजीनियरिंग क्षेत्र की कंपनियों के शेयरों में निवेशकों के जोरदार समर्थन के बीच देश के शेयर बाजारों ने आज लंबी छलाँग लगाई।
बम्बई शेयर बाजार (बीएसई) का सेंसेक्स ५५३ अंक उछलकर २० दिन के अंतराल के बाद फिर 15 हजार अंक से ऊपर निकल गया। नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) का निफ्टी १५५ अंक की दौड़ से ४५०० अंक से ऊपर बंद हुआ। एशियाई शेयर बाजारों में गिरावट के बावजूद यहाँ शुरू से ही मजबूती का रुख रहा।
गुस्ताव तूफान की रफ्तार धीमी पड़ जाने से नुकसान कम होने की उम्मीद के चलते कच्चा तेल आज चार माह के निम्नस्तर १०५.४६ डॉलर प्रति बैरल तक लुढ़क गया। विश्लेषक उम्मीद कर रहे हैं कि अमेरि‍का और चीन जैसी विश्व की बड़ी अर्थव्यवस्थाओं में ईंधन की माँग कम होने से कच्चे तेल के दाम और गिर सकते हैं।
बाजार सूत्रों के मुताबिक विदेशी संस्थान फिर से सक्रिय होते नजर आ रहे हैं। इसे देखते हुए पिछले तीन कारोबारी दिवसों में यह दूसरा मौका है कि सेंसेक्स ने ५०० अंक से अधिक की छलाँग लगाई है। शुक्रवार को भी सेंसेक्स ५१६ अंक बढ़ा था।
सेंसेक्स कल के १४४९८.५१ अंक की तुलना में १४६०९.४४ अंक पर खुला और नीचे में १४५४३.२१ अंक तक गिरने के बाद लिवाली की लहर में इसकी तुलना में ५६३ अंक बढ़कर ऊपर में १५१०६.१५ अंक तक जाने के बाद समाप्ति पर कुल ५५२.९४ अंक अर्थात ३.८१ प्रतिशत की छलाँग के साथ १५०५१.४५ अंक पर बंद हुआ।
तेरह अगस्त के १५०९३ अंक के बाद सेंसेक्स फिर १५००० अंक से ऊपर निकला। एनएसई का निफ्टी १५५.३५ अंक अर्थात ३.५७ प्रतिशत की बढ़त से ४५०४ अंक पर पहुँच गया। बीएसई के अन्य सूचकांकों में मिडकैप और स्मालकैप में क्रमश: ९१.५९ तथा ८९.०८ अंक की बढ़त रही। यह सूचकांक समाप्ति पर क्रमश: १.६० तथा १.२९ प्रतिशत बढ़त से ५८३३.५७ और ६९८०.४७ अंक पर बंद हुए।
ब्याज दरों में फिलहाल और बढ़ोतरी की संभावनाएँ कम होने से बीएसई के बैंकेक्स ने ४२०.५८ अंक की छलाँग लगाई। कैपीटल गुड्स का शेयर ४४२.०६ अंक और रियलटी ३५१.३६ अंक ऊपर रहा। ऑइल एंड गैस ३५१.५२ अंक, मैटल १६४.०५ अंक तथा आईटी ११०.१७ अंक ऊँचा बंद हुआ। निफ्टी मिडकैप में १.९५ प्रतिशत निफ्टी जूनियर में ३.६८ प्रतिशत का उछाल आया।

ज्येष्ठ वकील विनायकराव वालावलकर यांचे कोर्टातच निधन

मुंबई, २ सप्टेम्बर- हायकोर्टातील ज्येष्ठ वकील विनायकराव वालावलकर (८८) यांचे सोमवारी दुपारी हायकोर्टात युक्तिवाद करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
न्या. आर. एम. सावंत यांच्या कोर्टात ते एका प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी आले होते. दुपारी भर कोर्टातच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या निधनाने कोर्टाचे कामकाज दोन तासांसाठी तहकूब करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन कन्या आहेत. त्यांचा मुलगा नरेंद वालावलकर हेसुद्ध ज्येष्ठ वकील आहेत. त्यांच्यावर दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वालावलकर हे शहर दिवाणी कोर्टात काही काळ न्यायाधीशही होते. आणीबाणीच्या काळात १९७५ मध्ये त्यांना तुरुंगवासही झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी विविध महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये काम पाहिले होते. ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे काही काळ सदस्यही होते.

"टॅप' केलेले संभाषणही "मोका'नुसार पुरावाच- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, २ सप्टेम्बर- दोन व्यक्तींमधील कोणतेही "टॅप' केलेले संभाषण हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोका) पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल, असा नवा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणे आता पोलिसांना अधिक सोपे होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सन २००३ मध्ये संभाषण हा पुरावा ठरू शकत नसल्याचा निकाल दिला होता। त्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निकाल रद्द केला. संशयित आरोपींचे संभाषण "टॅप' करणे आणि ते पुरावा म्हणून वापरणे, या दोन्ही गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.
"मोका' लावण्यात आलेले आरोपी आणि चित्रपटसृष्टीतील अर्थपुरवठादार भरत शहा, छोटा शकीलचा संशयित साथीदार शमीम मिर्झा अरिफ बेग, जमिनी बळकावणारा संजय पाटील यांच्यासह काही जणांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले होते. गुन्हेगारी टोळ्यांतील आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यासाठी या कायद्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे म्हणणे महाराष्ट्र सरकारने मांडले होते.
गुजरातमध्येही संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कडक कायद्याची मागणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने त्यांना बळच मिळाले आहे.

अतिकुपोषित मुलांसाठी राज्यात बालविकास केंद्रांची स्थापना

चंदगड, २ सप्टेम्बर - सहा वर्षांखालील अतिकुपोषित बालकांना एकत्रित आरोग्य व आहार सेवा देऊन कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी औरंगाबादच्या राजमाता जिजाऊ माता, बालआरोग्य व पोषण केंद्राच्या साह्याने शासनाने बालविकास केंद्राची स्थापना करण्याचे निश्‍चित केले आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यासाठी एक केंद्र स्थापन करण्याचे निर्देश आहेत.
बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासनाने आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत, तरीही काही ठिकाणी कुपोषित मुले आढळत असल्याने तज्ज्ञांच्या मतानुसार ही नवी योजना आखली आहे. नियमित आहार घेऊनही वजन वाढत नसलेल्या बालकांना केंद्रात दाखल करून शास्त्रीय नियमानुसार आहार दिला जाणार आहे.
केंद्रासाठी स्वतंत्र सर्वसोयींनी सुसज्ज इमारत, औषधपुरवठा, त्यासाठीचा निधी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा राबविली जाणार आहे.
किमान पंधरा ते एकवीस दिवसांचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी संबंधित मुलाचे पालक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांनी केंद्रात थांबावयाचे आहे. सात महिने ते तीन वर्षांपर्यंत शिशुगट व तीन ते सहा वर्षांसाठी बालगट करून दररोजच्या वेळापत्रकानुसार गाईचे दूध, साखर, तेल, पाणी, भाजी, उकडलेला बटाटा, दही, अंडी ठराविक प्रमाणात देऊन रोजच्या वजनाची नोंद ठेवली जाणार आहे. बालक घरी जाताना त्याची सर्व माहिती एका कार्डावर देऊन नंतरच्या काळातही ते पुन्हा कुपोषणात जाऊ नये म्हणून अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग सतर्क राहणार आहे.
कुपोषणमुक्त समाजासाठी मातेचा आणि संपूर्ण समाजाचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून, स्थानिक पातळीवर मुलांचे उंचीच्या प्रमाणात वजन निश्‍चित करून सुदृढ, कुपोषित, अतिकुपोषित यादी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांमार्फत केले जात आहे. त्यासाठी शासनाने शास्त्रीय निकष वापरले असून, या तक्‍त्यांचा पुरवठा सेविकेंना केला आहे. या नव्या माहितीनुसार मुलांची श्रेणी निश्‍चित करून कुपोषित मुलांसाठी ही नवी योजना राबविली जाणार आहे.

अमेरिकेत वादळाने हाहाकार

अमेरिका, २ सप्टेम्बर-अमेरिकेच्या लुइझाना प्रांत परिसरात आगामी काही तासात 'गुस्ताव' या समुद्री वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवल्यानंतर या भागात हाहाकार माजला असून, या भागातील लाखो नागरिकांनी सुरक्षीतस्थळी प्रयाण केले आहे.
अमेरिकेत गेल्यावर्षी आलेल्या कॅटरिना या वादळापेक्षा गुस्तावची ताकद अधिक असल्याने बुश प्रशासनानेही नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ताशी १८० किलोमीटर वेगाने हे वारे वाहतात, यानंतर या भागाला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
अनेक भारतीयांनीही याचा धसका घेतला असून, या भागात अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. इतकेच नाही तर या प्रांताचे गव्हर्नरही भारतीय बॉबी जिंदाल हेच असल्याने येथील भारतीयांनाही सुरक्षीतस्थळी हालवण्यात येत आहे.

सोमवार, 1 सितंबर 2008

फुले, बिरासदार व नेहवाल यांना "पुणे फेस्टिव्हल पुरस्कार'

पुणे, १ सप्टेम्बर - पुणे फेस्टिव्हलचे यंदा पाच सप्टेंबरला उद्‌घाटन होणार आहे। राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल, अशी माहिती खासदार सुरेश कलमाडी यांनी दिली.
यंदाच्या वर्षी ज्येष्ठ सिने कलावंत निळू फुले, रुस्तम-ए-हिंद हरिश्‍चंद्र बिरासदार आणि नुकत्याच झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या साईना नेहवाल यांना "पुणे फेस्टिव्हल पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. कविसंमेलनात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल।
यंदाही उद्‌घाटन सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

शिल्पा शेट्टीच्या गाडीवर आठवले समर्थकांची दगडफेक

मुंबई, १ सप्टेंबर - कलर्स वाहीनीवर नुकताच सुरू झालेला रिऍलिटी शो "बिग बॉस'मध्ये रामदास आठवले यांना प्रवेश न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) समर्थकांनी या शोची सूत्रसंचालिका आणि बॉलीवुड नायिका शिल्पा शेट्टी हिच्या गाडीवर लोणावळ्याजवळ दगडफेक केली.
एकता कपूर आणि तुषार कपूर यांच्यासोबतच्या मुलाखत कार्यक्रमाचे लोणावळ्यातील रेकॉर्डींगचे काम आटोपून शिल्पा शुक्रवारी मुंबईकडे निघत असताना, आठवले समर्थकांनी दगडफेक केली.
आपण दलित असल्यामुळे तसेच शिल्पाच्या सांगण्यावरून "बिग बॉस'साठी डावलण्यात आल्याचा आरोप आठवले यांनी केला होता।
मात्र, कार्यक्रमातील पात्रांच्या निवडीत आपला कोणताही हस्तक्षेप नसल्याचे शिल्पाने म्हटले आहे.

भाजी विक्रेत्यांवरील कारवाईमुळे साताऱ्यात तणाव

सातारा, १ सप्टेम्बर- शहरातील एकत्रित भाजी मंडईच्या विरोधात असलेल्या आणि जुन्या भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱ्या पाच जणांवर सोमवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई केली. या भाजी विक्रेत्यांचे सामान आणि भाजीपाला जप्त केल्यानंतर त्यांनी नवीन भाजीपाला आणून रस्त्यावर ओतून दिला.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवीन भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर काही महिला भाजी विक्रेत्या आणि महिला पोलिस कर्मचारी यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यातच लक्ष्मीबाई चाळके नावाची एक महिला बेशुद्ध पडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे सोमवारी सकाळी या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
शहरात जुन्या भाजी मंडईपासून अवघ्या दहा पावलांवर नगरपालिकेने नवीन "महात्मा फुले भाजी मंडई' बांधली आहे। काही भाजी विक्रेत्यांचा त्याला विरोध आहे. त्यांनी सोमवारी सकाळी जुन्या भाजी मंडईतच विक्री करण्यास सुरवात केली. त्यानंतर आठ वाजताच नगरपालिकेचे अधिकारी पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी सामान जप्त करण्यास सुरवात केली.
या कारवाईचा भाजी विक्रेत्यांनी निषेध केला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भाजीपाला जप्त करण्याआधी पंचनामे केले नसतील, तर त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विक्रेत्यांच्या वतीने ऍड. वर्षा देशपांडे यांनी केली.

राज यांच्या मराठीचा रेल्वेलाही धसका

मुंबई, १ सप्टेंबर- मुंबईत राहायचे असेल तर मराठी कंपल्सरीची घोषणा करत उत्तर भाषकांवर टीकेची झोड उडवणाऱ्या मनसे नेते राज ठाकरे यांच्या या मराठी आंदोलनाचा आता रेल्वेनेही धसका घेतला असून प्लॅटफॉर्म ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नावाच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सध्या मुंबईतील विविध प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारचे चित्र असून लवकरात लवकर हे काम पूर्णं करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. इतकेच नाही तर आता मुंबईतील विविध प्लॅटफॉर्मवर 'काम सुरू रस्ता बंद' अशा पाट्याही आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मुंबईत राहायचे तर मराठी आलेच पाहिजे असा आग्रह ठाकरे यांनी धरला असून, यापूर्वी त्यांनी मुंबईतील व्यापाऱ्यांना 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती, ही मुदत काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे राज यांनी आता स्पष्ट केले असून, लवकरात लवकर पुन्हा हे आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

रविवार, 31 अगस्त 2008

इन्सपेक्टर प्रदीप शर्माचा ‘एन्काउंटर’; पोलिस सेवेतून बडतर्फ

मुंबई, ३१ ऑगस्ट-मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एकेकाळी प्रचंड दरारा असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना शनिवारी पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। ११२ गुंडांना चकमकीत ठार करणारे शर्मा यांच्यावर कुख्यात ‘ डी ’ कंपनीला मदत करणे तसेच हजारो कोटीची बेहिशीबी मालमत्ता ठेवण्याचे गंभीर आरोप होते.
यासंबंधात शर्मा यांची पोलिस विभागातर्फे खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत शर्मा दोषी आढळल्यानं कलम ३११ अंतर्गत त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं वृत्त आहे.
१९८३ साली महाराष्ट्र पोलिस दलात सामिल झालेले शर्मा अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. मुंबई पोलिस दलातील विविध विभागांमध्ये त्यांनी उपनिरीक्षक आणि निरीक्षक म्हणून काम केले आहे. मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभागातही त्यांनी काम केले होते. शिवाय मुंबईतल्या डी.एन. नगर पोलिस ठाण्यातही ते काही काळ कार्यरत होते.
प्रदीप शर्मा यांची अमरावती येथे बदली करण्यात आली होती. मात्र तिथला कार्यभार त्यांनी स्वीकारला नव्हता. त्यानंतर आजारपणाचे कारण दाखवून त्यांनी मुंबईत परत बदली करवून घेतली होती. शर्मा यांना काही काळ सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
मुंबई पोलिस दलात असताना प्रदीप शर्मा यांनी काही कुख्यात गुन्हेगारांना मदत केली असल्याचा गंभार आरोप कुख्यात गुंड छोटा राजनने न्यूज चॅनलशी बोलताना केला होता. शिवाय शर्मा यांनी एक हजार कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता साठवल्याचा आरोपही करण्यात आला होता.
यापूर्वी बेहिशेबी मालमत्ता ठेवल्याच्या आरोपातून मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टर दया नायक यांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून ५ महिला जखमी

नाशिक, ३१ अगस्त- चांदवड तालुक्‍यातील शिंडे येथे वीज पडून पाच महिला जखमी झाल्या आहेत. येथील तुकाराम मंदिराच्या आडोस्याला या महिला उभ्या असताना वीज कोसळली. रविवारी दुपारी ही घटना घडली.
गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला नाशिकच्या रूग्णालयात तर अन्य ४ महिलांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे।
जखमी महिलांची नावे अशी, राधाबाई बाजीराव बरडे, सुनिता मनोहर गोधडे, कमल रंगनाथ शिंदे, कल्याबाई नारायण पवार आणि अंजनाबाई राजाराम गोधडे.

विदर्भात दोन दिवसांत ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर, ३१ ऑगस्ट - विदर्भात गेल्या दोन दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जन आंदोलन समितीने रविवारी येथे दिली.
यामध्ये यवतमाळमध्ये तीन, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर अमरावती आणि नागपूरात प्रत्येकी एका शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
यवतमाळमधील दोन शेतकऱ्यांनी तसेच नागपूरातील व चंद्रपूर जिल्ह्यातील एक अशा चौघा शेतकऱ्यांनी शनिवारी बैल पोळा सणादिवशीच आपली जीवनयात्रा संपवली.

पूरग्रस्‍तांसाठी मदतीचे हात सरसावले

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट-बिहारमध्‍ये कोसी नदीला आलेल्‍या महापुरामुळे मोठ्या अडचणींचा सामना करीत असलेल्‍या नागरिकांच्‍या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात सरसावले आहेत. नेते, अभिनेते, लष्‍करासह खेळाडूंनीही पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्‍यास सुरूवात केली आहे. लष्‍कराच्‍या पश्चिम विभागातील जवानांना मदतकाया्रसाठी मुंबईहून बिहारला रवाना करण्‍यात आले आहे.
रेल्‍वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्‍वेच्‍या अधिका-यांना पूरग्रस्‍तांना रेल्‍वेच्‍या प्रवास भाड्यात सूट देण्‍याचे आदेश दिले आहेत. या सोबतच बिहारच्‍या रेल्‍वे स्टेशनांवर त्‍यांना फूड पॅकेट्सही उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या कामासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तर हरियाणा सरकारने ५ कोटी देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाजपची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यातील मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी पुढे येण्‍याचे आवाहन केले आहे. तर भाजपने स्‍वतः त्‍यासाठी निधी उभारण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत.
ऑलम्पिक पदक विजेता ‍अभिनव बिंद्रा आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही पूरग्रस्‍तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. बिंद्राने पूरग्रस्‍तांसाठी ५ लाख रुपये देण्‍याची घोषणा केली आहे. तर सुनील शेट्‍टी याने लोकांना बिहारच्‍या मदतीसाठी धावून जाण्‍याचे आवाहन केले आहे.
पतंजलि योग पीठातर्फे पूरग्रस्‍तांसाठी दोन कोटी रुपयांचे औषधे आणि अन्‍नधान्‍य देण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे.

टी. चंदशेखर घेणार राजकारणाची सनद?

मुंबई, ३१ ऑगस्ट-महाराष्ट्राच्या प्रशासनात धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे टी. चंदशेखर हे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन आंध्र प्रदेशच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे कळते. तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी याच्या 'प्रजा राज्यम्' या पक्षातून ते आपली नवी कारकीर्द सुरू करतील, अशी चिन्हे आहेत.
ठाणे, नागपूर व मुंबईत एमएमआरडीएचे आयुक्त म्हणून धडाकेबाज विकासकामे करून चंदशेखर यांनी स्वत:चा ठसा उमटविला. राजकीय नेत्यांच्या 'गुडबुक'मध्येही त्यांनी स्थान मिळविले. परंतु म्हाडाचे उपाध्यक्ष असताना त्यांचे खासदार गुरूदास कामत यांच्याशी मतभेद झाले. तेव्हा त्यांनी थेट आपल्या सनदी सेवेचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिला. परंतु तो मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला नव्हता. त्यानंतर ते सहा महिन्यांच्या सुट्टीवर गेले असून त्यांचा सध्या आंध्र प्रदेशमध्ये मुक्काम आहे. चंदशेखर यांचा राजीनामा लवकरच मंजूर होऊन ते राजकारणात उडी घेतील. सहा-सात महिन्यांत लोकसभेबरोबर आंध्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यापूवीर् ते राजकारणात प्रवेश करतील हे नक्की.
१९८७ च्या आयएएस बॅचचे असलेले टी. चंदशेखर हे परदेशात गेले असल्याची चर्चा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये होती. ते पुन्हा प्रशासकीय सेवेत परतणार नसल्याचेही बोलले जात होते. मात्र गेले काही महिने ते आंध्र प्रदेशमध्ये दौरे करत आहेत. नव्या पक्षाच्या स्थापनेमागे त्यांचाच 'ब्रेन' असल्याचे बोलले जाते. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी काही दिवसांपूवीर् जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली होती. आंध्रमधील राजकीय नेत्यांशी त्यांचा निकटचा संबध आहे. दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कुुटुंबाशीही त्यांचे चांगले संबध आहेत.

शनिवार, 30 अगस्त 2008

भटक्या कुत्र्यांचा वाद पूर्णपीठाकडे

मुंबई, ३० ऑगस्ट- भटक्या कुत्र्यांना ठार मारावे की त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना निवा-यात सोडून देण्यात यावे, याबद्दल मुंबई हायकोर्टाच्या दोन खंडपीठांमध्ये मतभेद झाल्याने ते तीन न्यायमूर्तीच्या पूर्णपीठापुढे सुनावणीला गेले असून त्याची नियमित सुनावणी पुढच्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
या प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे तत्कालिन मुख्य न्या. एम. बी. शहा यांच्या खंडपीठाने कुत्रे मारण्यास मनाई करणारा निर्णय दिला होता. तर गोवा खंडपीठाचे न्या. पाटणकर यांच्या खंडपीठाने कुत्रे मारण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. आता यावर न्या. एस. राधाकृष्णन, न्या. दिलीप भोसले व न्या. विजया कापसे-ताहिलरमानी यांचे खंडपीठ दर शुक्रवारी सुनावणी घेईल.

शुक्रवार, 29 अगस्त 2008

जुन्या पिढीतील गायिका लीला नायडू यांचे पुण्यात निधन

पुणे, २९ ऑगस्ट- जुन्या जमान्यातील प्रसिद्ध गायिका लीला नायडू (वय ८६; पूर्वाश्रमीच्या लीला पाठक) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्याबरोबर त्यांनी गायलेले "हवास मज तू हवास सखया' हे "दहा वाजता' या "प्रभात'च्या चित्रपटातील गीत आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.
प्रभात आणि नवयुग फिल्म कंपनीच्या "गोकूळ' "किती हसाल' "नवरदेव' या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले होते. "संगीत सौभद्र' या नाटकात त्यांनी केलेल्या कृष्णाच्या भूमिकेचे आचार्य अत्रे यांनी कौतुक केले होते.

जयश्री गडकरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई, २९ ऑगस्ट- ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सिने तसेच नाट्य सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
जयश्रीताईंच्या हाजी अली येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ , लता नार्वेकर , आशा काळे , प्रकाश भेंडे व उमा भेंडे , दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांचा त्यात समावेश होता. दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा शिवाजी पार्कला पोहोचली. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जावडेकरांच्या मद्यपानावर 'प्रकाश'

मुंबई, २९ ऑगस्ट- जगाला नैतिकतेचे डोस पाजणार्‍या भारतीय जनता पक्षाचे एकेक नेते नवनवीन वादात अडकत आहे. ताजा वाद आहे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासंदर्भातला.
इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जावडेकरांची मद्याचे चषक हातात घेताना व चीअर्स करतानाची छायाचित्रे स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.
त्यांच्या या छायाचित्रांवरून सध्या मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले असून, कॉग्रेसनेही जावडेकरांविरोधात टीकेची झोड उडवली आहे. मंगळवारी जावडेकर इंदूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते, कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये परतल्यावर तेथे शॅंपेन पार्टी झाली. यात शॅंपेनची बाटली उघडतानाचा फोटो येथील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे.
यापूर्वी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय जोशी हेही एका सेक्स कॅंडलच्या सीडी प्रकरणात अडकले होते. तर दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्याचे नाव घेतले जात होते, ते त्यांचे पुत्र राहुल महाजनही अमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याने भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका प्रदेश कॉग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी केली आहे.

"नॅनो' प्रकल्पाचे कामकाज ठप्प

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट- तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी "टाटा मोटर्स'च्या सिंगूर प्रकल्पाकडे जाण्याचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे येथील कामकाज ठप्प झाले आहे, असे "टाटा'च्या प्रवक्‍त्यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी "नॅनो'कडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपून येणाऱ्या कामगारांना कंपनीत प्रवेश करु दिला नाही.
हिंसाचाराच्या भीतीने येथील कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या आवारात येणे टाळले.
या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमीनीपैकी चारशे एकर जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली. ही जमीन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतली गेली आहे, असे तृणमूल कॉंग्रेसचे मत आहे.
रतन टाटा मात्र अशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत. किंबहुना कामात अशा प्रकारचे अडथळे येत असतील आणि हिंसाचार सुरुच राहणार असेल तर आपण हा प्रकल्प दुसरीकडे हलवू, असा इशारा रतन टाटा यांनी दिला आहे.

चारित्र्यहीन स्त्रीवर बलात्कार हा गुन्हाच

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट- अनेकांशी संबंध असलेल्या महिलेवर शारीरिक संबंध कोणालाही लादता येणार नाहीत आणि तशी मुभाही कायद्याने कोणाला दिलेली नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावले.
बलात्काराच्या खटल्यात निर्दोष सोडलेल्या दोन आरोपींच्या खटल्याबाबत न्या. अरिजित पसायत आणि मुकुंदकम शर्मा यांनी हा निकाल दिला.
सतरा वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याबद्दल मुन्शी आणि अन्य एका आरोपीला स्थानिक न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. ती मुलगी कुमारिका नव्हती, या मुद्द्यावर न्यायालयाने आरोपींची सुटका केली होती. त्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मुलगी कुमारिका नाही याचा अर्थ तिच्यावर कोणीही बलात्कार करावा असा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने पुन्हा हा खटला चालविण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला.

गुरुवार, 28 अगस्त 2008

मनसेची गुंडगिरी खपवून घेणार नाही

मुंबई, २९ ऑगस्ट-शिवसेना व मनसे यांनी मराठीचे श्रेय लाटण्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरू नये। ते खपवून घेतले जाणार नाही. मोडतोड, गुंडगिरी करणे हा कायदा राबवणा-यांचा मार्ग असू शकत नाही. जबरदस्तीने बोर्ड तोडणा-यांना पोलिस चोख उतर देतील, असे सांगत मुंबईत मनसेच्या ११३५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिस दल सक्षम आहे. त्यासाठी गुरुवार दुपारी चार वाजेपर्यंत मनसेच्या ११३५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यात प्रत्यक्षात ७२८ जणांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना तडीपार केले असून, १४९ जणांना वॉर्निंग नोटीस देण्यात आली आहे, याकडेही आर. आर. पाटील यांनी लक्ष वेधले.

सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विक्रीस काढला - नितिन गडकरी

जळगाव, २९ ऑगस्ट- - राज्यात वीज भारनियमनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तब्बल पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अशी परिस्थितीत असतानाही राज्यातील मंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सध्या त्यांच्यात जमीन विक्रीसाठी स्पर्धा सुरू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विक्रीस काढला आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गुरुवारी जळगाव आले होते। हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, जिल्हाध्यक्ष आमदार गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस सुनील बढे, डॉ. राजेंद्र फडके, सुनील नेवे, आमदार अरुण पाटील उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी जळगाव येथील सभेत सत्ता मिळाल्यास शहराचा कायापालट करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे। परंतु याच मंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात सत्ता असतानाही महाराष्ट्राचा कोणताही कायापालट केला नाही. त्यामुळे त्यांच्या या आश्‍वासनावर जनतेने विश्‍वास ठेवू नये. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. बॉम्बस्फोट होत आहे दर तीन तासांनी एक खून होत आहे. तर राज्यात शेतीची परिस्थिती अत्यंत खराब आहे.
केंद्रातील सरकारनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महापालिकेतील गैरव्यवहार प्रकरणी जाहीर झालेल्या सोनी समितीच्या अहवालाबाबत बोलताना ते म्हणाले, की समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे विधिमंडळात त्यावर चर्चेची गरज नाही. त्यामुळे आता केवळ कारवाईच आवश्‍यक आहे. शासनाने तातडीने कारवाई करावी याचा पाठपुरावा आपण करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यास नागपूर प्रमाणेच येथेही विकास करण्यात येईल असे आश्‍वासनही गडकरी यांनी दिले.

फोर्ब्सच्या यादीत मायावतींचे नाव

न्यूयॉर्क, २८ ऑगस्ट- जगातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचाही समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकन मासिक फोर्ब्सने ही यादी नुकतीच जाहीर केली आहे, यात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पूर्वीपासूनच समावेश आहे।
गेल्यावर्षीच्या मानाने सोनियांचा क्रम यात घसरला असून, सहाव्या स्थानावरून त्या २१ स्थानापर्यंत घसरल्या आहेत. तर दुसरीकडे मायावतींना या यादीत स्थान मिळाले असून त्या ५९ व्या जागेवर आहेत. इंदिरा नुई यांच्या क्रमवारीत वाढ झाली असून त्या तिसऱ्या स्थानावर पोहचल्या आहेत.
बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोटेकच्या प्रमुख किरण मुजूमदार यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे। त्या ९९ व्या स्थानावर आहेत.
सोनिया गांधी या जरी देशातील सर्वात शक्तिशाली पक्षाच्या प्रमुख असल्या तरी मायावती यांनी त्यांना आव्हान देण्यास सुरू केल्याचे फोर्ब्सने नमूद केले आहे.

राज शेवटच्या क्षणी फुस्स...

मुंबई, २८ ऑगस्ट-२८ ऑगस्टनंतर इंग्रजी पाट्या लावणा-या दुकानांवर ‘ आपल्या स्टाइल ’ मधे आंदोलन करणाची भाषा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे माघार घेतली आहे. अनेकांनी पाट्या तयार करायला दिल्या असल्याचं कारण त्यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी पाटी आंदोलनाने व्यापा-यांना दिलेली २८ ऑगस्टची तारीख आता अवघ्या एका दिवसावर आली आहे. असे असताना राज्य सरकार आणि महापालिकेने कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याने आपण कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मराठी पाट्या न लावणा-या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी मनसेचे मुख्यालय असलेल्या ' राजगड ' येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुंबईतील अनेक भागात २८ ऑगस्टच्या डेड लाइन दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठी पाट्या लागल्या आहेत. तसेच अनेकांनी मराठी पाट्या करायला टाकल्या आहेत. त्या पाट्या येईपर्यंत आंदोलन मागे घेतले आहे. तसेच दुकानादारांनी मराठीत पाट्या लावाव्यात , या संदर्भात महापालिका आदेश काढून कारवाई करणार आहे. त्यामुळे आता काही दिवस आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही कायम स्वरूपाची शांतता नाही. कशी कारवाई होत आहे. यावर आमची बारीक नजर आहे , असेही राज यांनी सांगितले.
राज्यात कायद्याची अमंलबजावणी होत नसेल तर हे सरकारचे अपयश आहे. नागपूरमध्ये महिलांनी गुंडाला ठार मारले. त्यांनी कायदा हाता घेतला , पण त्यांनी कायदा हातात का घेतला याच्या मागचं कारण लक्षात घेतले पाहिजे. सरकारचं जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येवू देते. सरकारने योग्यवेळी योग्य कारवाई केल्यास असे प्रकार घडणार नाही. कायदा हातात घेता म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना अटक करतात. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करतात. मूळात कायदे तोडतं कोण आणि हा कायदा आहे हे सांगायला जाणा-यावरच कारवाई का केली जाते , असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दीड मिनिटात घर साफ करणारी टोळी अटकेत

मुंबई, २८ ऑगस्ट - "टाटा स्काय' डिश लावण्यासाठी आल्याचा बहाणा करून केवळ दीड मिनिटात घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी पकडण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. यातील एक तरुण पुण्याचा आहे. या टोळीने मुंबई, पुणे, गुजरात, बंगळूर, कर्नाटकात उच्चभ्रू वस्ती निवडून चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
नीलेश चौगुले (पुणे) आणि संतोष मांजरेकर व अबीबुल्ला खान (दोघेही रा. मुंबई) हे काल सायंकाळी दादरच्या गोखले रोड येथील सखाराम कृपा इमारतीच्या गच्चीवर चढले. त्या वेळी येथील रहिवाशांनी त्यांना हटकले. आपण टाटा स्काय डिश तपासणीसाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले; पण तरीही संशय आल्याने त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र गाडीत असल्याचे सांगून त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी पकडून त्यांना पोलिसांच्या हवाली केले.
विशेष म्हणजे हे तिघेही चांगले कपडे, टाय लावून यायचे. त्यामुळे कोणालाच संशय येत नव्हता. उच्चभ्रू वस्ती निवडायची. अगोदरच कोणत्या घरात माणसे नाहीत, हे हेरायचे आणि त्या घरात शिरायचे आणि अवघ्या दीड मिनिटात घर साफ करायचे कौशल्य त्यांच्याकडे होते.

वीस तासांच्या प्रयत्नांनंतर दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू, २८ ऑगस्ट-जम्मूतील बंदतालाब भागातील एका घरात घुसून नऊ जणांना बंधक बनवणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नांनंतर खात्मा केला.
या वीस तासांच्या संघर्षात दहशतवाद्यांनी तीन पुरुष बंधकांची मात्र नाहक हत्या केली. बंधक बनवण्यात आलेल्यांमध्ये एक महिला आणि चार मुलांचाही समावेश होता. या साऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असली तरी महिलेला गंभीर दुखापत झाल्याने येथील लष्करी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
काल पहाटे साडे सहा दरम्यान एका रिक्षा चालकाची हत्या करत या भागात दहशतवादी घुसले होते. दहशतवाद्यांची माहिती मिळताच या भागाला लष्कराने वेढा घातला. दहशतवाद्यांना मारण्याचे आदेश जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत संयम दाखवत आधी या भागातील अनेक रहिवाशांना सुखरूप इतरत्र हालवले.
यानंतर दहशतवाद्यांना घेरण्यात आले. दहशतवाद्यांनी जबरदस्त गोळीबार केल्यानंतर त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्योत्तर दिले. दुपारी पहिला दहशतवादी ठार झाल्यानंतर जवानांनी या भागाला आणखी वेढा वाढवला. संध्याकाळी मात्र दोन्ही दहशतवादी मारले गेले.
तीन दहशतवादी मारल्या गेल्याची खात्री पटल्यानंतर रात्री उशिरा लष्कराने बंधक बनवण्यात आलेल्या चार मुलांसह एका महिलेची घरातून सुटका केली. दहशतवाद्यांकडे एके-४७ रायफलसह अनेक शस्त्रास्त्र आढळून आले.

महापौर, आमदारांच्या खासगी वाहनांचा 'प्रोटोकॉल' रद्द

मुंबई, २८ ऑगस्ट- मुंबईतील वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून महापौर, शेरीफ, आमदार, हायकोर्ट न्यायमूर्ती आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या खासगी वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या प्रोटोकॉल स्टिकरच्या आदेशाला कायद्याचा कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट करून ती प्रथा बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बुधवारी राज्य सरकारला दिले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जे. एफ. रिबेलो यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूतीर् स्वतंत्रकुमार यांना पत्र लिहून या प्रकारकडे लक्ष वेधले होते. कोर्टाने या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले. न्या. जे. एन. पटेल व न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी झाली.
मुंबईचे महापौर, शेरिफ, आमदार, सचिव आदी व्यक्तींना त्यांच्या खासगी वाहनांवर लावण्यासाठी प्रोटोकॉल स्टिकर देण्याची प्रथा १९७९पासून सुरू आहे। तसेच २००५मध्ये राज्य सरकारने आदेश काढून त्याला नियमित केले होते. मुंबईतच ही प्रथा असून वाहतूक नियंत्रण विभागाच्या सहपोलिस आयुक्तांकडून हे स्टिकर देण्यात येतात. मात्र त्यांचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. तुमच्या या स्टिकर देण्याच्या आदेशाला कोणत्या कायद्याचा आधार आहे, असा सवाल यावेळी न्या. पटेल यांनी सरकारी वकील प्रदीप पाटील यांना केला असता तसा कोणताही आधार नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे कोर्टाने २००५चा आदेशच बेकायदा ठरवून तो रद्द केला.

बुधवार, 27 अगस्त 2008

विद्या देशमुख हत्या प्रकरणी महबूब खानला फाशी

औरंगाबाद, २७ ऑगस्ट- बहुचर्चित विद्या देशमुख खून प्रकरणी परभणी येथील न्यायालयाने मुख्य आरोपी महबूब खानला फाशीची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये परभणी येथील भाग्यनगर भागात ही घटना घडली होती.
१६ वर्षीय विद्यावर चाकूने हल्ला करत महबूब खान आणि त्याच्या साथीदाराने तिचा खून केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी महबूब खानला २००६ मध्ये हैदराबाद येथून अटक केली होती. या प्रकरणाचा निकाल काल लागला. यात न्यायालयाने महबुब खान याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा साथीदार असलेल्या वसीम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तब्बल २५ वर्षांनंतर परभणी न्यायालयाने एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली आहे. निकाल लागल्यानंतर विद्याचे वडील दत्ताराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मराठी पाट्या लावा, नाहीतर... - राज ठाकरे

मुंबई, २७ अगस्त- दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी दिलेली मुदत उद्या संपत असतानाच, बुधवारी पुन्हा एकदा "मनसे'चे प्रमुख राज ठाकरे यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले.
वांद्रयातील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात श्री. ठाकरे यांनी "एक दिवसाच्या आत मराठी पाट्या लावल्या नाहीतर, उद्या परिणामांबद्दल विचारू नका' असे सांगत व्यापाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
आंदोलन करून पोलिसांना त्रास देण्याची आपली इच्छा नाही. मराठीच्या नावाने आम्ही जे आंदोलन करीत आहोत ते कायद्याचा पालनासाठीच करीत आहोत. त्यामुळे आंदोलकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भाषणात त्यांनी १९६१ च्या कायद्याचाही उल्लेख केला. या कायद्यान्वये प्रत्येक राज्यातील दुकानांच्या पाट्या त्या राज्याच्या स्थानिक भाषेत असायला हव्यात. देशातील सर्व राज्यांमध्ये हा कायदा काटेकोरपणे पाळला जातो. पण येथील व्यापारी न्यायालयात जाण्याची भाषा करतात. हे काय चालू आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

"कस्टम'चे २२ अधिकारी बारबालांसमवेत पोलिसांच्या ताब्यात

खंडाळा, २७ ऑगस्ट- - खंडाळ्यातील प्रसिद्ध फरियाझ हॉटेलच्या मागे असलेल्या ताज कॉटेज या खासगी बंगल्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात सीमा शुल्क विभागाचे २२ अधिकारी, ११ बारबाला आणि इतर सहा जणांना ताब्यात घेतले. रात्री साडे अकराच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.
सीमाशुल्क विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। कान्हा ग्रामीण रुग्णालयात या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांना सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता त्यांना वडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ताब्यात घेतलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे पद-
- अजयकुमार षण्मुगम (वय ४४, रा. ठाणे) निरीक्षक - शंकरतन कृष्ण मुंडा (वय ५०, रा. भांडूप, मुंबई) अधीक्षक - विनयकुमार नाथ (वय ३९, रा. माटुंगा) निरीक्षक - अनुपम कोस्टा (वय ३९, रा. माटुंगा) निरीक्षक - महेश वसंत जाधव (वय ४५, रा. ठाणे) निरीक्षक - संतोष ऊर्फ गुरुचरण बाळकृष्णराव (वय ५०, रा. दादर) अधीक्षक - अन्वर इस्माईल खान (वय ५२, रा. अंधेरी) अधीक्षक - सबील करुणन (वय ४५, रा. ठाणे) निरीक्षक - भास्कर खंडू हांडे (वय ५२, रा. शिवडी) अधीक्षक - विमलकुमार गुलाबरॉय सोनेजा (वय ४२, रा. वाशी) निरीक्षक - चंद्रकांत मनसाराम मोरे (वय ५०, रा.कल्याण) निरीक्षक - नरेंद्रकुमार महिचंद रायपुरीया (वय ३१, रा. पवई) निरीक्षक - मॅथ्यू मामेन (वय ५४, रा. मुंबई) अधीक्षक - मनसूख रामचंद्र लिंगायत (वय ५६, रा. ठाणे) अधीक्षक - रविचंद्रन कलाईप्पा (वय ४२, रा. पवई) निरीक्षक - ओमनारायणन कृष्णमुरारी (वय ५०, रा. पवई) अधीक्षक - ओमप्रकाश रामानंद पांडे (वय ४५, रा. मुलुंड) अधीक्षक - शिवसिंग कमल यादव (वय ४७, रा. पवई) अधीक्षक - राजेश भाऊराव ढोणे (वय ४०, रा. माटुंगा) अधीक्षक - रमेशबाबू सूर्यनारायण वंगेती (वय ४४, रा. पवई) अधीक्षक - सतीश नारायण उच्छील (वय ५६, रा. बांद्रा) अधीक्षक - विजयकृष्णकुमार राघवन (वय ३६, रा. पवई) निरीक्षक

हिंदुच्‍या हत्‍येवर कॉंग्रेस शांत का?- बाळासाहेब

मुंबई, २७ ऑगस्ट-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ओरीसात नक्षलवाद्यांकडून स्वामी लक्ष्मणानंद यांच्‍या हत्येच्‍या घटनेची कडक शब्‍दात टिका केली असून ‘माओवाद हा मुस्‍लीम दहशतवादा इतकाच गंभीर असल्‍याची टिका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील संपादकीय लेखात ठाकरे यांनी म्‍हटले आहे, की 85 वर्षीय लक्ष्मणानंद ओरीसात ख्रिस्‍ती मिशन-यांकडून गरीब आदिवासींच्‍या धर्मांतरणास विरोध करीत असल्‍यामुळेच त्‍यांची हत्या केली गेली आहे.
ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षवादी असल्‍याचा दावा करणा-या कांग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि बहुजन समाज पार्टीच्‍या नेत्‍यांना लक्ष्‍य करताना टीका केली आहे, की ओरीसात लक्ष्मणानंद यांची हत्या केल्‍याच्‍या घटनेचा या पक्षांनी निषेध का केला नाही.

मंगलवार, 26 अगस्त 2008

प्रियांका चोप्राच्या माजी खासगी सचिवास अटक

मुंबई - बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा माजी सचिव प्रकाश जाजू याला मुंबई गुन्हे शाखेने आज (मंगळवार) मध्य प्रदेशात अटक केली आहे. प्रियांकाला धमकी तसेच अश्‍लिल एसएमएस पाठविण्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गेली दोन वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या जाजूला मध्य प्रदेशातील महू येथून अटक करण्यात आल्याचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) देवेन भारती यांनी सांगितले.
आर्थिक वादातून प्रियांकाने जाजूला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर जाजूने एसएमएसवरून प्रियांकाला धमकी तसेच अश्‍लिल एसए मएस पाठविण्यास सुरूवात केली होती. प्रियांकाने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.

डाऊ'ला विरोधासाठी साताऱ्यात "रास्ता रोको'

सातारा - शिंदे (ता। खेड), २६ ऑगस्ट- येथील डाऊ केमिकल कंपनीला विरोध करण्यासाठी पुणे- बंगळूर महामार्गावर वाडे फाट्यावर वारकऱ्यांनी मंगळवारी रस्ता सुमारे अर्धातास अडवून धरला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.
व्यसनमुक्त युवक संघ व जिल्हा वारकरी संघ यांच्या वतीने "डाऊ' कंपनीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन झाले. दुपारी बाराच्या सुमारास सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्ते वाडे फाटा येथे जमा झाले. महामार्गावरील वाहतूक त्यांनी रोखून धरली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

कोसी नदीने प्रवाह बदलला, बिहारमध्ये लाखो लोक बेघर

पाटणा, २६ ऑगस्ट- कोसी नदीने प्रवाह बदलल्यामुळे आलेल्या पुरामुळे विहारमध्ये हाहाकार उडाला आहे. या पुरामध्ये ४२ जणांचा बळी गेला आहे. हा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्‍यता आहे.
नेपाळमधील कुसाहा गावाजवळ कोसीने आपला प्रवाह बदलला. त्यामुळे बारा लाख लोक जुन्या आणि नव्या प्रवाहांच्यामध्ये अडकले आहेत.
या पुराचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. मधेपूरा आणि सुपौल जिल्हे तर नकाशावरुन पुसले जाण्याची शक्‍यता आहे. या जिल्ह्यातील १० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी कठीहार, सहारसा. पूर्णिया आणि आरारीया जिल्ह्यांमधील स्थितीही गंभीर आहे.
ही नेहमीची पूरस्थिती नसल्याने मदतकार्य करणेही अवघड झाले आहे.
अधिकाधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविणे हेच आमचे सध्याचे उद्दिष्ट असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.

सोमवार, 25 अगस्त 2008

ममतांच्या आंदोलनाने नॅनो अडचणीत

कोलकाता, २५ ऑगस्ट-सिंगुरमधील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर नॅनो राज्या बाहेर हालवण्याचा आपला इरादा टाटा उद्योग समूहाने व्यक्त केल्याचा कोणताही परिणाम तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांच्या सत्याग्रह आंदोलनावर झाला नसून, त्यांच्या बेमुदत आंदोलनाने आता नॅनोच्या उत्पादनाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नॅनो प्रकल्पा बाहेर ममतांनी आपले आंदोलन सुरू केले असून, त्यांना आता समाजवादी पार्टी आणि नर्मदा बचाव नेत्या मेधा पाटकर यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
टाटांनी नॅनोसाठी जी जमीन घेतली आहे, त्यातील ४०० एकर जमीन परत करण्याची प्रमुख मागणी ममतांची आहे.
टाटांनी या प्रकल्पासाठी १५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. परंतु सिंगुरमध्ये त्यांच्या या प्रकल्पाला विरोध होत असल्याने आणि शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक उग्र होत असल्याने हा प्रकल्प बाहेर नेण्याचा प्रयत्न टाटांनी सुरू केला आहे.

मारूलकरांच्या स्मृत्यर्थ कंठसंगीतासाठी सुवर्णपदक

पुणे, २५ ऑगस्ट- प्रसिद्ध संगीत समीक्षक दत्ता मारूलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात कंठसंगीतात एम. ए. संगीत (फायनल) या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला "मारुलकर सुवर्णपदक' देण्यात येणार आहे.
मारूलकर यांच्या पत्नी सुलोचना मारूलकर यांनी त्यासाठी पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे नुकताच एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हे सुवर्णपदक २००९ या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येईल, असे ललित कला केंद्राच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांनी सांगितले.

जयपूर बॉम्बस्फोटातील संशयिताला उत्तर प्रदेशात अटक

लखनौ - जयपूर शहरात १३ मे रोजी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांसंदर्भात शाहबाज हुसैन या संशयित अतिरेक्‍याला राजस्थान पोलिसांनी सोमवारी अटक केली.
उत्तर प्रदेशातील मौलवीगंज येथून त्याला ताब्यात घेतले. तेथील पोलिसांच्या सहकार्याने राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली.
अहमदाबाद येथे २६ जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अबू बशर याच्याशी हुसैन याचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. अबू बशर याला १५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते.
या अटकेमुळे राजस्थान बॉम्बस्फोटाच्या तपासाला आणखी वेग मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.

"बीसीएनएल'च्या "थ्री जी' सेवेला पुण्यात प्रारंभ

पुणे, २५ ऑगस्ट - व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्सिग, ऑनलाइन गेमिंग आणि वेगवान इंटरनेट सेवा यासाठी आवश्‍यक असलेल्या "थ्री जी' सेवेचा प्रारंभ भारत संचार निगम लिमिटेडच्या महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य व्यवस्थापक चंद्रप्रकाश यांच्या हस्ते सोमवारी झाला.
"बीएसएनएल'चा "प्लॅन ७२५' निवडलेल्या पुण्यातील दोन हजार ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. शहरातील दहा टॉवरच्या कार्यक्षेत्रात दोन किलोमीटरच्या अंतरातील ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. राज्यातील ५६ शहरात ही सेवा मिळणार आहे.
"थ्री जी' सेवेचा देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे चंद्रप्रकाश यांनी यावेळी सांगितले.

काश्‍मिरात तणावाची स्थिती; यासिन मलिक यांना अटक

श्रीनगर, २५ ऑगस्ट - अमरनाथ ट्रस्टला वनजमीन देण्याच्या मुद्‌द्‌यावरून जम्मू- काश्‍मीरमध्ये निर्माण झालेली तणावाची स्थिती निवळण्याची चिन्हे नाहीत. सोमवारच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी फुटीरतावादी गटाचे नेते यासिन मलिक यांना अटक केली.
जमात-ए-इस्लामिया संघटनेचे नेते सयद अली शाह गिलानी आणि हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूक यांना रविवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्यातील दहा जिल्ह्यांत अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही शक्तिप्रदर्शनासाठी लाल चौकाकडे मोर्चा काढण्याच्या निर्धारावर फुटीरतावादी गटाचे कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
सुरक्षिततेसाठी पोलिसांबरोबर निम-लष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

कुख्यात बंटी पोलिस चकमकीत ठार

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट - दिल्लीसह उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या बंटी टोळीचा म्होरक्‍या बंटी सोमवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस बंटीचा शोध घेत होते. त्याच्यावर खुनासह इतर अनेक गुन्हे दाखल होते.
दक्षिण दिल्लीतील बदरपूर भागात एका इमारतीत बंटी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास या इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी बंटी आणि त्याचा साथीदार राजेश तिथे होते. या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बंटी आणि राजेश ठार झाले. चकमकीत तीन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

राणे-मनसेचा 'प्रसिद्धी'काला

मुंबई, २५ ऑगस्ट-सत्तेच्या हंडीतले लोणी मटकावण्यासाठी राजकारण्यांनाही डावपेचांचे थरावर थर लावावे लागतात, पण लक्ष्य साधण्यासाठी अचूक नेमही हवा. गेल्या काही वर्षांत दहिकाला उत्सवाचा नेम राजकारणी नेमका साधत आहेत. हा 'प्रसिद्धीचा उत्सव' साजरा करण्यासाठी नेत्यानेत्यांमधील चुरस कमालीची वाढू लागली आहे.
रविवारी या लढाईत महसूल मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांचे शहरात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपनगरांत वर्चस्व पहायला मिळाले. यंदा उत्सव मंडळांना राणे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बंड्या वाटल्या. राणेंचा फोटो आणि त्याखाली 'स्वाभिमानी नेता' असे लिहिलेल्या बंड्या घातलेली अनेक गोविंदा पथके शहरात फिरत होती. तर, राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्या शुभेच्छा देणारी होल्डिंग खूप ठिकाणी लावलेली होती. उपनगरांत मात्र गोविंदा पथकांच्या बंड्यांवर मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे यांचे नाव झळकत होते.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे या सर्वच राजकीय पक्षांनी उत्सव मंडळांना लाखोंची बक्षिसे जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन अहिर यांच्या 'संकल्प प्रतिष्ठान'च्या वतीने वरळीत दहीहंडी उत्सवाने मोठी गदीर् खेचली. तर, धारावीत शिवसेनेचे उपविभागप्रमुख मुथ्थू थेवर, मनोहर रायबागे यांनी उभारलेली एक लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी वडाळा येथील 'श्री साई सोशल ग्रुप'च्या गोविंदांनी फोडली. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची झुंबड उडाली होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी हजेरी लावली होती. लालबाग येथे आमदार दगडू सकपाळ यांनी उभारलेली ५१ हजार रुपयांची हंडी रात्री उशिरापर्यंत फुटली नव्हती. मात्र, ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १४० गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात झाल्याने गोविंदा खूष होते. मनसेच्या वतीने चेंबूरमध्ये ११ लाख ११ हजार रुपयांची हंडी उभारण्यात आली होती. शिवसेना भवनसमोर भारतीय विद्याथीर् सेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १ लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी अनेकांचे आकर्षण ठरली होती. बघ्यांच्या गदीर्मुळे ट्रॅफिक जॅम झाले होते.

रविवार, 24 अगस्त 2008

नगरसेवकासह पाच जणांना अटक

नवी मुंबई, २४ ऑगस्ट-अनधिकृत झोपड्या तोडल्यामुळे ऐरोली येथे दोन गटांत उसळलेल्या दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ठाकूर यांच्यासह दोन्ही गटांतील पाच जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.

दिघा परिसरातील न्यू गणेश नगर वस्तीमध्ये मोकळ्या असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडावर तेथेच राहणाऱ्या बापू धांडेने झोपड्या बांधल्या होत्या. ही बाब स्थानिक नगरसेवक गणेश ठाकूर यांना समजल्यावर त्यांच्या समर्थकांनी या झोपड्या जमीनदोस्त केल्या. त्यामुळे संतापलेल्या बापू धांडेची मुले राजेंद व गोविंद यांनी नगरसेवक ठाकूर यांचा सुपरवायझर नागेश नाईक याला बेदम मारहाण केली.

मुंबईत दहीहंडी फोडताना ५९ गोविंदा जखमी

मुंबई, २४ ऑगस्ट- राज्यभर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, मुख्य आकर्षण असलेल्या मुंबईत दडीहंडी फोडताना विविध ठिकाणी झालेल्या घटनांत ५९ गोविंदा जखमी झाले आहेत.
त्यातील ४७ जणांना केईएम रूग्णालयात, पाच जणांना नायर रूग्णालयात तर सात जणांना लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेटे यांचे केतकरांना आव्हान

मुंबई, २४ ऑगस्ट- ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यावरील हल्ल्याचे आपण कधीच समर्थन केले नाही, मात्र असे हल्ले करण्याची पाळी का येते, याचाही विचार झाला पाहिजे, असे सांगत 'छत्रपतींचा अवमान केला नसल्याचे केतकर यांनी सिद्ध करून दाखवावे', असे आव्हान शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी शनिवारी दिले. तसेच, शिवस्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून स्मारकाचे काम पावसाळा संपताक्षणी सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
' पत्रकारांवर यापूवीर् शिवसेनेने, आरपीआय तसेच नारायण राणे यांच्या कार्यर्कत्यांनीही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे, राणे किंवा आरपीआयच्या नेत्यांवर कधीही गुन्हा नोंदवला गेला नाही. माझ्यावर मात्र गुन्हा नोंदवण्यात आला. आमच्याच पक्षाचे राज्य असताना कसलीही शहानिशा न होता अशा प्रकारे गुन्हा नोंदवला जाणे हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निष्पक्षपातीपणाचा पुरावा आहे', असा टोलाही त्यांनी हाणला.
पवार काय भूमिका घेतात, यानुसार आपण आपल्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी शिवसेनाप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आरोप करणाऱ्या नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. मग केतकर हल्ल्याप्रकरणी आपल्याविरोधात बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद आव्हाड यांचे नाव न घेता केला.

इंडियन मुजाहिदीन'चा धमकीचा मेल, गुजरात आणि महाराष्ट्र "हिट लिस्ट'वर

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट-गुजरातमधील बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारलेल्या "इंडियन मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आणखी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.
वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना रविवारी मुजाहिदीनने हा धमकीचा मेल पाठविला आहे.
या मेलमध्ये "सिमी' च्या कार्यकर्त्यांच्या आणि इतर दहशतवाद्यांच्या कृत्यांचे समर्थन केले आहे.
या मेलमध्ये अहमदाबाद स्फोटामध्ये वापरलेल्या कारची छायाचित्रेही आहेत.
यापूर्वी गुजरातमध्ये स्फोट घडवून आणण्यापूर्वी पाठविलेल्या मेलमध्ये त्यांनी पाच स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.

शनिवार, 23 अगस्त 2008

निरुपम ‘बिग बॉस’ बाहेर

मुंबई, २३ ऑगस्ट-' बिग बॉस ' सारख्या कार्यक्रमात भाग घेण्याची रिस्क घेणारा , मी देशातील पहिला राजकारणी आहे , अशी बढाई मारणारे काँग्रेसचे नेते संजय निरुपम बिग बॉस मधून ‘ आऊट ’ झाले आहेत. या शो मधून आपल्याला बाद करण्यात यावे , अशी विनंती आपणच सहभागी स्पर्धकांना केल्याचे निरुपम यांनी सांगितले.
बिग बॉस मधून निरुपम यांचे बाहेर जाणे हे प्रिप्लॅन होते. त्यांना आपल्या पाच लाखांच्या दहीहंडीचे वेध लागले होते. बिग बॉसमध्ये राजकारण्याबद्दलचे भारतीयांचे मत बदलण्यासाठी आलेल्या निरुपम यांनी बढाई मारली. पण , १४ स्पर्धेकांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश आले. मग काय आपल्याला शोमधून काढून टाकावे म्हणून मुद्दाम प्रयत्न केल्याची सारवासारव ते करताना दिसत आहेत. हे सांगणे विसंगत असून कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा त्यातला प्रकार असल्याचे बोललं जातेय.
खरं तर तीन महिने या शोसाठी वेळ देणे आपल्यासारख्या राजकारण्याला शक्य नाही. जास्तीत-जास्त एक आठवडा शक्य असतो तो वेळ मी दिला. पण या स्पर्धेत भाग घेणा-या अनोळख्या माणसांशी ओळख झाली , तो अनुभव राजकारणात फायद्याचा ठरेल , असे त्यांनी सांगितले.

दौंड रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगार फरार

दौंड, २३ ऑगस्ट- येथील रेल्वेस्थानकावरून कुख्यात गुन्हेगार अंकुश ऊर्फ अंक्‍या वसंत काळे हा काल रात्री पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला.
न्यायालयीन कामकाजासाठी त्याला येरवडा कारागृहात नेले होते. तेथून त्याला दौंड स्थानकावर आणण्यात आले. त्याच्यावर खून, दरोडे, जबरी चोरी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. नगर जिल्ह्यातील पोलिस शिपाई अंकुश धावडे याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे.
दौंड पोलिस, दौंड लोहमार्ग पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने परिसराची नाकेबंदी केली असून, शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अजितसिंहांनी सोडली मायावतीची सोबत

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट- मायावतींच्‍या राजकीय डावपेचांनी हताश झालेल्‍या राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांनी कॉंग्रेस आणि भाजप दोघांसोबत पुन्‍हा चर्चा सूरू केली असून लवकरच ते मायावतींची सोबत सोडण्‍याची शक्‍यता आहे.
भाजप अजितसिंग यांच्‍या सोबत निवडणुकीत आघाडी करण्‍यासाठी उत्सुक आहे. तर कॉंग्रेसने आपल्‍याला अशी गरज नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.
विश्वासमत ठरावाच्‍या वेळी संपुआच्‍या विजयानंतर बसपामध्‍ये गेलेल्‍या अजितसिंह यांच्‍या जवळच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार अजितसिंह यांना मायावतींची कार्यपध्‍दती आवडत नसून ते नाराज आहेत.
९ ऑगस्‍टला लखनऊमध्‍ये झालेल्‍या रॅलीत मायावतीने 'एकला चलो' संदेश दिला. तेव्‍हा पासून अजितसिंह नवीन आघाडीच्‍या शोधात आहेत. भाजपाच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हे रालोद सोबत आघाडी करण्‍यास अनुकूल आहेत.
भाजप अजितसिंह यांच्‍या मागणी नुसार त्‍यांना लोकसभेच्‍या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये दहा जागा सोडण्‍यास तयार आहे. असे असले तरीही अजितसिंग भाजपसोबत गेल्‍यास पक्षात बंडाळी माजण्‍याची शक्‍यता आहे त्‍यामुळे अजितसिंग कॉंग्रेससोबत चर्चा करीत आहेत.

काश्‍मिर अशांतच, पुन्हा तीन दिवस "बंद'

श्रीनगर, २३ ऑगस्ट- (पीटीआय) : जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी शुक्रवारी ईदगाह मैदानावर मोठा मेळावा घेऊन शनिवारपासून पुन्हा खोऱ्यात तीन दिवसांचा "बंद' पुकारला आहे.
काश्‍मीर मुद्द्यावरून भारत, पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील नागरिकांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
""पुढील तीन दिवस काश्‍मीरमध्ये पूर्ण "बंद' पाळण्यात येईल. शांततापूर्ण मार्गाने आम्ही निषेध करू,'' असे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारुक यांनी सांगितले.
ईदगाह मैदानात फुटीरतावाद्यांचा जो मोठा मेळावा झाला त्यात हजारो लोकांनी हिरवे आणि काळे झेंडे दाखवले.
सोमवारी श्रीनगरच्या मुख्य लाल चौकात समितीतर्फे ठिय्या आंदोलनही केले जाणार आहे.

राणे आणि काँग्रेस; दोघेही कोंडीत!

मुंबई, २३ ऑगस्ट-महसूलमंत्री नारायण राणे दिल्लीला बोलाविल्याशिवाय जाण्यास तयार नाहीत आणि पक्षश्रेष्ठीही दिलेला राजीनामा स्वीकारला हे सांगायला तयार नाहीत, त्यामुळे राणे आणि काँग्रेस हे दोघेही कोंडीत सापडले असून यातून कसे बाहेर पडायचे असा पेच दोघांना सतावत असल्याचे समजते.
पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राणे यांनी स्वत:हून पक्षश्रेष्ठींना भेटायला जावे, असा आग्रह काही काँग्रेस नेते करीत आहेत तर चीनच्या दौ-यावर जाण्यापूर्वीच आपण सोनिया गांधी यांची भेट मागितली होती, त्यामुळे पुन्हा भेट कशी मागणार, असा पवित्रा राणे यांनी घेतला आहे. तशात राणे यांचा राजीनामा स्वीकारला तर ते कालांतराने पक्षातूनही बाहेर जातील व त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, असे काही मंत्र्यांनी प्रत्यक्ष श्रीमती गांधी यांची भेट घेऊन सांगितल्याचे कळते. त्यामुळे राणे यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही, पण त्यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठविला तर तो स्वीकारायचा असा निर्णय काँग्रेसने केला आहे.
पण आपण एकदा राजीनामा दिलेला असल्याने तो स्वीकारला अथवा फेटाळला यापैकी काहीही स्पष्ट होत नसल्याने आता राणे केवळ दिल्लीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. राजीनामा स्वीकारला असे सांगितले तर राणे हे दुस-या क्षणी मुख्यमंत्री अथवा राज्यपाल यांच्याकडे राजीनामा पाठवून देतील, असेही त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
राणे आणि काँग्रेस या दोघांची कोंडी झालेली असताना मध्येच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल हे त्यांना भेटून गेल्याने तसेच राणे यांनी काँग्रेस सोडली तर त्यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी अनेकजण प्रयत्नाला लागल्याने काँगेसमध्ये काहीशी चलबिचल सुरू झाल्याचे कळते. राणे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरु झालेला पेचप्रसंग सुटला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत, असे संकेत देण्यासाठीच पटेल हे राणे यांना भेटले असावेत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राणे यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यासाठी काँग्रेसच्या दोघा खासदारांनी त्यांची भेट घेतली. पाठोपाठ रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवलेही त्यांना भेटून गेले. शुक्रवारी दुपारी उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी राणे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते. याबद्दल चव्हाण यांच्याकडे विचारणा करता महसूल खात्याशी संबंधित नांदेड जिल्ह्यातील काही प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेतली होती, असे ते म्हणाले.
तहसीलदारांच्या काही जागा रिकाम्या असून दुष्काळी स्थिती असल्याने त्या लवकर भराव्यात, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतली 'व्यावसायिक' दहीहंडी

मुंबई, २३ ऑगस्ट- गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.
''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात। मुंबईत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चाळीत गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. त्याकाळी गोपाळकाला मोठा उत्सव मानला जायचा. तेव्हा मात्र आतासारखी व्यावसायिकता त्यात नव्हती. दोन चाळीमध्ये दोरखंडाच्या आधारे दहीहंडी बांधली जायची. आंब्याची पाने, फुले, फळे व रूपये त्या दोरीला बांधले जायचे. दहीहंडीच्या जवळ हंडी फोडण्यासाठी नारळ बांधले जायचे. हंडी फोडण्यासाठी दोन पथकांमध्ये जोरदार स्पर्धा चालायची.
पण आता हा सण राजकारण्यांच्या ताब्यात गेला आहे। त्यात अनेक गुडांनीही स्वतःला 'सोवळे' करून घेण्याची संधी साधली आहे. अनेक 'भाई' लोकांनी आपली स्वत:ची दहीहंडी, गणपती, नवदुर्गा मंडळे स्थापन करून त्या माध्यमातून लाखो रूपयांची देणगी उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे सामाजिक उत्सवातून व्यावसायिकता डोकावताना दिसत आहे. त्यातून उद्‍भवणारे वादविवाद आणि त्याला होणारा राजकारणाचा स्पर्श यामुळे हा सणही त्यात माखला गेला आहे. राजकारणी लोक अशा सामजिक महोत्सवाला भल्या मोठ्या देणग्या देवून आपल्या पक्षाची व नावाची प्रसिध्दी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईल्या चाळींची जागा गगनचुंबी अपार्टमेंटने घेतल्याने उंचच उंच दहीहंडी बांधल्या जातात. त्यांच्यावर ठेवण्यात आलेली बक्षिसेही लाखोंच्या घरात जाणारी आहेत. मुंबईतच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिध्द मिळू लागली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईत १० पेक्षा जास्त दहीहंड्यांना २० ते २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुरूषांच्याच बरोबरीने महिलांची पथकेही सहभागी होणार आहेत. दंहीहंडी फोडण्याच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यजमान मंडळाच्या वतीने गोविंदाचा विमा तसेच जागेवर प्राथमिक उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. गोकुळाष्टमीच्या तीन महीने अगोदरच दहीहंडी फोडणार्‍या पथकांचा सराव सुरू होतो. सराव करतानाही काही जर जखमी होतात. मुंबईतील दहिहंडीकडे देशातीलच नाही तर विदेशातील मीडीयाचेही लक्ष लागलेले असते.