पाटणा, २६ ऑगस्ट- कोसी नदीने प्रवाह बदलल्यामुळे आलेल्या पुरामुळे विहारमध्ये हाहाकार उडाला आहे. या पुरामध्ये ४२ जणांचा बळी गेला आहे. हा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.
नेपाळमधील कुसाहा गावाजवळ कोसीने आपला प्रवाह बदलला. त्यामुळे बारा लाख लोक जुन्या आणि नव्या प्रवाहांच्यामध्ये अडकले आहेत.
या पुराचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. मधेपूरा आणि सुपौल जिल्हे तर नकाशावरुन पुसले जाण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील १० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी कठीहार, सहारसा. पूर्णिया आणि आरारीया जिल्ह्यांमधील स्थितीही गंभीर आहे.
ही नेहमीची पूरस्थिती नसल्याने मदतकार्य करणेही अवघड झाले आहे.
अधिकाधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविणे हेच आमचे सध्याचे उद्दिष्ट असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें