मुंबई, २३ ऑगस्ट-' बिग बॉस ' सारख्या कार्यक्रमात भाग घेण्याची रिस्क घेणारा , मी देशातील पहिला राजकारणी आहे , अशी बढाई मारणारे काँग्रेसचे नेते संजय निरुपम बिग बॉस मधून ‘ आऊट ’ झाले आहेत. या शो मधून आपल्याला बाद करण्यात यावे , अशी विनंती आपणच सहभागी स्पर्धकांना केल्याचे निरुपम यांनी सांगितले.बिग बॉस मधून निरुपम यांचे बाहेर जाणे हे प्रिप्लॅन होते. त्यांना आपल्या पाच लाखांच्या दहीहंडीचे वेध लागले होते. बिग बॉसमध्ये राजकारण्याबद्दलचे भारतीयांचे मत बदलण्यासाठी आलेल्या निरुपम यांनी बढाई मारली. पण , १४ स्पर्धेकांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश आले. मग काय आपल्याला शोमधून काढून टाकावे म्हणून मुद्दाम प्रयत्न केल्याची सारवासारव ते करताना दिसत आहेत. हे सांगणे विसंगत असून कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा त्यातला प्रकार असल्याचे बोललं जातेय.
खरं तर तीन महिने या शोसाठी वेळ देणे आपल्यासारख्या राजकारण्याला शक्य नाही. जास्तीत-जास्त एक आठवडा शक्य असतो तो वेळ मी दिला. पण या स्पर्धेत भाग घेणा-या अनोळख्या माणसांशी ओळख झाली , तो अनुभव राजकारणात फायद्याचा ठरेल , असे त्यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें