मुंबई - बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा माजी सचिव प्रकाश जाजू याला मुंबई गुन्हे शाखेने आज (मंगळवार) मध्य प्रदेशात अटक केली आहे. प्रियांकाला धमकी तसेच अश्लिल एसएमएस पाठविण्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गेली दोन वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या जाजूला मध्य प्रदेशातील महू येथून अटक करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) देवेन भारती यांनी सांगितले.
आर्थिक वादातून प्रियांकाने जाजूला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर जाजूने एसएमएसवरून प्रियांकाला धमकी तसेच अश्लिल एसए मएस पाठविण्यास सुरूवात केली होती. प्रियांकाने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें