मुंबई, २२ सप्टेम्बर-राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, बंगळुरूत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकिर मुंबई परिसरातच असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाल्यानं मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. गुजरात आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीनं त्यांनी जोरदार शोधमोहीम हाती घेतलेय.गेल्या शनिवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर, पोलिसांनी तौकिरच्या शोधासाठी जंग जंग पछाडलंय. तोच या स्फोटांचा मास्टरमाइंड असल्याचं समजतं. त्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत पोलिसांना हवाय. परंतु, त्याचा काहीच ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही. दिल्ली स्फोट प्रकरणी, एन्काउंटर झाल्यानंतर, ब-याच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण त्यांच्याकडूनही तौकिरबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
असं असतानाच, तौकिर मुंबईजवळ असल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली असून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तौकिरसोबत आणखी दोघं असू शकतात. सागरी मार्गानं ते पळून जाण्याची शक्यता असल्यानं समुद्रकिना-यांवर नाकाबंदी करण्यात आलेय. मुंबई, दिल्ली आणि गुजरात पोलिस तौकिरला अटक करू शकले, तर सगळ्याच बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा होणार आहे. ते खूप मोठं यश असेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें