नवी दिल्ली, २३ ऑगस्ट- मायावतींच्या राजकीय डावपेचांनी हताश झालेल्या राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांनी कॉंग्रेस आणि भाजप दोघांसोबत पुन्हा चर्चा सूरू केली असून लवकरच ते मायावतींची सोबत सोडण्याची शक्यता आहे.भाजप अजितसिंग यांच्या सोबत निवडणुकीत आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे. तर कॉंग्रेसने आपल्याला अशी गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विश्वासमत ठरावाच्या वेळी संपुआच्या विजयानंतर बसपामध्ये गेलेल्या अजितसिंह यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितसिंह यांना मायावतींची कार्यपध्दती आवडत नसून ते नाराज आहेत.
९ ऑगस्टला लखनऊमध्ये झालेल्या रॅलीत मायावतीने 'एकला चलो' संदेश दिला. तेव्हा पासून अजितसिंह नवीन आघाडीच्या शोधात आहेत. भाजपाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हे रालोद सोबत आघाडी करण्यास अनुकूल आहेत.
भाजप अजितसिंह यांच्या मागणी नुसार त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये दहा जागा सोडण्यास तयार आहे. असे असले तरीही अजितसिंग भाजपसोबत गेल्यास पक्षात बंडाळी माजण्याची शक्यता आहे त्यामुळे अजितसिंग कॉंग्रेससोबत चर्चा करीत आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें