नाशिक, ३१ अगस्त- चांदवड तालुक्यातील शिंडे येथे वीज पडून पाच महिला जखमी झाल्या आहेत. येथील तुकाराम मंदिराच्या आडोस्याला या महिला उभ्या असताना वीज कोसळली. रविवारी दुपारी ही घटना घडली.
गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला नाशिकच्या रूग्णालयात तर अन्य ४ महिलांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे।
जखमी महिलांची नावे अशी, राधाबाई बाजीराव बरडे, सुनिता मनोहर गोधडे, कमल रंगनाथ शिंदे, कल्याबाई नारायण पवार आणि अंजनाबाई राजाराम गोधडे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें