मुंबई, २७ अगस्त- दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी दिलेली मुदत उद्या संपत असतानाच, बुधवारी पुन्हा एकदा "मनसे'चे प्रमुख राज ठाकरे यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले.
वांद्रयातील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात श्री. ठाकरे यांनी "एक दिवसाच्या आत मराठी पाट्या लावल्या नाहीतर, उद्या परिणामांबद्दल विचारू नका' असे सांगत व्यापाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
आंदोलन करून पोलिसांना त्रास देण्याची आपली इच्छा नाही. मराठीच्या नावाने आम्ही जे आंदोलन करीत आहोत ते कायद्याचा पालनासाठीच करीत आहोत. त्यामुळे आंदोलकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भाषणात त्यांनी १९६१ च्या कायद्याचाही उल्लेख केला. या कायद्यान्वये प्रत्येक राज्यातील दुकानांच्या पाट्या त्या राज्याच्या स्थानिक भाषेत असायला हव्यात. देशातील सर्व राज्यांमध्ये हा कायदा काटेकोरपणे पाळला जातो. पण येथील व्यापारी न्यायालयात जाण्याची भाषा करतात. हे काय चालू आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें