दौंड, २३ ऑगस्ट- येथील रेल्वेस्थानकावरून कुख्यात गुन्हेगार अंकुश ऊर्फ अंक्या वसंत काळे हा काल रात्री पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला.
न्यायालयीन कामकाजासाठी त्याला येरवडा कारागृहात नेले होते. तेथून त्याला दौंड स्थानकावर आणण्यात आले. त्याच्यावर खून, दरोडे, जबरी चोरी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. नगर जिल्ह्यातील पोलिस शिपाई अंकुश धावडे याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे.
दौंड पोलिस, दौंड लोहमार्ग पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने परिसराची नाकेबंदी केली असून, शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें