पुणे, १ सप्टेम्बर - पुणे फेस्टिव्हलचे यंदा पाच सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे। राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती खासदार सुरेश कलमाडी यांनी दिली.
यंदाच्या वर्षी ज्येष्ठ सिने कलावंत निळू फुले, रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिरासदार आणि नुकत्याच झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या साईना नेहवाल यांना "पुणे फेस्टिव्हल पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. कविसंमेलनात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल।
यंदाही उद्घाटन सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें