अगरतळा, १ अक्टोबर-त्रीपुराची राजधानी अगरतळा शहरातील पाच गजबजलेल्या भागात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झालेल्या ५ स्फोटात २ जण ठार सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. कमी तीव्रतेच्या या स्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगरतळा शहरातील गुडबाजार, राधानगर बसस्थानक, एम.जी.बाजार व जी.बी.हॉस्पिटल परिसरात स्फोट झाला. दिल्लीत झालेल्या स्फोटांशी या स्फोटांचे साम्य असून गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट घडवून आणण्यात आला आहे. बसस्थानक परिसरात 2, उद्यान, बाजार व रुग्णालयाच्या परिसरात १ स्फोट झाला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें