नवी दिल्ली, २५ ऑगस्ट - दिल्लीसह उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या बंटी टोळीचा म्होरक्या बंटी सोमवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस बंटीचा शोध घेत होते. त्याच्यावर खुनासह इतर अनेक गुन्हे दाखल होते.
दक्षिण दिल्लीतील बदरपूर भागात एका इमारतीत बंटी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास या इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी बंटी आणि त्याचा साथीदार राजेश तिथे होते. या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बंटी आणि राजेश ठार झाले. चकमकीत तीन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें