नवी दिल्ली, ६ सप्टेम्बर-गेले काही दिवस राजकीय पक्षांचे लक्ष असलेल्या दिल्ली विद्यापीठ विद्याथीर् संघाच्या निवडणुकीचे मतदान शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पार पडले. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १० उमेदवार मैदानात होते. मात्र खरी स्पर्धा एनएसयूआयची सोनिया सप्रा आणि अभाविपची नुपूर शर्मा या दोन विद्याथिर्नींमध्येच असल्याचे स्पष्टपणे जाणवले. निकाल शनिवारी जाहीर होणार आहे.राजधानीतील ५१ महाविद्यालयांच्या सुमारे ८० हजार विद्याथीर् या निवडणुकीशी संबंधित आहेत.
यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजपच्यादृष्टीने देखील अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशा चार प्रमुख जागांसाठी एकूण ३० उमेदवार मैदानात आहेत.
लागोपाठ ५ वषेर् तिरंगा फडकवणाऱ्या एनएसयूआयला यंदाही विजयश्ाी कायम राखायची आहे, तर अभाविपला पुन्हा भगवा फडकवण्याची आकांक्षा आहे. जेएनयुच्या धतीर्वर प्रेसिडेन्शिअल डिबेटचा प्रयत्नही यंदा विद्यापीठात झाला तथापि प्रमुख उमेदवारांचा त्यात सहभाग नसल्याने अपूर्व गोंधळात अवघ्या १५ मिनिटांत हा प्रयोग आटोपता घ्यावा लागला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें