सोमवार, 14 जुलाई 2008

न्यूझीलँडमध्ये बत्तीस भारतीय तीर्थयात्री बेपत्ता

वर्ल्ड युथ डे सोहळ्यात पोप यांना बघण्यासाठी सिडनीस निघालेले बत्तीस भारतीय तीर्थयात्री न्यूझीलँड येथे थांब्यादरम्यान बेपत्ता झाले आहेत. भारतातील एक महिन्याचा व्हिसा देण्यात आलेल्या दोनशे वीस तीर्थयात्रीच्या समूहातील हे बत्तीस जण होत.
ऑकलंड येथील कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना उद्या ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असल्याचे सांगितले. मागील चार किंवा पाच वर्षात भारतीय पुष्कळदा बेपत्ता झाले आहेत.
त्यांचा व्हिसा ग्राह्य असला तरी सर्व तिर्थयात्रींनी योजनेनुसार न्यूझीलँड सोडावे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। कायद्याच्या दृष्टीने हे बेकायदेशीर नाही मात्र, हे कृत्य खूपच सर्वसाधारण व निराशाजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पोप बेनेडीक्ट वर्ल्ड युथ डे कार्यक्रमास गुरूवारी उपस्थिती दर्शवतील. कार्यक्रमात जगभरातून दोन लाख जण सहभागी होतील. सिडनी ऑलिंपिकनंतर येथील सर्वात मोठा सार्वजनिक कार्यक्रम ठरणार आहे.

कोई टिप्पणी नहीं: