सोमवार, 14 जुलाई 2008

वसईत भर दिवसा पंधरा लाखांची लूट

वसई, दि.१५ : भर दिवसा ९.३० च्या सुमारास माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील "एव्हरशाईन सिटी' संकुलच्या नाक्यावर वालिव येथील अशोक ऑटोमोबाइल पेट्रोल पंपाची रोख रक्कम घेऊन योणाऱ्या वाहनात शिरून कॅशियरवर हल्ला करीत १५ लाख रूपयांची लूट करण्यात आली. भरदिवसा घडलेल्या या लुटमारीने वाहन चालकांत घबराट पसरली आहे.
भाईंदरच्या मुर्धा व नालासोपाऱ्यातील धानिव येथील दरोड्यांची हवा थंड होते न होते. तोच भरदिवसा दरोड्यांची वर्दळ असलेल्या वसई पूर्वेकडील रेज ऑफिस ते एव्हरशाईन सिटी या रस्त्यावर पंधरा लाखांची लुटमार करीत चोरांनी माणिकपूर पोलिसांना आव्हान दिले आहे. वालिव येथील अशोक ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावरून वाहन क्र. एम एच ०४ बी जी ४९०० ही लाल रंगाची गाडी पंपावर जमा झालेली पंधरा लाख रूपयांची रोकड बॅकेत जमा करण्यासाठी घेऊन जात होती। गाडीत ड्रायव्हर व कॅशियर या व्यक्तिरिक्त कोणीही नसल्यासने गाडी एव्हरशाईन सिटी नाका येथे आली असता खराब रस्त्यामुळे वाहनाचा वेग कमी झाल्यावर अचानक एक व्यक्ती गाडीत घुसून कॅशियर विष्णुकुमार शर्मा याच्या डोक्यात हातोडा मारला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुहे ड्रायव्हर हरबंस सिंग शाम सिंग गुज्जर याने गाडी थांबविली असता कॅशियर कडील पंधरा लाख रूपये असलेली बॅग घेऊन चोर पसार झाल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. घटनेचे गांभिर्य ओळखून अति.पो.अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात भेट देऊ न घटनास्थळीची पाहणी केली.

कोई टिप्पणी नहीं: