सोमवार, 14 जुलाई 2008

माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचे निधन

मुंबई - भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
प्रकृतिअस्वास्थामुळे त्यांना बाम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ पेपर्स लिमिटेड, शिक्षण प्रसारक मंडळी, भारतीय विधी संस्था यांचे ते अध्यक्ष होते.

कोई टिप्पणी नहीं: