सोमवार, 14 जुलाई 2008

ठाण्यात भूकंप रोधक घर बांधण्यासाठी ५६ गवड्यांना प्रशिक्षण

ठाणे, दि। १५ : भूकंपामुळे प्रमुख हानी ही घरांची होत असते. यामुळे मोठी जिवीत हानी होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची जिवीत हानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, धोके आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकतेच ठाणे जिल्ह्यातील ५६ गवड्यांना भूकंप रोधक घरे बांधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विशेष महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले गेल्याचे बोलले जात आहे. सदर प्रशिक्षण उल्हासनगर तहसिलदार कार्यालय गुरुवार, शुक्रवारी शनिवारी या तीन दिवसात देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील ५६ गवड्यांना सकाळी १० ते ५ या वेळेत लेक्चर आणि प्रात्यक्षिकपणे प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील वाडा, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली या तालुक्यातून ५६ जणांची निवड यासाठी करण्यात आली होती। त्यांना प्रशिक्षणासाठी स्वयं शिक्षक प्रयोग या उस्मानाबाद संस्थेच्या प्रा. तबस्सूम आणि काकासाहेब अडसूळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले.
गुरुवारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी कमलेश सोनाले यांच्या हस्ते या कार्य्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. तर समारोप उल्हासनगर तहसिलदार अंजली भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याबाबत संबंध प्रकल्प अधिकारी अशोक घुले यांनी सांगितले की, सदर प्रशिक्षण निशुल्क होते. यामध्ये भूकंप रोधकघरे बांधण्याचे नवे तत्रज्ञान शिकविण्याीत आले आहे. या ५६ जणांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय संकेत स्थळावर नावे व पूर्ण माहिती उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. जर कोणास अशा प्रकारे घरे बांधायची झाल्यास या संकेतस्थळाचा उपयोग होईल असेही घुले यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं: