मुंबई, दि. १५: भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी गोदी उद्योगातील मान्यता प्राप्त पांच कामगार महासंघाची १६ जुलै पासून देशव्यापी संपाचा इशारा दिल्यामुळे केंद्र सरकारने पाचही महासंघाच नेत्यांना आज दुपारी ११:३० वाजता बोलणी करण्यासाठी दिल्लीत पाचारण केले आहे.
बंदर व गोदी कामागारांना १ जानेवारी २००७ पासून लागू होणाऱ्या वेतन करारापोटी मान्य केलेली १३.५ टक्के हंगामी वाढ, वाढीव बोनस रू. २४००/- ची थकबाकी, १ जानेवारी २००५ पासून ५० टक्के महागाई भत्ता मूळ पगारात सामाविष्ठ करणे, कामगारांची रिक्त पदे भरणे. ओव्हरटाईम पूर्वीप्रमाणे डबलरेटने थकबाकीसह देणे इत्यादी महत्त्वांच्या मागण्यांबाबत पाचही कामगार महासंघाची १ जुलै २००८ रोजी संपाची नोटीस दिली आहे. १० जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय नौकानयन व परिवहन मंत्री टी.आर.बालू यांच्याबरोबर कामगार नेत्यांची झालेली बोलणी फिसकटल्यामुळे १६ जुलै पासून गोदी कामगारांचा संप अटळ आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें