नागपूर - विदर्भात साथीच्या रोगाने थैमान घातले असून, आतापर्यंत पूर्व विदर्भात चंडीपुरा आजाराने दोन आणि मलेरियाने चार असे एकूण सहा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे।
साथीच्या रोगाचा प्रभाव चंद्रपूर जिल्ह्यात अधिक दिसून आला आहे. जिल्ह्यात चिकनगुण्या, चंडीपुरा, मलेरिया व डेंग्यू या संमिश्र साथीच्या आजाराचे असंख्य रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात चिकनगुण्याचे एकूण ६९ तर मलेरियाचे १८ संशयित रुग्ण आढळले. या जिल्ह्यात चंडीपुरा आजाराने एकाचा; तर मलेरियाने चौघांचा मृत्यू झाला. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात डेंग्यूचे ६ रुग्ण आढळून आले. तसेच भंडारा जिल्ह्यातसुद्धा ३५ जणांना विविध साथींचे रोग आढळले.
जिल्ह्यातील वरठी येथे चंडीपुरा आजाराने एक जण मरण पावला. नागपूरच्या दोन खासगी रुग्णालयातही डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें