नारायण राणे शनिवारी सोनियांना भेटले. सकाळी १०.१० ते १०.२१ अशा ११ मिनिटांच्या भेटीत, राणेंनी मुख्यत्त्वे गोरेगावच्या प्रदेश काँग्रेस मेळाव्यात झालेल्या गोंधळाबाबत आपली बाजू सोनियांपुढे मांडली. त्यांचे म्हणणे सोनियांनी शांतपणे ऐकून घेतले. झाले गेले विसरून जा, प्रकरण वाढवू नका, त्यापेक्षा आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला या भेटीत राणेंना मिळाल्याचे समजले.
महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाबाबत आपली भूमिकाही निघता निघता काही मिनिटांत राणेंनी मांडली. त्यावर सोनियांनी थेटपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी राज्यात काँग्रेस संघटनेच्या संदर्भात येत्या आठवड्यात बरेच विषय मागीर् लागलेले असतील, असे संकेत एकूण वातावरणावरून स्पष्ट झाल्याचे त्यांच्या निकटवतीर्यांकडून समजले. सोनियांच्या भेटीनंतर मार्गारेट अल्वांना भेटण्यासाठी राणे त्यांच्या निवासस्थानी गेले. भेटीचा तपशील अल्वांना कथन केल्यानंतर दुपारी बारा वाजताच्या विमानाने राणे मुंबईला परतले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें