मनमाड, दि. 5 : मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या छातीत कळ आल्याने शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. देवदर्शनानिमित्त उमा भारती पंजाब मेलने प्रवास करीत होत्या.
मनमाडमध्ये पोहोचल्यावर त्या शासकीय विश्रामगृहात थांबल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत कळ आली. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें