रविवार, 10 अगस्त 2008

स्वातंत्र्यदिनीच निषेधाचे झेंडे

मुंबई, १० अगस्ट-स्वातंत्र्यदिनीच दलित पँथर संघटना काळा दिवस पाळणार असल्याचे संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष पवनकुमार बोरुडे यांनी जाहीर केले आहे. तर एका एसटी सेवेसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दलितांना जगणे मुश्कील असून दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध म्हणून स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार घालणार असल्याचे बोरुडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। गेल्या महिन्यात नाशिक येथे झालेल्या संघटनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात हा निर्णय झाल्याचे समजते. दलितांना अधिकार आणि सुरक्षितता देण्यात देशाचे स्वातंत्र्य कुचकामी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार दलित पँथर १५ ऑगस्टला काळी निशाणे फडकावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बोरिवली-शीवमागेर् वेल्हे अशी एसटी बस सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तोरणा विकास सेवा समितीने दिला आहे. तसे पत्र एसटी महामंडळास पाठवण्यात आले असून महामंडळ यावर काय निर्णय देणार याकडे आता लक्ष लागले आहे. समितीच्या वतीने महामंडळाकडे लेखी अर्ज सादर करूनही बोरिवली-वेल्हे व्हाया शीव बस सुरू झाली नसल्याने समितीने येत्या १५ ऑगस्टला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं: