रविवार, 10 अगस्त 2008

पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक पावसामुळे ठप्प

पुणे, १० अगस्ट- कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस होत असल्यानं मुंबई आणि कोकणात जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालाय. लोणावळा-कर्जत दरम्यान ठाकूरवाडीला दरड कोसळल्यानं लोणावळ्याच्या पुढची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आलीय.
या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून जाणाऱ्या प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन क्वीन आज मुंबईला गेल्या नाहीत. तसेच इंद्रायणी एक्‍सप्रेस, इंटरसिटी आणि डेक्कन या गाड्या पुण्याला आलेल्या नाहीत.
मुंबईहून सुटणाऱ्या पुणेमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याणहून मनमाड, दौंड या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

कोई टिप्पणी नहीं: