सांगली, १० अगस्ट - जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्री व रविवारी दिवसभर दमदार पाऊस पडला. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात अ तिवृष्टी झाली आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातून ३ हजार क्युसेक प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीकाठावरील २६ गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी ११ फुट ३ इंच आहे। पूर्व भागातील सात तालुक्यात मात्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यातील भात, सोयाबीन आणि भूईमुगाच्या पिकाला पाऊस उपयुक्त आहे. मिरज आणि तासगावच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनाही मदत होणार आहे. जनावरांसाठी लागणारा चारा लगेच उपलब्ध झाला नाही, तरी या पावसाने किमान माळरानात पालवी फुटून त्या ठिकाणी जनावरे चरायला सोडता येतील. दोन महिन्यानंतर चारा मिळेल. विहिरी व कुपनलिकांची खालावणारी पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होईल. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात जनजीवनावर परिणाम झाला आहे.
रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे। हवेत गारठा आणि ढगाळ वातावरण कायम आहे. गेल्या २४ तासात झालेला पाऊस तालुकानिहाय ( मिमि)असा ः शिराळा- ७८, वाळवा-६४, सांगली-३२, मिरज-३०, तासगाव- १७, पलूस-१६, कवठेमहां काळ-१३, जत-७ व आटपाडी-४ असा पाऊस झाला.
धरणे, पाऊस (मिमि), पाणीसाठा व कंसात क्षमता( टीएमसी)।
कोयना , २४३, ७७।१८ (१०५)
वारणा- १४२, ३०।६५( ३४.४)
धोम- ४८, ५।८८ ( १३.५)
कन्हेर- ७५, ५.१९( १०.१०)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें