रविवार, 10 अगस्त 2008

कोकणावर आभाळ कोसळले

मुंबई, १० अगस्ट- राज्‍यात गेल्‍या ४-५ दिवसांनंतरही पावसाचा जोर कायम असून कोकणात गेल्‍या ८ दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसामुळे कोकणवासीयांचे जनजीवन पूर्णतः विस्‍कळीत झाले आहे। राज्‍यात आजवरचा सर्वाधिक पावसाची नोंद या चार दिवसांत झाली असून कोकण रेल्‍वेसेवा व मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक पूर्णतः खंडीत झाली आहे.
राज्‍यात अनेक दिवसांची ओढ दिल्‍यानंतर पावसाने पुन्‍हा एकदा जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे विदर्भात नागपूरमध्‍ये मुसळधार पाउस झाला। महाबळेश्‍वरमध्‍ये आजवरचा सर्वाधिक विक्रमी ४४० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोल्‍हापूर, सिंधुदुर्ग, चिपळूण, सावंतवाडी आदी भाग प्रभावित झाले आहेत.
कोकणात खेड, दापोळी, चिपळूण, कराड येथील वाहतूक पूर्णतः विस्‍कळीत झाली असून सिंधुदुर्ग जिल्‍हयातील भंगसाळ, वरवणेसह अनेक लहान-मोठया नदयांना पूर आला आहे। तर कर्जतमध्‍येही दूरघ्‍वनी व वीजपुरवठा खंडीत झाला आहे. रत्‍नागिरी व लांजा जवळील इंदवटी धरण फुटल्‍याने आणि अतिवृष्‍टीमुळे मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दुरवस्‍था झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्‍याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आला आहे. तर कोकण रेल्‍वेवरील वाहतुकही बंद झाली आहे. तर अतिवृष्‍टीमुळे लांजा-निवसर रेल्‍वे स्‍टेशनवर जमीन ढासळल्‍याने रेल्‍वेमार्ग कोलमडला आहे.
कोल्‍हापूरमध्‍येही गेल्‍या ८ दिवसांपासून सतत पाउस होत असल्‍याने सुमारे ७० गावांचा संपर्क तुटला आहे। महाबळेश्‍वरमध्‍ये जोरदार पर्जन्‍यवृष्‍टीमुळे पर्यटन व्‍यवस्‍थेवरही परिणाम झाला आहे.
मुंबई-पुणे रेल्‍वे मार्गावरील मंकी हीलजवळ दरड कोसळल्‍याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. लोणावळयाजवळील सिंहगड इन्‍स्‍टीटयुटवर अतिवृष्‍टीने दरड कोसळली आहे. सुदैवाने येथे कोणतीही प्राणहानी झाली नाही.

कोई टिप्पणी नहीं: