बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळामध्ये भारताच्या वाट्याला आलेलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अभिनव बिंद्रा हा खेल रत्न पुरस्कार प्राप्त नेमबाज असून या स्पर्धेत रोमानियाचा जॉर्ज अॅलन मोल्डोव्हेनूसोबत त्याने फायनल मध्ये प्रवेश केला होता. दोघांनीही ६०० पैकी ५९९ स्कोर केला होता.
बिंद्राने फायनल स्पर्धेत १०० , ९९ , १०० , ९८ , १०० , आणि ९९ असा स्कोर केला होता। दरम्यान , फिनलन्डचा हेन्री हॅकीनेन याने ५९८ / ६०० असा स्कोर करून प्रवेश मिळवला.
१० मिटर एअर रायफल शुटिंग स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करताना अभिनव चौथ्या क्रमांकावर होता। अंतिम स्पर्धेत अभिनवने एकूण ७००.५ स्कोर करून गोल्ड पटकावले. तर चीनच्या झ्यू क्विनने ६९९.७ स्कोर करून रौप्य पदक आणि फिनलंडच्या हेन्री हक्कीन्सने ६९९.४ स्कोर करून कांस्यपदक पटकावले.
व्यक्तिगत पातळीवर यापूर्वी नेमबाज राजवर्धन राठोड याने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले होते।
१९८० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये मिळालेल्या गोल्ड मेडलनंतर भारताला मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें