जळगाव - "उन्हामुळे जगलांतील पाणी संपलेले आहे. त्यामुळे सापांनी जळगावमधून शहराकडे जिथे पाणी मिळेल, तिथे धाव घेतलेली आहे. त्यामुळे मेहरूण तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विषारी साप आढळून येत आहेत', अशी माहिती येथील सर्पमित्र सागर ढाके यांनी दिली.
शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या कैलास बुधो चौधरी यांच्या घरांमधून त्यांनी "इंडियन ब्लॅक कोब्रा' या विषारी जातीचा नाग शुक्रवारी पकडला आहे. तर, गेल्या दोन दिवसांपूर्वी महाबळ परिसरामधीलच मोहननगर, दौलतनगर या भागामधूनही चार विषारी नाग पकडण्यात आलेले आहेत.
विषारी सापाच्या वाढत्या संख्येबाबत माहिती देताना श्री. ढाके यांनी सांगितले की, उन्हाळ्यात जंगलातील पाणीसाठा संपलेला असतो. त्यामुळे हे साप पाण्याच्या शोधासाठी शहराकडे धाव घेतात व पाण्याच्या जागी आपले वास्तव्य करतात. त्यामुळे शिरसोली व परिसरामधील साप मेहरूण तलावाच्या परिसरात आलेले आहेत. या ठिकाणच्या बिळात ते वास्तव्य करून राहत आहेत. शहरामधील कांचननगर, आशाबाबानगर, या भागातही हे विषारी साप सापडण्याची शक्यता आहे. घोणस व फुरसे या जातीचे सापही आढळण्याची शक्यता आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें