नवी दिल्ली - आयपीएल स्पर्धेदरम्यानच्या सामन्यत श्रीशांतला लगावलेला थप्पड हरभजनला ३ कोटी रूपयांला महागात पडला. शिवाय आयपीएलच्या उर्वरीत तसेच ५ एकदिवशीय सामन्यापासूनही वंचित राहावे लागले.
हे जरी खरे असलेतरी श्रीशांतने थप्पड लगावल्यानंतर त्याच सामन्यानंतर रात्री एकत्र भोजनाचा आनंद घेतला होता, अशी कबुली देवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
एका वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, "आम्ही त्याच दिवशी एकत्र भोजनाचा आनंद घेतला, मात्र प्रसार माध्यम तसेच लोकांनी या घटनेला खूपच गंभीर बनवून राईचा पर्वत केला.'
आता सर्वकाही ठीक असून आमच्यात आता कोणताही वाद राहीलेला नाही, हे प्रकरण भूतकाळात जमा झाल्याचे त्याने सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें