अमरनाथ देवस्थानच्या जमिनीसाठी विश्व हिंदू परिषदेने दि. ३ जुलै रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले असून अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यवहार बंद दिवसभर बंद ठेवण्याचे जाहीर केले असले तरीही विहिंपच्या या बंदला देशभर हिंसक वळण मिळाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अमरनाथ मंदिर देवस्थानला वनजमीन देण्याच्या निर्णयाच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून जम्मू-काश्मिरमध्ये राजकीय आंदोलन सुरू झाले आहे। तेथील गुलाम नबी आझाद सरकारमधील घटक पक्ष असलेल्या पीडीपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. परिणामी वनजमीन देण्याच्या निर्णयावरून आझाद सरकारने माघार घेतल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी देशभर आंदोलन पुकारले असून केंद सरकारने ही जमीन तातडीने देवस्थानला परत करावी या मागणीसाठी विहिंप, बजरंग दल यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.
दरम्यान, विहिंपच्या या बंद आंदोलनाचे देशभर जोरदार पडसाद उमटले असून दिल्ली, नागपूर, आग्रा, इंदूर व पेणसह अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे। बंदमुळे सामान्य जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. बंदच्या पूर्वसंध्येला नागपुरमध्ये हिंसक वळण मिळाले असून संतप्त निदर्शकांनी शहरातील महाल भागात बसेसची तोडफोड केली असून आणि इतर वाहनांवर दगडफेक केली आहे. त्यामुळे नागपुरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तर पेण, इंदूरसह अनेक भागात विहिंपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत तोडफोड केली. आग्य्रात कार्यकर्त्यांनी शताब्दी एक्सप्रेस अडविल्यानेही काही काळ गोंधळ झाला आहे.
काश्मिरात मतं मिळवण्यासाठी देवस्थानची हक्काची जमीन न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। ही वनजमीन असल्यानं ती देवस्थानाला देता येणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु मुस्लिमांचं लांगूल चालन करण्यासाठी आणि हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप विहिंपने केले आहे.
विहिंपच्या या बंदमध्ये संघ परिवारातील भाजप, अभाविप, भारतीय मजदूर संघ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर शिवसेनेनेही बंदला नैतिक पाठिंबा दिला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें