नवी दिल्ली, दि. २ : अणुकराराच्या मुद्द्यावरून सरकार विरुध्द आक्रमक भूमिका घेतलेल्या डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय पक्का केला आहे। खात्रीलायक वृत्तानुसार 4 जुलै रोजी डाव्या पक्षांची विशेष बैठक घेतली जाईल आणि पाठोपाठ सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे निवेदन राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याकडे सोपविले जाईल.
फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव खा. देववृत्त विश्वास यांनी सांगितले की, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अणुकरारावर पुढचे पाऊल टाकून युपीएने गंभीर उल्लंघन केले आहे. कॉंग्रेसने डाव्या पक्षांचा विश्वासघात केला आहे.
दरम्यान अणुकराराबाबत समाजवादी पक्षाने आपला निर्णय युएनपीच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असे घोषित केले आहे. राजदचे नेते रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज बुधवारी खुशीत दिसत होते. ते म्हणाले, समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा सरकारला थेट पाठिंबा मिळेल याचा मला विश्वास वाटतो. मुलायम हमारे है । सरकार तथा करार दोनो बचे रहेंगे ।
इकडे समाजवादी पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधानांनी अणुकरारासंदर्भात दूरदर्शनवरून काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत आणि लोकांना विश्वासात घेतले पाहिजे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें