मुंबई - इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची तस्करी करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या तस्कराला केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने ३२ लाख रूपयांचा कर चुकविल्याप्रकरणी अटक केल्याचे वृत्त आहे।
गेल्या १० वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या या तस्कराने आजवर एक हजार कोटी रूपयांहून अधिक रूपांची कर चुकवेगिरी केल्याची शक्यता महसूल गुप्तचर खात्यातील सूत्रांनी वर्तविली आहे।
सुनिल गुप्ता असे या तस्कराचे नाव आहे. देशभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री करणाऱ्या मोठमोठ्या मॉल्सना तो कमी किंमतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पुरवठा करतो. त्याला आज गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें