सातारा - संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरूवारी दुपारी अडीच वाजता सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पाडेगाव (ता. खंडाळा) येथे भव्य स्वागत करण्यात आले.
दुपारी अडीच वाजता पालखी सोहळा निरानदीजवळ आला. त्यानंतर माऊलींच्या पादूकांना पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आले. नंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याच्या सिमेवर पालखीचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे पोचेल. तेथेच त्यांचा मुक्काम असून उद्या(शुक्रवारी) सकाळी पालखी मार्गस्थ होणार आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें