मंगलवार, 5 अगस्त 2008

हिंदीविरोधी आंदोलनाने नेपाळ प्रभावित

काठमांडू, ४ ऑगस्ट- नेपाळमधील कट्टर संघटनांनी हिंदीविरोधी तीव्र आंदोलन छेडल्याने भारताच्या सीमेलगतच्या तेराई पठारातील बावीस जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उपराष्ट्रपती परमानंद झा यांनी हिंदीत शपथ घेतल्याने या वादास तोंड फुटले होते. नवनियुक्त उपराष्ट्रपतींच्या हिंदी शपथ घेण्याविरोधात थरू समुदायाच्या थरूहट संघर्ष समितीने आज बंदचे आवाहन केल्याने दक्षिण तेराई भागातील सामान्य जनजीवनास फटका बसला आहे.
झा यांनी परदेशी भाषेक शपथ घेऊन संविधानाचा अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे.

कोई टिप्पणी नहीं: