मंगलवार, 5 अगस्त 2008

पुन्हा अफगाणिस्तान उभा करू- राष्ट्रपती

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट- काबुलमधील भारतीय दूतावासावर झालेला हल्ला भ्याड असल्याचे स्पष्ट करत, अफगाणिस्तानला यापुढील काळातही भारताची मदत होतच राहणार असल्याचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्पष्ट केले. मोडलेला अफगाणिस्तान पुन्हा भारत उभा करेल असे त्या म्हणाल्या.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई यांच्या स्वागत प्रीत्यर्थ आयोजीत एका समारोहात त्या बोलत होत्या. भारत आणि अफगाणिस्तान या दोनही देशात मित्रत्वाचे संबंध आहेत.
हे संबंध वृद्धींगत करण्याचा भारत सातत्याने प्रयत्न करेलच परंतु अफगाणिस्तानला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं: